Skip to main content

एका हाताने द्यायचे आणि एक हाताने घ्यायचेच, नाहीतर वेगळेच बरे.

Published on बुधवार, 11/08/2010
गेली काही दिवस मिपावर बायका, आयटी, स्वयंपाक, ह्या विषयावर बरीच चर्चा झाली, त्यातून बरेच काही शिकायला मिळाले. आजूबाजूचे वातावरण नव्याने दिसू लागले. मात्र त्यातून काही नवीन विचारांना काहूर फुटत गेले. त्यातूनच हा लेख लिहिण्याचे ठरविले.मागे झालेल्या सर्व चर्चेचा विराम झाला आहे असे समजून (म्हणजे कुटुंब हे दोघांचे आहे, दोघांनी प्रेमाने एकमेकांना सांभाळून घेऊनच सर्व निर्णय घ्यायचे असते. असाच काही तो शेवटचा निर्णय ) एक नवीन विषयाला हाथ घालत आहे. (माझी लेखन शैली थोडी ढिसाळ असेल. नवीन लिहित आहे ना, तरी सर्व वाचकांनी आशय समजून घेऊन आपापले अनुभव, विचार सादर करावेत हि विनंती.) एक माझा खूप जवळचा मित्र, अगदी लहानपणा पासूनचा . गेली २५ वर्षे मी त्याला जवळून पाहत आहे. अत्यंत हुशार, चपलख, मनमिळाऊ, प्रामाणिक असे अनेक गुण ज्याला लागू पडतील असा तो. त्याच्या कुटुंबात आई, वडील, एक मोठा भाऊ, एक मोठी बहिण एवढेच. बहिणीचे लग्न साधारण १५ वर्षा पूर्वीच झाले आणि ती पुण्यातच असते. ८-१५ दिवसांतून माहेरी एक चक्कर एवढाच काय तो बहिणीचा घरच्यांशी संबंध. साधारण ७ वर्षांपूर्वी त्याच्या मोठ्या भावाचे लग्न झाले. आम्ही सगळे मित्र अगदी जातीने हजर होतो त्या लग्नाला. एकदम धूम धडाक्यात झाले लग्न. मोठ्या वहिनी पुण्याच्या जवळच एक गावातील. सर्वसाधारण शिक्षण, प्रेमळ, मनमिळाऊ असा त्यांचा स्वभाव. लहान दिराला अगदी लहान भावाप्रमाणे समजून त्याचे सर्वकाही प्रेमाने करण्यात मोठ्या वाहिनी कायम गुंतलेल्या. सासू सासर्यांचे सुद्धा आपलेच आई वडील समजून त्यांची सेवा सुश्रुवा त्या करीत. आम्ही सुद्धा कधी घरी चक्कर मारली कि आमची देखील अगदी उत्तम तर्हेने विचारपूस व्ह्यायची. सगळे अगदी उत्तम चाललेले. (चेष्टेने आम्ही देखील मोठ्या वाहिनीच्या गुणांकडे बघून आपली भावी पत्नी अशीच असावी असे विचार करत असू. ह्यावरून आमची कित्येक वेळा घरामध्ये थट्टा मस्किरी देखील चालत असे. त्यांचे कुटुंब आणि माझे कुटुंब ह्यामध्ये घरातलेच वातावरण आहे. त्यांच्या लहान बहिणीशी पत्रिका मला आलेली होती पण ती न जुळल्याने पुढे काही पाऊल पडले नाही. असो ) तर सांगायचा मुद्दा असा कि पत्नी असावी तर कशी ह्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून त्या सर्वांच्या समोर होत्या (आहेत) जवळ जवळ ३ वर्षे, दुष्ट लागावी असा संसार चालला होता त्या कुटुंबाचा. आणि तो दिवस आलाच. तीन वर्षापूर्वी माझ्या मित्राचे देखील लग्न झाले. त्यावेळेस मी बाहेर असल्याने लग्नाला जाने जमले नाही. त्यानंतर मी बाहेरच असल्या कारणाने मित्राशी तसेच त्याच्या कुटुंबाशी जास्त संबंध आला नाही. लग्न झाल्यानंतर साधारण एक वर्षांनी मी पुण्यात परत आलो. मित्राची चौकशी केली तर समजले कि परिस्थिती बदललेली होती. दोन्ही भाऊ वेगळे झाले होते. मित्राला ह्या बाबतीती जास्त काही विचारणे चांगले वाटले नाही. पण लवकरच माझ्या आणखी एक मित्राकडून मला माहिती मिळाली कि लग्न झाल्यानंतर काहीच दिवसांत दोन्ही जावेंमध्ये वितुष्ट इतके वाढले होते कि त्यांना आता एकत्र राहणे अशक्य झाले होते. मग माझ्या मित्रानेच पुण्यात एक घर भाड्याने घेऊन तो त्यात पत्नीसह राहू लागला. आता ते एकमेकांच्या घरी पाहुण्यासारखे ये जा करीत असतात. मित्राचं पत्नीचे शिक्षण जास्त (म्हणजे मोठ्या जावेपेक्षा) झालेलं होते. त्यामुळे ती स्वतःला जास्त हुशार समजत होती. आणि त्यामुळे तिने बर्याच वेळा मोठ्या जावेच अपमान देखील केला. मित्राची पत्नी एक श्रीमंत घरातून आलेली असल्याने माहेरी घरात नोकर चाकर होते त्यामुळे घराच्या जबाबदारीची जाणीव तोडकीच आणि लाडात वाढलेल्या त्यामुळे त्यांना कोठेही कमीपणा घेणे म्हणजे अपमानकारक वाटत असे. तसेच तिला स्वताच्या कुटुंबाची ( तिच्या मते तिचे कुटुंब म्हणजे, ती आणि तिचा नवरा बस्स) एकांततेची जास्त चिंता असे. तिला लवकरच एकत्र कुटुंबात राहणे कठीण जाऊ लागले आणि तिने हळूहळू काहीतरी कुरापात्या काढून भांडणे करायला सुरुवात केली. सुरुवातीला सर्वांनी प्रेमाने समजावून (अगदी तिच्या घरच्यांनी देखील) सांगितले, पण पालथ्या घड्यावर पाणी. लवकरच मोठ्या जावेने सुद्धा आपला नमतेपणा बाजूला ठेऊन तोंडस तोंड दयायला सुरुवात केली. घरातून रोज भांडणाचा आवाज ऐकू यायला लागला. हे सर्व आजूबाजूला पसरू लागले. सर्व मित्रांनी त्याच्या घरी येणे जाने बंद केले. आता ते दोघे पुण्यातच दुसरीकडे एक घर भाड्याने घेऊन राहत आहेत. त्यांनी घर देखील अश्या ठिकाणी घेतले आहे कि त्याच्या आई वडिलांना तेथे जाने खूप अवघड होते. त्या दोघांना आता भरपूर एकांत मिळतो आणि ते आता प्रेमाने राहतात. मित्राच्या आई वडिलांच्या नशिबाने त्यांची मोठी सून त्यांची अजूनही तितक्याच प्रेमाने त्यांचा सांभाळ करते. आणि माझा मित्र दर महिन्याला एक ठराविक रक्कम पाठवून देतो व अधूनमधून घरी एक चक्कर मारतो. (माझ्या मित्राचे आई वडील सध्या त्याच्या मोठ्या मुलाकडेच राहतात.) सध्या सर्व काही सुरळीत नाही पण ठीक आहे. आता सध्या माझ्या मित्राच्या घरात भले ते दोघे जण मिळून एकत्र स्वयंपाक करीत असतील, अगदी प्रेमाने राहत असतील पण तो कथेचा गोड शेवट आहे काय ? दोन जावा एकत्र राहूच शकत नाही काय ? सासू सासर्यांनी सहा महिने इकडे, सहा महिने तिकडे हे असंच करायचे काय ? जर सासू सासर्यांना काही गरज पडली तर दोघांकडे अर्धी अर्धी मागायची काय ? त्यातून सुद्धा एक जाऊ विचार करणार कि दुसरी किती देणार आहे, तिला अगोदर देऊ दे, मग आपण देऊ.मागे आपण थोडे जास्त दिले होते ना आता थोडे कमी देऊ, त्यांची जबाबदारी मीच का म्हणून घ्यायची. सुदावाने मी एकटाच आहे. मला कोणी भाऊ नाही. त्यामुळे मला ह्या असल्या भानगडीला सामोरे जावे लागणार नाही हे निश्चित, आजकाल स्त्रिया कमवित्या झाल्या असल्या कारणाने त्यांच्या हातात थोडा पैसा खेळू लागला आहे त्यामुळे त्यांना बाहेरचे विश्व खुणावत असते. कोणाचेही बंधन नकोसे वाटते. एकांत जास्त महत्वाचा वाटू लागतो. त्यामुळे प्रसंगी त्यांना आपले सासू सासरे देखील जड वाटू लागतात. दोन जावेंचे एकमेकांशी पटत नाही पण त्यामुळे सासू सासर्यांची जी भरकट होते त्यास जबाबदार कोण ? एकदा आमच्या सौ बरोबर ह्या बाबतीत सहज बोलणे चालले होते, आमच्या सौ उत्तरल्या कि,. एकत्र कुटुंब म्हणजे एका हाताने द्यायचे आणि एक हाताने घ्यायचे (ह्यातला च हा प्रमाणाच्या बाहेर ठाम होता) , नाहीतर वेगळेच बरे. disclaimer : केवळ सर्वांचे मते ह्याबाबतीत जाणून घेण्यास हा अनुभव कथन केलेला आहे. कोणासही दुखावणे व त्यांच्या विचारांचा अपमान करणे हा उद्देश अजिबात नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 38920
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

>> आजकाल स्त्रिया कमवित्या झाल्या असल्या कारणाने त्यांच्या हातात थोडा पैसा खेळू लागला आहे त्यामुळे त्यांना बाहेरचे विश्व खुणावत असते. कोणाचेही बंधन नकोसे वाटते. एकांत जास्त महत्वाचा वाटू लागतो. त्यामुळे प्रसंगी त्यांना आपले सासू सासरे देखील जड वाटू लागतात. दोन जावेंचे एकमेकांशी पटत नाही पण त्यामुळे सासू सासर्यांची जी भरकट होते हे केवळ माझे विचार आहेत. ते बरोबरच आहेत असे मला अजिबात म्हणावयाचे नाही. मात्र अधिक चर्चा करूनच मला माझे विचार ठाम करता येतील. अवांतर : स्वयं संपादनाचा अधिकार असावा असे आता ह्या क्षणी मनोमन वाटत आहे.

"दोन जावेंचे एकमेकांशी पटत नाही पण त्यामुळे सासू सासर्यांची जी भरकट होते त्यास जबाबदार कोण ?" अगदी ह.ना.आपटे ते व.पु.काळे यांच्यापर्यंतच्या जवळपास सर्व साहित्यिकांच्या लेखनातून वारंवार दर्शविली जाणारी खास महाराष्ट्रीयन कुटुंबातील स्थिती श्री.गांधीवादी यांनी समर्थपणे वर रेखाटली आहे. (मी महाराष्ट्रीयन जरी म्हटले असले तर ही स्थिती जवळपास संपूर्ण देशाच्या चित्राचीदेखील असू शकते.) "मी तिच्यापेक्षा जास्त शिकले आहे" हे केवळ एक चटकन हाताशी असलेले कारण आहे. हा संवाद दोन सख्ख्या भावातही होणे अशक्य नाही. आयुष्यभर शेती कामकाज केलेल्या रामरावास शहरात येऊन "चार बुके" शिकलेला शामरावदेखील अकलेच्या चार गोष्टी सांगताना म्हणतोच, "तू मला काय बी शिक्वू नकोस, तुझ्यापेक्षा मी जास्त शिकलेलो हाय." माहेरच्या "श्रीमंती"चा तोरा दाखविणे हे सिनेकथानकात अन आजकाल सुकाळ झालेल्या टीव्ही मालिकेतील एक हुकूमी पान आहे, पण प्रत्यक्ष व्यवहारात असे सर्वकाळ होतच असेल असे ठामपणे म्हणण्याइतपत माझा अनुभव नाही. असे असले तरी दोन जावापैकी जी (माहेरकडून) गरीब कुटुंबातील असते ती घरगुती वादविवादात कायम पडती बाजू घेत असल्याचे मी पाहिले आहे. जावाजावाच काय पण माझ्या थोरल्या मावशीची (जी जि.प.च्या प्रा.शाळेत शिक्षिका आहे) बँकेत नोकरी करणारी सून एकदा अशाच वादप्रसंगी मावशीला म्हणाली होती, "मला व्यवहार कसा करायचा ते शिकवू नका. मी एम.कॉम. झाल्ये आहे." हा टोमणा मावशीच्या "मॅट्रिक" क्वॉलिफिकेशनला होता असाच अर्थ तिच्या घरातील (नवरा सोडून) अन्य लोकांनी काढला आणि वाद मूळ कारणापासून दुसरीकडेच भरकटला. म्हणतात ना "घरोघरी मातीच्या चुली" (जरी काळ बदलला असला तरी). "सासू-सासर्‍याची भरकट" ~~ मला वाटते २१ व्या शतकात सासूसासरे या जोडीचे स्वरूप जुन्या पठडीतील 'हतबल चन्द्रकांत गोखले आणि सोशीक सुलोचना' असे आता करू नये. कारण आताच्या या जोडीचे वय अनुक्रमे ५५-५० असे धरले तर त्यांचा जन्म १९६० च्या आगेमागे हे नक्की आणि नेमका हा काळ शिक्षण, सरकारी नोकरी, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या नव्या उत्साहाचा, वार्‍याचा असा होतो. तसेच आधुनिक विचारसरणीशी त्या पिढीने आपली वीण घट्ट केली होती. या दृष्टीने पाहिले गेल्यास ते (किमान त्यातील पुरुष घटक) स्वतंत्र बाण्याचे असायलाच हवे आणि तदनुसार "म्हातारपणी मला माझ्या मुलाने/मुलांनी पाहिलेच पाहिजे" असा विचार करणारे असू नयेत. यापुढील काळात तर "मुलगा असो वा मुलगी, कुठेही असली तरी सुखी राहावीत. आमचे आम्ही पाहुन घेतो" ही कल्पना वाढीला लागणार आहे, त्यामुळे श्री.गांधावादीना कुटुंबव्यवस्थेबद्दल जो अनुभव आला आहे त्या गटातील उदाहरणे पुढे विरळ होत जाणार (अगदी "विरळ" या शब्दाप्रमाणेच) असे मला वाटते.

In reply to by इन्द्र्राज पवार

इन्द्रराज दादा, तुमच्या प्रतिक्रिया वाचणे ही मेजवानीच असते.... मुद्द्यांशी सहमत. हे.वे.सां.न.ल.

In reply to by मी ऋचा

या मताबद्दल "धन्यवाद" म्हणणार होतो, पण आपल्यात 'धाकट्या बहिणी' ला धन्यवाद देण्याची प्रथा नाही. त्यामुळे फक्त असे लिहितो की, उद्या मलाही तुझ्या लेखनास अशी प्रतिक्रिया देण्याची संधी मिळो. इन्द्रा

In reply to by मी ऋचा

डोळ्यात पाणी आले. रक्षाबंधन जवळ आल्याची जाणीव झाली. बाकी लेखाबद्दल- इंद्रादादाशी सहमत. (धाकटा भाऊ) -ज्ञानेश.

In reply to by ज्ञानेश...

"रक्षाबंधन जवळ आल्याची जाणीव झाली." होय. खरं सांगायचं झाल्यास बहिणींपेक्षा मीच त्या दिवसाची वाट पहात असतो. खूप मजा येते वर्षातून एकदा एकत्र जमल्यामुळे. त्यावेळी खरे कळते की मी किती "श्रीमंत" आहे. इन्द्रा

In reply to by मी ऋचा

"(मोठ्या भावाला म्हणू शकतो ना...)" वेल... म्हणू शकतेस, कारण वाढदिवसानिमित्य मी माझ्या बहिणीला काही भेट वस्तू आणली तर ती सवयीने इतरांना जसे सहज "थॅक्स" म्हणते तसे मलाही. थोडक्यात तितके तुझे धन्यवाद सहज आहेत असे समजतो. (नागपुरी संत्र्याप्रमाणे गोड). ओके? इन्द्रा

सुदावाने मी एकटाच आहे. मला कोणी भाऊ नाही. >>>>>>>>>>> हसून हसून दमले!! दोन मिनिटानी प्रतिक्रिया लिहेन.

सुदावाने मी एकटाच आहे. मला कोणी भाऊ नाही. त्यामुळे मला ह्या असल्या भानगडीला सामोरे जावे लागणार नाही हे निश्चित, तुम्ही लिहलेला अनुभव लग्ना नंतरचा आहे (तुमच्या मित्राच्या),हल्ली तर वधु/वर नोंदणी कार्यालयात गेलात तर तिथल्या रजिस्टर मधल्या नोंदी वाचाव्यात !!! ( अर्थात या नोंदी मुलींकडच्या आहेत...) १) पगार ४५-५० हजार असावा. २)मुलाला भाऊ असेल तर वेगळा रहाणारा असावा. ३)मुलाला बहिण असेल तर तिचे लग्न झालेले असावे. ३) मुलाच्या नावावर फ्लॅट नसेल तरी चालेल पण मुलगा एकुलता एक असावा. अशी आणि अनेक कलमे वाचायला मिळतील !!! पार बाजार मांडला आहे.

या विषयावर फारसे बोलणार नाही...पण एकत्र राहून भांडण्यापेक्षा वेगळे राहून शांततेत राहायला काय हरकत आहे? सासू सासऱ्यांचे म्हणाल तर इकडे तिकडे करण्यापेक्षा स्वताच्या घरात राहावे आणि काही लागले तरच लेकी आणि लेकाला हाक मारावी...नाहीतर अधूनमधून गाठीभेटी होतातच. साधारणतः सासू हा प्राणी फारच त्रासदायक असतो....स्वताचा मुलगा हा दुसऱ्याचा नवरा आहे हे विसरूनच वागणे चालते. हीच गोष्ट नणंदेची.

In reply to by शिल्पा ब

>>या विषयावर फारसे बोलणार नाही...पण एकत्र राहून भांडण्यापेक्षा वेगळे राहून शांततेत राहायला काय हरकत आहे? >>सासू सासऱ्यांचे म्हणाल तर इकडे तिकडे करण्यापेक्षा स्वताच्या घरात राहावे आणि काही लागले तरच लेकी आणि लेकाला हाक मारावी...नाहीतर अधूनमधून गाठीभेटी होतातच. माझ्या आईवडिलांनी मी लहान असताना मला जपले, संगोपन करून वाढवून मोठे केले. आणि आता त्यांना माझ्या आधाराची गरज भासायची वेळ आली असता त्यांना मी "तुम्ही स्वतःच्या घरात रहा, इथे लुडबुड करू नका" असे सांगू की काय? कठीण आहे एकूणच. माझ्यापुरते बोलायचे झाले तर मला हा स्वार्थीपणा वाटतो. जाऊदे, विषय मोठा आहे. >>साधारणतः सासू हा प्राणी फारच त्रासदायक असतो....स्वताचा मुलगा हा दुसऱ्याचा नवरा आहे हे विसरूनच वागणे चालते. हीच गोष्ट नणंदेची तुम्हाला भाऊ आहे काय? असल्यास त्याच्या पत्नीची तुमच्या आणि तुमच्या आईन्बद्दल अशीच मते आहेत काय? उद्या तुम्ही जेव्हा सासू व्हाल तेव्हा तुम्हीपण त्रासदायकच वागणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारार्थी असू शकतात. एकदम उठून जगातल्या सगळ्या सासवांना एकाच मापात मोजायचे म्हणजे कमाल आहे. सगळ्या जावयांना सुळीवर चढवण्याची अकबराची गोष्ट खरी असावी अशी शंका येऊ लागली आहे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

एक तर मला वाढवले वगैरे हे सांगणे हाच स्वार्थीपणा आहे...मी तुमच्यासाठी अमुक केले म्हणून तुम्ही माझ्यासाठी अमुक करा हा व्यवहार आहे...आणि मुले हि आपण आपल्यासाठी जन्माला घालतो, ती काही आपल्याला येऊन सांगत नाहीत कि मला जन्माला घाला हो म्हणून.. आणि लेक आणि जावई स्वतंत्र राहिलेले चालतात मग मुलगा नि सुनेने वेगळे राहिले तर काय बिघडले...सगळ्यांनाच त्यांची स्पेस मिळते...आणि काही लागलेच तुमच्या भाषेत "आधाराची गरज " तर आहेतच ना ..का जबाबदारी झटकून चाललेत कुठे ? मला भाऊ नाही पण असता तरी त्याच्या बायकोला माझ्या आई वडिलांविषयी बहुदा असेच वाटले असते..कारण ते माझे आई वडील आहेत आणि तिचे सासू सासरे असते....कितीही आव आणला तरी सासू हि आई होऊच शकत नाही...आणि जावई म्हणजे मुलीचा नवरा ना ?

In reply to by शिल्पा ब

>> आणि लेक आणि जावई स्वतंत्र राहिलेले चालतात मग मुलगा नि सुनेने वेगळे राहिले तर काय बिघडले... आहे शिल्पा ताई, आपल्याकडे(कदाचित) असेल असे, पण माझ्या माहितीतल्या जेवढ्या आया आहेत त्यांची अशी शिकवण नाही. शेवटी एक लक्षात ठेवा हो, जसे पेराल तसेच उगवणार आहे. नणंद, सासू, आई, ह्या सगळ्या स्त्रियाच आहे. म्हणून कुठतरी ऐकलेली एक म्हण आठवते, स्त्रीच आहे स्त्रीची वैरी. खरंय का हे ? >>कितीही आव आणला तरी सासू हि आई होऊच शकत नाही सासूला आई समजण्याचा किंवा तिला आई चा दर्जा देण्याचा जो अट्टाहास समाजात दिसतो हो खरतर हास्यास्पद आहे. सासू हि कधी आई होऊ शकत नाही. हे अगदी मान्य पण जगाच्या कोणत्या ग्रंथात वा कुठे लिहिले आहे कि सासू हि वाईटच असते म्हणून. आपल्या सासूला "सासूबाई" अशी हाक मारूच शकत नाही का ? "अहो आई" म्हणूनच हाक मारली पाहिजे का ? आपणच "अहो आई" म्हणून हा मारतो, आणि आपल्या अपेक्षा वाढवून ठेवतो. बरं, अहो आई म्हणण्यात पण एक गोची आहे. आपण आपल्या आई ला कधीच अहो जाओ घालत नाही. मग सासूला का बरे अहो जाओ घालायचं. सासूला आई समजण्याची आपली भावना खरंच इतकी तीव्र आणि निष्कपट असेल तिला पण अरे तुरे म्हणा ना.

In reply to by गांधीवादी

पण माझ्या माहितीतल्या जेवढ्या आया आहेत त्यांची अशी शिकवण नाही. अशी म्हणजे नेमकी कशी? आणि अहो आई अन अगं आई करून विषय भरकटवु नका. {आणि एकत्र कुटुंबात स्त्रीचीच नेहमी कुचंबना होते...दुसऱ्या स्त्रीकडूनच (साधारणतः सुनेची नणंद अन सासूकडून)

In reply to by शिल्पा ब

>>एक तर मला वाढवले वगैरे हे सांगणे हाच स्वार्थीपणा आहे याचा अर्थ स्वार्थाची तुमची आणि माझी व्याख्या वेगळी आहे. त्यामुळे आपण कितीही बोललो तरी काहीही निष्पन्न होणार नाही. >>मी तुमच्यासाठी अमुक केले म्हणून तुम्ही माझ्यासाठी अमुक करा हा व्यवहार आहे... आई वडिलांनी फारसे चांगले न वागवून सुद्धा त्यांना म्हातारपणी तळहाताच्या फोडासारखे जपणारे पाहिले आहेत. लिहीन कधी त्यांच्याबद्दल. >>मुले हि आपण आपल्यासाठी जन्माला घालतो, ती काही आपल्याला येऊन सांगत नाहीत कि मला जन्माला घाला हो म्हणून. मुलांना नीट न वागवणाऱ्या, मारझोड करणाऱ्या पालकांनी पण "आम्ही कुठे सांगितले होते आमच्याच पोटी जन्माला या म्हणून" असा युक्तिवाद करावा काय ? असो, या धाग्यावरील या चर्चेला मी माझ्यातर्फे इथेच पूर्णविराम देत आहे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

आपण कितीही बोललो तरी काहीही निष्पन्न होणार नाही. या चर्चेला मी माझ्यातर्फे इथेच पूर्णविराम देत आहे. हेच म्हणेन.

In reply to by शिल्पा ब

नमस्कार वर नमुद केलेल्या वाक्याशी मी अजिबात सहमत नाही.[सासु हा प्राणी फारच त्रासदायक असतो.........]कारण माझे सासु-सासरे कदापिहि असे विचार करणारे नाहित्.ते जुन्या काळातले असले तरी नविन पिढि बरोबर कसे रहावे याची त्या॑ना चागली माहिति आहे.आज आम्चे लग्न होउन ५ वर्ष झाली.परन्तु आमचे एकदाहि भा॑ड्ण झालेले नाही.मला बरे नसते त्या वेळेस त्या मला स्व॑पाघरात जाउ देत नाहित्,उलट बाहेरुन आणु असे म्हण्तात,खर तर त्या रोज काही करत नाहीत्,कारण त्या॑चा एक हात व एक पाय अधु आहे.पण माझी कधी परिक्शा असेल तर त्या स्वता जमेल तशी मल मदत करतात्.सासरे तर अगदी मित्र अस्ल्या सार्खेच आहेत्.आम्ही देखिल आज कालच्या नवरा बायको प्रमाणे घरात सासु सासरे असताना देखिल दोघच जण रहात असल्या सारखाच अनुभव करतो.जावेचा प्रन्श माझ्या कडे पण आहे.पण मला कधी हि असे वाटत नाही की त्या॑नि तिकडे जावे.मला वाट्त जर सगळे सासु-सासरे असे वागले तर नक्कीच सुना॑ना त्या॑ना स॑भाळायला काहीच अड्चण येणार नाही.कारण माझ्या सासु-सासर्‍या॑चे एक ब्रिद वाक्य आहे[----तुम्हाला काय करायचे ते करा,आमच्या साठी तुम्ही अड्कुन राहु नका----] मला मिळालेले सासु सासरे अगदी आई वडिला॑ प्रमाणेच देवा सारखेच आहेत. मि नेहमिच देवाची रुणी राहीन मला असे सासर दिले. माझ्या घराला कोणाची द्रुष्ट न लागो.

In reply to by बरखा

माझ्या घराला कोणाची द्रुष्ट न लागो.
नक्कीच. :)
आज आम्चे लग्न होउन ५ वर्ष झाली.परन्तु आमचे एकदाहि भा॑ड्ण झालेले नाही.
काहीतरी जबरदस्त गडबड दिसते. ;-) ह. घ्या. बाकी, सासू हा नेहमीच त्रासदायक प्राणी नाही किंवा सर्वांचीच सासू त्रासदायक असते असे नाही याच्याशी सहमत.

In reply to by बरखा

तुमचे सासू सासरे त्रासदायक नाहीत हा अपवाद आहे...एकत्र राहत असलेल्या जवळजवळ प्रत्येक घरात सासू सुनेची भांडणे असतात...करणे काहीही असोत. तसे नसते तर का म्हणून मुलीना एकत्र कुटुंब नको असेल? म्हणजे सासूने तिच्या सासुपासून वेगळे घर करायचे पण तिच्या सुनेने मात्र वेगळे राहायचे नाही...का तर मुलगा लांब जातो म्हणे.

!!! पार बाजार मांडला आहे. >>>>>>>>>>>>> हे बरंय!! तुम्ही मुलांच्या "अटी" वाचल्या/ऐकल्या आहेत का? अजूनही गेल्या शतकातलेच निकष चालू आहेत.. आता मुली अटी घालायला लागल्या तर लगेच 'बाजार मांडला' काय? घरची परिस्थिती चाम्गली असलेली, पुर्वीही मुलगी देताना पहायचे. अत्ताही मुली तेच बघतात...स्वतःचे घर घेऊन कर्ज फेडताना किती हाल होतात ते ईथेही कहीजणंनी अनुभवले असेल... स्वतःचा फ्लॅट हवा असे म्हटले तर बिघडले कुठे? .... राहिली गोष्ट सासरच्यांशी जमवून घेण्याची..... ज्या मुलाना एकत्र रहायचे आहे त्यानी लग्नाआधीच याबद्दल स्पष्ट चर्चा करावी, स्वभावाचा नीट अंदाज घ्यावा.. कित्येक पुरुष ( सासरे/ नवरे )सुध्धा आग्रही,हेकेखोर, पजेसिव्ह असतात,.... ते का चालते? एखादी सून हट्टी असली तर बोंबाबोंब का? 'आपली' समजून सांभाळून घ्यावे अशा वेळेस! मी स्वत; कितीही अ‍ॅड्जस्ट करून घेत असले ( मी सगळीकडेच माऊ) तरी अशा मुलींबद्दल मला चीड येत नाही, दया येते. आपण जितक्या माणसांशी 'जमवून' घेउन रहू, तितके आपणच 'मोठे' होतो, हे शिकायला खूपजणाना वेळ लागतो... तो त्याना द्यावा, तक्रारी करत रहाण्यापेक्षा. सासू सासऱ्यांचे म्हणाल तर इकडे तिकडे करण्यापेक्षा स्वताच्या घरात राहावे आणि काही लागले तरच लेकी आणि लेकाला हाक मारावी...नाहीतर अधूनमधून गाठीभेटी होतातच. हे बेष्ट!