Skip to main content

मोगरा

लेखक शुचि यांनी बुधवार, 01/09/2010 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
हा मोगरा नक्की चोंबडा आहे माझी पक्की खात्री आहे तू जेव्हा कधी स्वप्नात येतोस माझ्याशी गुजगोष्टी करतोस हा मोगरा बहरतो नक्की हा आपल्या गोष्टी ऐकतो चोरून ऐकतो अन मोहरतो लक्षलक्ष चांदणकळ्या मिरवतो अंगोपांगी सौंदर्यानी ऊतू जातो टप्पोर्‍या फुलांनी डवरून धुमसतो सुगंधी निश्वास उसासे टाकतो नक्कीच!! कारण आजकाल हा रोज बहरतो आजकाल मोगरा रोज बहरतो ....!!!
काव्यरस

माणूस म्हणून जगण्याची ही किंमत....

लेखक दशानन यांनी मंगळवार, 31/08/2010 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस म्हणून जगण्याची ही किंमत नशीबाच्या खेळामुळे जरा जास्तच होती अस्तित्व जेथे गहाण पडले तेथे शब्दांची लकीर खुप मोठी होती घाव शब्दांचे चार छोटे होते पण जख्म जरा मोठी होती लपवावे काय आता येथे व्रण चेहर्‍यावर पडले होते नको नको म्हणत असताना दर्द पदरी पडला होता लवपावे काय व दाखवावे काय आपल्यातच खोट दिसली होती चार पुस्तके कमी शिकलो त्यांची ही किंमत खुप वजनी होती काय खरं व काय खोटं नशीबाची थट्टाच थोरं होती वाहत जावे असेल ठरवले तरी जमीनीचे वळण खुप वेगळे होते तडफडत जावे कोठे तरी येथे आरसा दाखवणारे अनेक होते माणूस म्हणून जगण्याची ही किंमत जरा खरंच मोठी होती... मेल्यावर तरी समाधान लाभेल मुक्त हो
काव्यरस

संगणकाच्या मदतीने उत्कृष्ट लेखक बनण्याची कळा

लेखक संतोषएकांडे यांनी मंगळवार, 31/08/2010 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
विषय नक्की करा. संगणक चालू करा. गूगल ओपन करा. निवडलेला विषय त्यांत टाका. अँटर द्या. कमीत कमी सात आठ फाइली तरी आढळतील. प्रत्येकीतून दोन चार पॅरेग्राफ कॉपी करून ' एक्सेल वर्ड ' मधे पेस्ट करा. नविन फाइल ओपन करून त्यात सेव केलेले पॅरेग्राफ्स इकडे तिकडे कुठेही जागा मिळेल तिथे पेस्त करा. आणी ब्लोग वर प्रकाशित करा बरेचशे वाचतील. बर्याचशांनां कळणार नाही. पण घाबरायचे कारण नाही. ते समजतील, ' लेखक उंच दर्ज्याचा आहे....' बरेचशे प्रतिभाव मिळतील. आणि एक उत्कृष्ट लेखक म्हणून प्रसिध्ध व्हाल. एकदम पक्की ग्यारंटी.

जरा मदत करा हो.......

लेखक अनंत छंदी यांनी मंगळवार, 31/08/2010 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
मला गुगल बुक्समधून काही ई बुक्स उतरवून घ्यायची आहेत त्याकरिता असलेल्या गुगल ई बुक डाऊनलोडर या सॊफ़्टवेअरला मायक्रोसॊफ़्ट डोट नेट ३.१ एसपी १ हे सॊफ़्टवेअर आवश्यक आहे ते मी मायक्रोसॊफ़्टच्या व अन्य वेबसाईट्सवरून उतरून घेण्याचा किमान सहा सातवेळा प्रयत्न केला परंतु पूर्ण सॊफ़्टवेअर डाऊनलोड झाले तरी ते इन्स्टॊल करत असताना करप्ट असल्या संदेश येतो व इन्स्टॊलेशन पूर्ण होत नाही. मी अगदी कंटाळून गेलो आहे. कुणाकडॆ जर हे सॊफ़्टवेअर असल्यास मला suhas124[@]yahoo.com या पत्यावर झीप फाईल मेल करा अशी विनंती आहे. धन्यवाद! ता.क.: जर डॉट नेट व्यक्तिरिक्त वापरायचे ई बुक डाऊनलोडर सॉफ्टवेअर कुणाकडे असेल तरी द्या.

सैरभैर

लेखक अवलिया यांनी मंगळवार, 31/08/2010 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
गजर होतो. पटकन त्याचा आवाज बंद करून उठतो. भरभर आवरून चहा ठेवतो. गरमागरम वाफाळलेला चहा घेत पेपरवर नजर टाकतो. त्याच त्या बातम्या असतात, बदल काही नसतो, पण वाचल्या नाहीत तर दिवसभर चैन पडत नाही. पेपर चाळून झाला की स्नान, देवपूजा आटोपून भाजी करायला घेतो. एकीकडे भाजी शिजत असताना कणीक भिजवतो. पोळ्या करून नाश्ता करून डबा घेऊन कामावर जायचे. दिवसभर काम करून मधल्या वेळेत डबा खाऊन संध्याकाळी परत घरी यायचे. येतानाच काहीतरी भाजी घेऊन, दूध घेऊन यायचे. आल्यावर स्वच्छ होवून देवापाशी दिवा लावायचा. दूध तापवायचे. वरण भाताचा कुकर लावायचा. सकाळची भाजी गरम करायची. पोळ्या असतातच. कुकर झाला की जेवून घ्यायचे. जरावेळ ट

मराठी पुस्तके कधी बेस्ट सेलर होणार ?

लेखक शेलार मामा मालुसरे यांनी मंगळवार, 31/08/2010 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी पुस्तके खपतात (विक्री) नाही असे नाही. पण हॅरी पॉटर सारखी इंग्रजीतील अनेक पुस्तके महाराष्ट्रात आणी देशात प्रचंड खपतात आणि "बेस्ट सेलर' ठरतात. साहित्य संमेलनातून होणारी अनेक विषयावरील अनेक पुस्तकांची विक्री तर डोळे दिपवणारी असते. मोठ्या संख्येने अनेक पुस्तके विकली जाणे वेगळे व एखादे पुस्तक रेकॉर्डब्रेक खपणे वेगळे. मराठीत तर हजारो पुस्तके खपली तरी डोक्‍यावरून पाणी गेले अशी परिस्थिती असते. त्यामुळे नेहमी प्रश्‍न असा पडतो की, मराठी भाषिकांच्या सुशिक्षित महाराष्ट्रात एखाद्या मराठी पुस्तकांचा विक्रमी खप का होत नाही? ती "बेस्ट सेलर' का ठरत नाहीत? तुमचे यावर काय मत आहे ?

मिपावरची दर्जेदार लेखनाची उदाहरणे.

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 31/08/2010 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
दर्जेदार लेखन म्हणजे काय? हा अत्यंत गहन प्रश्न आहे. चांगल्या लेखनाची व्याख्या करताना भल्याभल्यांची दमछाक होते. कारण काहीही व्याख्या केली, तरी उत्कृष्ट लेखन ती व्याख्या छेदून दशांगुळे वर उरतंच. मग ते सामावून घेण्यासाठी पुन्हा व्याख्या बदलायची आणि पुन्हा पुढची दहा अंगुळं पसरणारं काहीतरी सापडलं की ये रे माझ्या मागल्या सुरू होतं. पण कधी कधी चांगलं लेखन म्हणजे काय, याचं उत्तर अश्लील म्हणजे काय याला एकाने दिलेल्या उत्तराप्रमाणे होतं "चांगलं लेखन म्हणजे काय हे मला सांगता येणार नाही, but I will know it when I see it". आपल्यापैकी बहुतेकांना हा आतला आवाज असतो - जो चांगल्या लेखनाला दाद देतो.

“( अ ) द्वितिय ” प्रेम

लेखक निरन्जन वहालेकर यांनी मंगळवार, 31/08/2010 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
“( अ ) द्वितिय ” प्रेम प्रीतीत संगत तुझी, मज कधी ना लाभली, साथ संगत नव्हती कुणाची, पण वेदनांनी मज दिली. खेद नाही, राग नाही, प्रेम तव जरी ला लाभले, वेदनांशी “इश्क” माझे, प्रेमांत तुझिया जाहले. निरंजन वहाळेकर
काव्यरस

लगी रहो मुन्नीबाई!

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 31/08/2010 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
काळीज विदीर्ण करणारी ती बातमी ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. अंगातील त्राण निघून गेल्यासारखं झालं. गात्रं शिथील झाली. हाडांचा भुगा होऊन त्यांची पावडर हवेत धुक्यासारखी उडायला लागल्याचा भास झाला. धरणीमाता दुभंगून आपल्याला उदरात घेईल तर बरं, असं वाटायला लागलं. तशीच भयाण परिस्थिती निर्माण झाली होती... ... दबंग`मधील `मुन्नी बदनाम हुई` या गाण्यावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी कुण्या नतद्रष्टानं न्यायालयात धाव घेतली होती... देशहितकारक, संस्कृतीरक्षक, समाजोपयोगी कार्य कुणी करायला घेतलं, की त्यात खोडा घालणारे उपटसुंभ रिकामटेकडे अनेक असतात.