Skip to main content

झेंडा फडकणे...!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 21/08/2010 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
ही एक मोठी मजेशीर गोष्ट आहे. तितकीच करूणही... आम्ही कॉलेजला असतांना अनेक मित्रमैत्रिणी लाभल्या. असेच एकदा एका मैत्रिणीसोबत मी इव्हिनींग वॉक करीत होतो. तेव्हा ती रस्त्यातच पोट धरून गपकन् बसली. कळवळू लागली. तिला खूप वेदना होत असाव्यात. मी भांबावलो. 'काय झालं? अपेंडीक्स दुखतंय का? तुला स्टोनचा त्रास आहे का? मग होतंय तरी काय तुला?' मी प्रश्नांच्या फैरी झाडत माझं वैद्यकीय ज्ञान पाजळत होतो. त्यावर ती कसनुसं तोंड करीत म्हणाली, 'अगोदर मला रुमवर जाऊन टॅबलेट घ्यावी लागेल. प्लिज पटकन् एखादी रिक्षा कर.' मी धावाधाव करून एक रिक्षा आणली व तिला रुमवर सोडलं.

महा विडंबन स्पर्धा

लेखक आमोद शिंदे यांनी शनिवार, 21/08/2010 04:24 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच एका चर्चेत एक महावाक्य वाचलं आणि लक्षात आलं की हा तर समस्त विडंबकांसाठी अफलातून कच्चा माल आहे. तेव्हा म्हंटलं आपणंच एक मिपावर छोटीशी स्पर्धा आयोजित करु. युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् || ह्या धाग्यावर जो ह्या महावाक्याचे सर्वात दर्जेदार बिडंबन करुन दाखवले त्याला ह्या आठवड्याचा बिडंबक पुरस्कार देण्यासाठी मी स्वतः सरपंचाकडे शिफारस करेन. तर लोकहो येउद्यात एक से एक विडंबने.

माझा अजुन एक लेख(?)

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 21/08/2010 00:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार्,नमस्कार.......... आता बारा वाजलेत्('प्रकाशित करा' दाबल तेव्हा १२:४०),उद्या ४.३०ला उठुन,,,,,,,,,पहीला ठाणे व नंतर पुणे.........बापुंचे पैसे न वापरता जन्मात पहील्यांदा प्रवास करणार! पुणे व तिथल्या लोकांबाबत आपल्याला खुप आदर आहे हो,हे तुम्हाला सांगायची तर गरजच नाही.

केळ्याचे काप

लेखक सूड यांनी शनिवार, 21/08/2010 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी श्रावण पाळणार्‍यांची जाम पंचाईत झाली असेल नाही, कधी श्रावण सरतोय आणि कधी घासासोबत तो वास येतोय असं झालं असेल ना !! मग एक उपाय आहे ती म्हणजे ही पाकृ, श्रावण पाळल्याचं समाधान आणि मासळी खाल्ल्याचं सुख (काहीजणं दुधाची तहान ताकावर म्हणतील याला). तसा आमचा बाराही महिने श्रावण पण पाकृ आहे ती खास मछलीबिन सावन के पानी में तडपने वालों के लिये.

गुगलवीन नाही दुजा आधार

लेखक विकास यांनी शुक्रवार, 20/08/2010 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकाळी आकाशवाणीवर सकाळच्या वेळेस ऐकलेले "गुरूवीण नाही दुजा आधार" हे गाणे आठवले. अर्थात त्याचे कारणः यंत्राच्या प्रभावावरील लेख आहे, पहीला अनुयायी कसा मिळवावा हे नाही. :-) तर जो शिष्याला ज्ञान देतो, जगण्याचा मार्ग दाखवतो, दिशा देतो वगैरे वगैरेला आपण गुरू म्हणतो. तो अध्यात्मिकच असला पाहीजे असे अजिबात नाही. म्हणून "गुरूवीण नाही दुजा आधार" म्हणले आहे. आता प्रत्येकाला गुरू असतोच असे नाही.

राजीव'जींना ६६व्या जयन्तीनिमित्त विनम्र अभिवादन! ..... WE STILL MISS YOU..~~ RAJEEV'JI! LOVE YOU!

लेखक मृगनयनी यांनी शुक्रवार, 20/08/2010 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~ आज २० ऑगस्ट, २०१० राजीव'जी, तुमच्या ६६व्या जन्मदिनानिमित्त तुम्हाला विनम्र अभिवादन! आज तुम्ही असता.... तर देशाचे चित्र कदाचित वेगळे असते! ...... WE MISS YOU!

हा पहिला अनुयायी कसा मिळवायचा/मिळतो/ते?

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शुक्रवार, 20/08/2010 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तुत धाग्यावर आता २३० पेक्षा जास्त प्रतिसाद आलेले आहेत. यापुढील चर्चेकरता नवा धागा उघडावा. - संपादक मंडळ माझा ऑफिसमेट जयंती (हो, हे मुलाचं नाव आहे, जयंती प्रसाद) अधूनमधून 'बाबागिरी'बद्दल बोलतो. 'बाबा' म्हणजे बाबा अथवा वडील नव्हे, "बाबा" म्हणजे भोंदूबाबा, बाबा-बुवा-बापू-माता-गुरू मधले बाबा! कालसुद्धा जयंती अमका माणूस फारच बाबागिरी करतो असं मला सांगत होता. म्हणून मी त्याला व्याख्या विचारली, "'बाबा' म्हणजे नक्की कोण?" त्याचं उत्तर अगदीच चमत्कारिक नसलं तरीही विचार करण्यायोग्य वाटलं.

ढिसाळ, ढोबळ 'पीपली लाईव्ह'

लेखक चिंतातुर जंतू यांनी शुक्रवार, 20/08/2010 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
'पीपली लाईव्ह'बद्दल सध्या बरीच चर्चा चालू आहे. चित्रपट खूप आवडल्याचं सांगणारे अनेक भेटले म्हणून अखेर तो पाहिला. चित्रपटाचं थोडक्यात सूत्र असं सांगता येईलः शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा गंभीर आणि करुण प्रश्न आहे, पण आपली माध्यमं, राज्यकर्ते वगैरे तो प्रश्न अतिशय उथळपणे आणि क्रूरपणे हाताळतात; आपल्या स्वार्थापुरता त्याचा वापर करून घेतात. त्यामुळे प्रश्न अधिकच चिघळतो आणि अधिकच गंभीर आणि करुण बनतो. एक विचार म्हणून हा पटण्यासारखाच आहे. त्यामुळे चित्रपटाद्वारे मांडलेल्या विचारसरणीशी माझे मतभेद नाहीत. चित्रपटाची मांडणी उपहासात्मक आहे. यातले शेतकरी-गावकरी सालस, निरागस वगैरे नाहीत. द.मा.

हा कुठला बरे आजार/विकार?

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 20/08/2010 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
हा कुठला बरे आजार/विकार? वाचनाच्या बाबतीत ग्यानबा फ़ार अभागी मनुष्य आहे. अभागी या अर्थाने की साहित्यिक क्षेत्रात विपुल साहित्य उपलब्ध असूनही ते जास्तीत जास्त वाचण्याचे भाग्य त्याला फ़ारसे लाभले नाही. कधी आर्थीक स्थितीमुळे पुस्तके विकत न घेऊ शकल्यामुळे तर कधी भौगोलीक स्थितीमुळे पुस्तके अनुपलब्ध असल्यामुळे असे घडले असावे. पण हे सत्य असले तरी मात्र पुर्णसत्य नाही. खरे हे आहे की त्याला एक आजार आहे. आणि तो आजार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याला वाचायला खूप आवडतं, खूपखूप आवडतं. विषयाचेही बंधन नाही, काहीही आवडतं.