Skip to main content

छोट्या जाहिराती.

लेखक मुक्तसुनीत यांनी मंगळवार, 24/08/2010 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : हा धागा काढण्यामागचा उद्देश कुणाच्याही भावना दुखवाव्यात असा नाही. त्यातून , कुणाला तसे (अकारण) वाटल्यास त्या सर्वांची आधीच घाऊक माफी मागत आहे. एका वृत्तपत्रात अलिकडे वाचलेल्या छोट्या जाहिराती : १. पाहिजे : पूर्वी सारखी टिकणारी मेंदी. रंग दोन दिवसांत जाऊन विचित्र दिसायला नको. पक्का हवा. २. पाहिजे : पडल्यापडल्या झोप लागेल असा पलंग. झोप येईल अशी खोली. खोलीत जाऊन झोपावेसे वाटेल असे घर. घरात राहावेसे वाटेल अशी जीवनशैली. शैली परवडेल असे जीवन. ३. पाहिजे : श्री. पांडुरंग पंढरपूरकर यांच्याशी एकदा तरी भेट घडवून आणून देईल असा एजंट.

हिंदीतून मराठीकडे

लेखक विश्नापा यांनी मंगळवार, 24/08/2010 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतून हिंदी चित्रपटांची गाणी तयार करता येतील काय? उदा तुला पाहिले तर जाणवले मला सजणी, प्रेम असते हे वेडे सजणी (तुझे देखा तो ये जाना सनम) बघा प्रयत्न करुन......
काव्यरस

एकदा तरी भेट देई मज पांडूरंगा

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 24/08/2010 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा तरी भेट देई मज पांडूरंगा
एकदा तरी भेट देई मज पांडूरंगा तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||धृ|| किती वारी चालू आता किती दिंडी चालू संसारातून सोडवी आता नको वेळ घालू आतूरले डोळे माझे वाहे चंद्रभागा तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||१|| किती ग्रंथ वाचले अन म्हटल्या मी ओव्या संतांच्या साथीने कितीक आरत्या म्हणाव्या शिणलो रे मी आता होई पापभंगा तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||२|| जळावीण मासा जिव धरी कैसा मायेविणा पोर प्रेम पाही जैसा नको धरू राग आ
काव्यरस

मेंदीचा दरवळ

लेखक मितान यांनी मंगळवार, 24/08/2010 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात कोणाला तरी मेंदीची आठवण आली. आणि मग राखी पौर्णिमेला मेंदी काढूया असे ठरले. इथे पाकिस्तानी दुकानात मेंदीचे तयार कोन मिळतात. पण त्यात कोणतीकोणती रसायने मिसळली असतात म्हणे. मग काय कोन पण आपणच करूया असे ठरवले. कोणीतरी भारतातली मेंदी शोधून आणली. मोठ्या उत्साहात एका पातळ कपड्याने मेंदी चाळली. मग ती पाणी आणि निलगिरी तेल घालून लोण्याएवढी पातळ भिजविली. कात्री, प्लास्टिकचे पेपर, चिकटपट्ट्या यांचा एवढामोठ्ठा पसारा करत कसेबसे ४ धड कोन तयार केले. त्यात मेंदी भरली. नि वर रबर लावून ते बंद केले. सगळ्या घरभर मेंदीचा वास, निलगिरी तेलाचा वास घमघमत होता. मन भरून तो वास घेतला.

बन्धन भावनेचं!!

लेखक स्पंदना यांनी मंगळवार, 24/08/2010 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
(मागच्या वेळी केलेल नमन आता या वेळी सुद्धा आहे, पण गणपा भाउ, जागुताई अन केशवजीं बरोबर फोटो अन व्हिडिओ साठी आदरणीय बहुगुणी अन आपले सर्वांचे लाडके धमाल मुलगा यांचे जाहिर रित्या आभार!! तुम्ही मदत केली नसती तर, कुठली अपर्णा, अन, कुठला हा लेख!!) अरे हो राहिल प्रिय डॉन रावांनी मला अक्षर रंग अन इतर सुविधा देण्याच आश्वासन दिल्या मुळे इथुन पुढे मीही थाटात रंग बदल बदल के लिहिणार आहे!! ठ्यांक्यु ह डॉन साहेब!!

विश्वनाथ आनंद "भारतीय नसल्यामुळे"...सॉरी सॉरी सॉरी...

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 24/08/2010 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6425945.cms मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ग्रॅंड मास्टर बुद्धीबळपटू विश्वनाथ आनंद हा भारतीय नाही असा शोध लावला आहे. त्याला हैद्राबाद विद्यापीठ सन्माननीय डॉक्टरेट देणार आहे. त्याकरता ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अर्थात मनुष्यबळ विकास मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागते. त्यावेळेस त्या मंत्रालयाने हा शोध लावला.

बिजापूर ते सोलपूर बस प्रवास....

लेखक किल्लेदार यांनी मंगळवार, 24/08/2010 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वीकेंडला "दार-उल्-सल्तनत" बिजापूर ला जायचा योग आला. त्याचे फोटोज टाकीन तेव्हा टाकीन पण परतीच्या प्रवासात काही छान (माझ्या मते) फ्रेम्स मिळाल्या. परतीचा प्रवास तसा कण्टाळवाणाच पण या ट्रिप मधे देव माझ्यावर निहायत खूश होता. समोर हिरवा-निळा पट होता.

नारळी भात

लेखक प्राजक्ताचि फुले यांनी मंगळवार, 24/08/2010 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
नारळी भात साहित्य : १ वाटी बासमती तांदुळ, १ ओल्या नारळाचा चव,पाउण वाटी साख्रर, मनुका,काजु,बदाम, वेलदोडे पुड, लवंग, केशर, खाण्याचा रंग,लिंबु, साजुक तुप,चिमुटभर मीठ पाकक्रुती: प्रथम थोड्या तुपावर लवंगा टाकुन त्यावर तांदुळ भाजुन घेणे. त्यानंतर त्यावर आधणाचे पाणी टाकुन भात मऊ मोकळा शिजवुन घ्यावा. त्यात चिमुटभर मीठ टाकावे. १ चमचा तुप घालावे.भात शिजला की परातीत काढुन घ्यावा. नंतर १ वाटी पाणी घेउन त्यात पाउण वाटी साखर घालुन पक्का पाक करावा. नंतर त्यात नारळाचा चव घालावा. त्यात लिंबु पिळावे व १ चिमुटभर रंग घालावा. त्यानंतर शिजवलेला भात घालावा.

झोळीचा खांब

लेखक अवलिया यांनी मंगळवार, 24/08/2010 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
टिंग टिंग बेल मारुन बस निघाली. बसच्या आवाजात आणि धुराळ्यात परत डोळे मिटुन घेतले. पुढला स्टॉप बुरुडगाव. तिथे उतरुन परत पुढे सहा सात किलोमीटर जायचे. मी विचार करत असतो. गाडी चालत असते. तेवढ्यात वेग हळु हळु कमी होतो. गावात गाडी शिरल्याची जाणीव होते. डोळे उघडतो. बाहेर पहातो. गाडी स्टँडला लागते. पानी बोटल, समोसे, शेंगा गरम आवाज यायला लागतात. सॅक उचलतो. खाली उतरतो. जवळपास दहा वर्षांपुर्वी आलो होतो. फारसा काही बदल नाही. तीच गर्दी तोच गोंगाट. माणसं अजुन वाढलेली. स्टँड तेवढाच. कॅन्टीनकडे गेलो. चहा डोनट पोटात टाकला, बाहेर येउन पानपट्टीवरुन सिगारेट पाकीट घेतलं. धुर सोडत पुढे काय करायचं विचार करु लागलो.