Skip to main content

वृत्तांविषयी माहीती हवी आहे

लेखक अमोल मेंढे यांनी बुधवार, 08/09/2010 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
मला मराठी भाषेतील सगळ्या वृत्तांविषयी माहीती हवी आहे. त्यांच्या मात्रा, चरण वगैरे. उदाहरणांसकट. आणि ते काय असतं सलाते सलानाते? जाणकारांनी कृपया लक्ष द्यावे.

गौळण: असा काय करशी तु रे नंदाच्या कान्हा

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 08/09/2010 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
गौळण: असा काय करशी तु रे नंदाच्या कान्हा
असा काय करशी तु रे नंदाच्या कान्हा उगा खोड्या काढी मज सोड ना ||धृ|| गोड बोलणे तुझे लाघवी यमुनातीरी वेणू वाजवी करशी मग तु रे बळजोरी मीही सांगे यशोदेला तुझा खोटा गुन्हा ||१|| दह्यादुधाचे विरजण लावले लोणी सारे विकण्या निघाले वाट अडवण्या आडवा येई उपकार कर माझ्यावरती आता जावू दे ना ||२|| तुझ्या रुपात एकरूप झ
काव्यरस

अट्टल चोरटा मी........!!

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 08/09/2010 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
अट्टल चोरटा मी........!! नभात हिंडतांना आणि तारे न्याहाळतांना कळतच नाही मी कसा तल्लीन होवून जातो ते दृष्य डोळ्यात मी पुरेपूर साठवून घेतो आणि ते लुकलुकते लावण्य चोरण्याची मी चोरी करून जातो .....!! जीवनाचे विविधरंग उलगडणारे शब्द कुणीतरी सहज बोलून जातो अलगद पकडून ते शब्द मी तादात्म पावतो आणि दिव्यत्वाचे चार शब्द चोरण्याची मी चोरी करून जातो .....!! ऐकतांना गुणगुण, पापण्या थबकतात नजर स्थिर होवून मन डोलायला लागते कुणीतरी मधूर तरंग हवेवर पेरून जातो आणि ती नादब्रम्हाची लय चोरण्याची मी चोरी करून जातो .....!! चोरतो मी ज्ञानमार्ग विवेकाच्या वृद्धीसाठी सद्‍गुणाची उचलेगिरी अंतराच्या

कच्छी दाबेली

लेखक भानस यांनी बुधवार, 08/09/2010 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
वाढणी : चार माणसांकरिता ( प्रत्येकी दोन या अंदाजाने...... करताना दीडपट प्रमाणाने करा बरं का, म्हणजे कमी का केलीची भुणभूण होणार नाही ) साहित्य : चार मध्यम-मोठे बटाटे उकडून + कुस्करून एक मोठा कांदा बारीक चिरून एका मोठ्या डाळिंबाचे दाणे ( डाळिंब न मिळाल्यास लाल/काळी द्राक्षे मध्ये चिरून घ्यावी. तीही नसतील तर मनुका घ्याव्यात.

परा, सहज आणि स्पा ह्यांचे अभिनंदन !

लेखक मिसळभोक्ता यांनी मंगळवार, 07/09/2010 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
परिकथेतला राजकुमार ह्यांचे "इतिहासाचे पुनर्लेखन" ३१५ प्रतिसादांसकट पहिल्या क्रमांकावर आले, ह्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. मिपाच्या इतिहासात ३०० च्या वर प्रतिसाद घेणारे हे पहिले लेखन ठरले. त्याबद्दल अतिशय आनंद होत आहे. ह्याबद्दल परा ह्यांना यापुढे लारा असे संबोधावे, अशी मी सूचना करतो. तसेच, आमचे हिरवे स्नेही सहज ह्यांनी आमचे निळे स्नेही श्रीकृष्ण ह्यांच्याबद्दल "सत्य की मिथ्या" लिहून टॉप २५ मध्ये जोरदार आगमन केलेले आहे.