का होत असेल हो असं !?
माफ करा. जरा चावून चोथा झालेल्या, मेंदुचा भुगा करणार्या प्रश्नावर विचार करतोय. आजच बातमी कळली की माझ्या एका सहकार्याने, बॅचमेटने आत्महत्या केली? का केलं असेल त्याने? मुलगा दिसायला चांगला, घरची परिस्थिती उत्तम.. अगदी दर दोन आठवड्यांनी विमान प्रवास करु शके, इतकी. त्याच्या लग्नात त्याने एका प्रसिद्ध गायकाचा कार्यक्रम ठेवला होता. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधे अश्वपथाचे संचालन करण्याचा मान मिळवलेला.. नोकरी कुठल्याही आई-वडीलांना अभिमान वाटावी अशी.. वन ऑफ द बेस्ट अॅथलिट्स आय हॅव सीन.. सगळं कसं आलबेल (दिसायला तरी)...
....
मिसळपाव