Skip to main content

कारगिलचे युद्ध कुणाचे? आपल्या प्यार्‍या भारताचे कीं त्यावेळच्या सत्ताधारी पक्षाचे?

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 21/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
२६ जुलै २०१० हा कारगिलच्या युद्धातील विजयाचा ११वा गौरवदिन. गेल्या वर्षी या विजयाचा दहावा गौरवदिन होता. त्यात आपल्या सध्याच्या सत्ताधारी नेत्यांच्या वागणुकीबद्दल खालील लेख माझ्या वाचनात आला. लेखक आहेत 'हिंदुस्तान टाइम्स'चे श्री नीलेश मिश्रा. त्यांची जन्मपत्री मला माहीत नाहीं, म्हणजे कुठल्या पक्षाकडे ते झुकतात, कुठल्या पक्षाबद्दल सहानुभूती आहे वगैरे. इथे लिहिले आहे ते खरे आहे कीं नाहीं याचीही मला कल्पना नाहीं. पण 'हिंदुस्तान टाइम्स'सारखे जबाबदार वृत्तपत्र खोडसाळ वृत्ते छापेल असे वाटत नाहीं.

भेट तूझि अन मझि,,,,,

लेखक ज्ञानराम यांनी मंगळवार, 21/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
भेट तूझि अन मझि,,,,,स्मरते का रे तुला??? का तुही विणलास सन्सार माझ्या अबोल फुला तूच शपथा दिल्या, अन स्वप्नेही तूझिच होति, पण कालच्या स्वपनालि कळी नविन होति. पाहता तूला रे दारी ..लालि फुलून आलि, पण तूझ्या दोळ्यात तेव्हा मि रे अनोळखि होति... का वागलास असा..?? एकटा सोडूनि गेलास... मि वाट पाहत बसले... वचने तोडूनि गेलास... मज वाटायाचे रोज,,, तू येशिल मागे परतुनि वचने दोघान्चि होति.. अर्ध्यावर... गेलास...मोडूनि मी आज हि पाह्ते तू़जला.. माझ्याच दोल्यान्त ....ये लवकर ये रे अता.... आज... होईल देहाचा अन्त...........

(भुंक न कुतऱ्या)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 21/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबनाची पार्श्वभूमी: मला बर्‍याचदा काहीकाही शब्द काहीच्याकाही ऐकायला येतात. विशेषतः जुनं रेकॉर्डींग असेल तर गाण्यातले शब्द काही असतात आणि मी काहीतरी भलतंच ऐकून अर्थाचा अनर्थ करते. "कानपूर मे हडताल" हे मला पडलेलं नाव बरंच जुनं आहे. पण मिपाची कृपा, या अवगुणामुळे उगाच आपण भावही खाऊ शकतो हे लक्षात आलं.
काव्यरस

प्रेम......................

लेखक utkarsh shah यांनी मंगळवार, 21/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे काय? आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो? आपण कधी त्याचा विचार करतो का? प्रेम म्हणजे काय? एकदा एका प्रेयसीनं तिच्या प्रियकराला विचारलं, सांग बरं तुला मी का आवडते? तू माझ्यावर प्रेम का करतो? अगं, मी अशी काही कारणं सांगू शकत नाही. पण तू मला आवडतेस हे मात्र नक्की. अरे तू माझ्यावर प्रेम करतोस, मग तुला माहित नाही, तू का प्रेम करतोयस ते? तुला मी का आवडते हेच माहित नसेल तर तुला माझ्याविषयी वाटणाऱ्या भावनेला प्रेम तरी का म्हणायचे? प्रिये, अगं खरंच. मला त्याचं कारण माहित नाहीये. पण तरीही माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी ते सिद्ध करू शकतो. सिद्ध काय कसंही करू शकशील रे.

खराब रस्त्यांचे फायदे

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 21/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
खराब रस्त्यांचे फायदे
भारतातील रस्ते अन त्यांची स्थिती यावर मी पिएचडी करायची ठरवीलेली आहे. भारतात कोठेही जा. बिहार, झारखंड, महाराष्ट्र, पश्विम बंगाल, उत्तरप्रदेश, तमिळनाडू. सगळ्या ठिकाणी सारखीच परिस्थिती आहे. त्यातल्या त्यात गुजरात मध्ये थोडीफार परिस्थिती बरी आहे. ग्रामिण भागात तर रस्ता १० चा २० होतो. काही ठिकाणी बरा रस्ता असल्याने तो १० चा १५ होतो. १० चा १० असणारे रस्ते फारच दुर्मीळ. (१० चा x असणे हे रस्त्याची परिस्थिती मोजण्याचे आमच्याकडचे परिमाण आहे.

जन्मभराचं ऋण !

लेखक जिप्सी यांनी मंगळवार, 21/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार दुपार. असाच निवांत पडलो होतो,शुक्रवारी रात्री ट्रेकला निघून रविवारी सकाळीचं परत आलो होतो,आणि जेवून झाल्यावर मस्त झोपायच्या तयारीत होतो. आणि दार वाजलं! आत्ता एवढ्या दुपारी कोण आलं असेल ? असा विचार करतच दार उघडलं तर एक सेल्समन ! जेल साबण आणि फ्लोअर क्लिनर वगैरे घेउन आलेला होता. चेहेर्‍यावर अतिशय दमलेला भाव, उन्हातनं आल्यामुळं घामाघूम झालेला. मी त्याला आत घेतलं,फॅन लावला आणि पाणी आणायला आत गेलो.पाणी भरत असतनाच मला त्याच्या जागी मीच दिसायला लागलो. २००४ साल असावं, मी पुण्यात येउन सुमारे वर्षभर होउन गेलेलं होतं,ज्यासाठी आलो ते अजूनही गवसतं नव्हतं,जीवाची नुसती तगंमग चाललेली होती.

दहीबुत्ती

लेखक मितान यांनी सोमवार, 20/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
रावणपिठले, शेवभाजी अशा जळजळीत आणि झणझणित जेवणात शेवटी दहीबुत्ती असली की पोटात कसे गार वाटते ! अशी ही माझी आवडती दहीबुत्ती- सामग्री : - भात दही फोडणीसाठी जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग, अर्धा चमचा उडीद डाळ, तेल किंवा तूप. कृती: १ वाटी तांदळाचा भात शिजवून घ्यावा. थोडा गार झाल्यावर त्यावर दीड वाटी दही भातावर पसरून घावे. फोडणी तयार करताना मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता तडतडू दयावा. गॅस बंद करून त्यात उडीद डाळ घालावी. ती गुलाबी रंगाची झाली की ही फोडणी दह्यावर घालावी. अगदी खाण्याच्या वेळी चवीनुसार मीठ घालून हाताने चांगले मिसळून घ्यावे.

का होत असेल हो असं !?

लेखक चिगो यांनी सोमवार, 20/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
माफ करा. जरा चावून चोथा झालेल्या, मेंदुचा भुगा करणार्‍या प्रश्नावर विचार करतोय. आजच बातमी कळली की माझ्या एका सहकार्‍याने, बॅचमेटने आत्महत्या केली? का केलं असेल त्याने? मुलगा दिसायला चांगला, घरची परिस्थिती उत्तम.. अगदी दर दोन आठवड्यांनी विमान प्रवास करु शके, इतकी. त्याच्या लग्नात त्याने एका प्रसिद्ध गायकाचा कार्यक्रम ठेवला होता. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधे अश्वपथाचे संचालन करण्याचा मान मिळवलेला.. नोकरी कुठल्याही आई-वडीलांना अभिमान वाटावी अशी.. वन ऑफ द बेस्ट अ‍ॅथलिट्स आय हॅव सीन.. सगळं कसं आलबेल (दिसायला तरी)... ....