संपादकांच्या फुलक्या
संपादकांच्या फुलक्या भाजायचे ठरले तर टोपलंभरुन तरी हमखास जमतील. त्या टम्म फुगलेल्या फुलक्या मार्मिक टिचकी मारून फोडल्या की पचायला हलक्या होतील व त्या खाल्ल्यानंतर मस्त मेजवानीच्या डुलक्याही लागतील...
त्यावेळी आम्ही लेखन क्षेत्रातले उमेद्वार होतो. अजूनही आहोतच, परंतु तेव्हा फारच नवखे होतो. पेपर चाळायचे, 'निवेदने' कॉलम भरारा वाचायचा, पटतील ते विषय पत्त्यांसह उतरवून घ्यायचे. अन् कागद पेन घेऊन लेखनसमाधी लावून घ्यायची. एकेका लेखासाठी चार पाच खर्डे होत. शेवटी हे लिहू की ते करता करता सगळेच उतरुन पाठवून द्यायचो. काय जे लागेल ते त्यांनीच वेचावे असा हवाला टाकून लेख प्रकाशित होण्याची वाट पहात रहायचं.
कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड
कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड
या धाग्यातील प्रतिसादांमध्ये मंदार व प्रसाद जोशींनी म्हटले होते:
">कोथरुड थोडं सं रुड वाटटं नाई ?!!
खत्रूड शी यमक जुळतं नै, कोथरूडचं
>>>> ह्यावर एक मस्त कविता लिहिता येईल !!१
चला यमकं जमवुया"
मंग काय? आसली भारी सिच्यूएशन दिल्यावर लगेच लिहून काढली कविता. वाचा तर मग:
कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड
म्या जवा भेटाया जातो काशीला....
तवा... तवा...
काव्यरस
माहिती हवी आहे..
राम राम,
ड्रुपलचा वापर करून मिपा, मीमराठी यांसारखी संस्थळे उभारण्याकरता आवश्यक ते तांत्रिक ज्ञान असलेल्या व्यक्तिंबद्दल कुणास काही माहिती असल्यास मला व्य नि ने अवश्य कळवावे.
मिपाच्या व्यवस्थापनासोबतच मिपाचा तंत्रविभाग नीलकांत पाहतो हे मला माहीत आहे. नीलकांत व्यतिरिक्त अन्य काही नावे आपल्या माहितीत असतील तर मला कृपया कळवावे ही नम्र विनंती..
धन्यवाद,
आपला नम्र,
तात्या अभ्यंकर,
(संस्थापक - मिसळपाव डॉट कॉम)
यंत्राद्वारे मिळणार्या निष्कर्षांवर किती अवलंबून राहायचे?
आजकाल कोणत्याही डा.कडे गेले असता ते पेशंटला सर्वप्रथम विविध प्रकारच्या चाचण्या करावयास लावतात..त्या प्यथलोजी lab मधून मिळणारे निष्कर्षसुद्धा वेगवेगळे असतात. पूर्वीच्याकाळी अश्या चाचण्या न करताही वैद्य रोगनिदान करत असत.यंत्रापेक्षा पेशंट काय लक्षणे सांगतो याला जास्त महत्व होते.आजकाल मानवाच्या मनापेक्षा यंत्र काय सांगते याला जास्त महत्व प्राप्त झाले आहे.तुम्हाला काय वाटते.?
नाचणी वडी
एक पौष्टिक आहार्--नाचणी वडी
साहित्य-एक वाटी नाचणी पीठ,अर्धा वाटी खोबरे,दीड वाटी साखर ,थोडी वेलची पूड्,एक चमचा तूप
कृति-प्रथम तुपावर नाचणी पीठ व खोबरे भाजून घ्यावे.साखरेत थोडेसे पाणी घालून घट्टसा पाक करावा,पाकात वेलची पूड ,भाजलेले पीठ व खोबरे घालून मिश्रण घट्ट होइपर्यंत हलवावे.ताटाला तूपाचा हात फिरवून मिश्रण ओतावे ,गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.
नाचणी अत्यंत पौष्टिक असल्यामुळे लहान मुले,गर्भवती महिला,म्हातारी माणसे ह्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त. नाचणीच्या रंगामुळे बरेचजण ती खायचे टाळतात्,वड्यांचा रंग कोकोसारखा दिसतो म्हणून कोणीही आवडीने खाऊ शकेल
मिसळपाव