IT's पनीर मसाला
सध्या चाललेल्या घडामोडींमधे आयटी(ब्याचलर) पुरुष / मुलगे व सैपाक हा विषय गेल्या ५-६ दिवसात मागे पडला. त्यालाच वर आणण्याचा एक क्षीण प्रयत्न, बॅचलरी ' पनीर मसाला'... ;)
साहित्य:
१. पनीर - पाव किलो - साधारण एक बाय एक इंचाचे तुकडे करून
२. एक मोठा कांदा - चिरून
३. दोन मध्यम टोमॅटो - चिरून
४. अर्धा-पाउण चमचा - लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला
५. मीठ
६. तेल, हिंग, जिरे, कडीपत्ता, हिरवी मिरची - फोडणीसाठी
७. आलं लसूण पेस्ट
८. एक चमचा दही
९.
यंत्रांचा प्रभाव किती?
मी लहान असताना फोन ही नवीच गोष्ट आली होती. एखाद्याकडे छान अपडेटेड टेलिफोनची डायरी हा जितका चर्चेचा विषय असे तितकाच जास्तीतजास्त नंबर पाठ असणे हा होता. माझे स्वतःचे अनेक नंबर्स तोंडपाठ होते व घरात सगळे जण नंबर डायरीत शोधण्याआधी मला विचारत. तेव्हा काय मजा यायची. तर ते असो. पुढे मोबाईल आले आणि नंबर लक्षातठेवणे बंद झाले. आणि आता अशी वेळ आली आहे की ना डायरी मेंटेन्ड आहे आणि मोबाईल नसला तर फारसे नंबर्स लक्षातही नाहित.
------------
माझी आई सांगत होती. आम्ही "तरी बरं तुम्ही नुसते पाढे पाठ केले.
साहित्य संमेलन अध्यक्ष आन वाद
साहित्य संमेलनाध्यक्षाच्या निवडणूका येऊन राह्यल्या. वाद-विवादाचा धुराळा उडाला लागलाय. साहित्यिक गिरिजा कीर आयबीएन लोकमतमधल्या एका चर्चेत म्हणल्या ''झोपडपट्टील लोकांकडे साहित्य प्रतिभा नसते'' आन काल स्टार माझाच्या चर्चेत त्या म्हणल्या ''माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला''कोण चूक बोल्लं कोण बराबर बोल्लं ह्याच्यावर काथ्याकूट नाय कराचा मला. कोटीच्या घरात मराठी बोलणारी मंडली हाय आन साडेसातशे लोक जे साहित्य परिषदांचे निवडलेले मोजकेच सदस्य हायेत ते साहित्य मंडलाचे अध्यक्ष ठरतो ही गोठ काय बरी वाटत नाय. ज्यायला ज्यायला मराठी लेखन कराची, वाचाची हौस हाये अशा लोकायला मद्दान करुन दिले पाहिजेन.
आनंदाची बातमी : १५०० कोटी रुपयांची भिक, भारताच्या झोळीत.
भारताने आपले सार्वभौमत्व गहाण टाकायचे ठरविल्यानातर त्याला कोण अडवू शकणार आहे. अणु करारात हेच होत आहे. सुरुवातीला भाजप विरोधात होते. पण या ना त्या कारणात अडकवून, कोन्ग्रेस नि त्यांना फोडून त्यांचे मन वळविले आणि अणु करार एकदाचा पदरात पडून घेण्याचे निश्चित केले.
अनु ऊर्जेपासून मिळणारी विजेबरोबर शेकडो संभाव्य धोके आहेत ज्यावर आजतागायत उपायच नाहीत व त्यातून पण हि वीज काही स्वस्तात पदरी पडणार नाहीये हे माहित असून सुद्धा सरकार हे करायला का धजावत आहे देव जाने.
(वर्षाव)
छ्या छ्या, आजकाल बायका दारू पिऊ लागल्या. बीयर, वाईन आणि लिकरमधला फरक तरी कळतो का त्यांना? निदान दारू पिऊन मिपावरती धागे तरी टाकू नयेत. धागे कसले, कॉकटेलमध्ये भिजून ओल्यागिच्च झालेल्या कागदी स्ट्रॉ. आजकाल त्याही मिळत नाहीत. माझ्याकडे एक शेवटची स्ट्रॉ आहे ती टाकून देतो. मग बघतोच उंटाची पाठ कशी मोडत नाही ते.
----------------------------------------------------------------------------------------------
लाहोल बिलाकुवत. तौबा तौबा. या काफरांची ही मिजाज! हे अल्ला परवरदिगार, आता तूच माझं रक्षण कर रे बाबा या रावणी पिठल्यापासून.
एक मत
आजकाल मिपावर बऱ्याच चर्चा चालू आहेत...सैपाक, मुलीनी दारू पिणे, सरकारने किती करोड खर्च करावे, मोठाल्या दुकानातून समान आणणे, मुसलमान धर्मातील अतिरेकी मते आणि काय काय...
एक अस्सल मराठी माणूस म्हणून आम्हीही या सगळ्यात हिरीरीने भाग घेत आहोत, घेत राहू....बरेच धागे अप्रकाशित झाले, काही वाचनमात्र झाले. आम्हाला उगाचच एक प्रश्न पडला कि अशा चर्चांना काही धरबंध असावा कि नाही? म्हणजे काय प्रमाण असावे? महिन्यातून किती वेळा अशा चर्चा व्हाव्यात? आणि याविषयी आम्ही एखादा कौल काढावा काय?
आपल्यासारख्या थोरामोठ्यांकडून या समस्यांवर काही प्रकाश पडेल अशी आशा आहे.
मिसळपाव
