Skip to main content

स्टफ्ड मशरूम्स

लेखक स्वाती२ यांनी सोमवार, 04/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य १२ मोठे बटन मशरुम्स २ टे.स्पून बारीक चिरलेला कांदा २ टे. स्पून बारीक चिरून बेल पेपर ६-८ सोलून साफ केलेल्या कोलंब्या १/२ टी स्पून मिरे बारीक करुन १/४ टी स्पून इटालिय सिझनिंग ब्लेंड २ टे. स्पून परमेजान चीज १/२ कप मोत्झारेला चीज १ टी स्पून तेल कृती ओवन ३५०फॅ. ला तापत लावा. मशरूमचे देठ काढा. त्यातील ४ देठ बारीक चिरुन घ्या. कोलंब्या बारीक चिरुन घ्या. मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. पातेले तापले की त्यात तेल घाला. कांदा,मशरुमचे देठ घालून २-३ मिनिटे परता. आता त्यात बेलपेपर घालून २-३ मिनिटे परता.

अबईच्या शेंगा

लेखक जागु यांनी सोमवार, 04/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
अबब, अगबाई केवढ्या मोठ्या शेंगा ह्या संवादावरुन कदाचित ह्या शेंगांना अबई हे नाव पडल असेल. गुलमोहराच्या शेंगांप्रमाणे ह्या शेंगा लांब होतात.

इडली-माझी आवडती..

लेखक जासुश यांनी सोमवार, 04/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
इडली ची कृती निवेदिता तैं प्रमाणेच.. पुढे सांबार साठी गुगला.. किंवा मी दिलेली रेसिपी वापरा..कृपया ही रेसिपी शास्त्र शुद्ध नाही व ह्या बद्दल कमेन्टा मारत बसू नका. चव छान लागेल..ह्या सांबरची पण.. :) २ वाटी तूर डाळ धुवून त्यात पाणी व हळद व एक चमचा तेल घाला. व कुकरला शिट्या लावा . डाळ शीजली की घोटून घ्या. तेल गरम करून त्यात मोहोरी जिरे लसूण,चिरलेला कांदा,कढीपत्ता,लाल सुकी मिरची,चिरलेला �¤ �ोमॅटो घाला व शिजवा. मग त्यात घोटलेली डाळ घाला. चिंचेचा कोळ, गुळ व मीठ घाला. व सांबार मसाला घालून उकळी येऊ द्या. मग त्यात चिरलेली कोथिंबीर घाला.

झुणकाभाकरीची गोडी अन् वेडा कुंभार..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 04/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
विठ्ठला तू वेडा कुंभार..(येथे ऐका) वीर सावरकर चित्रपटाच्या निर्मितीचे दिवस होते. दादरला सेनाभवनाच्या अलिकडची गल्ली. तिथे रामचंद्र निवास ही इमारत आहे. तिच्या तिसर्‍या मजल्यावरती बाबूजींनी या चित्रपटाचे कार्यालय थाटले होते. मी अधनंमधनं तिथे दबकत जायचा.. आणि कधी कुठले कागदपत्र फाईल करून ठेव, एखादं बाड इकडून तिकडे पोचव, बँकेची कामं कर, बाबूजींकरता ठाण्याच्या भगवंतराव पटवर्धनांकडे काही काम असेल तर ते कर, अशी बाबूजी सांगतील ती फुटकळ कामं चुपचाप करायचा..कधीमधी उगाचंच त्या कार्याकयात बसून राहायचा..

शावा शावा

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 04/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
"हॅलो" बोल रे जोशा "चो, तु कभी खुशी कभी गम बघितला आहेस का रे?" म्हटले तर हो म्हटले तर नाही "म्हणजे"? फॅमिली सकट गेलो होतो. एक मित्र आणि त्याची फॅमिली पण बरोबर होती. पहील्या २० मिनिटात भर एयर कंडिशन मधे आम्हा दोघांना घाम फुटला. मग गम मिटवण्यासाठी फॅमिली ला तिथेच सोडुन थिएटर जवळ असलेल्या बार मधे सिंगल माल्ट खुशी. शेवटची १५ मिनिटे बघितला.फुल्ल असल्यामुळे त्रास झाला नाही. पण त्या हॉरर ची अचानक तुच आठवण का द्यावीस बरे? "अरे एक केस आहे. बघ तुला जमते का? माझेच नातेवाईक आहेत.

गूढ कथा: "कालग्रहांचे भविष्यआरसे" (संपूर्ण कथा - ६ भाग एकत्र)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 04/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सूचना: [यापूर्वी ही कथा सहा भागात मी क्रमशः प्रसिद्ध केली होती. वाचकांच्या सोयीसाठी आणि सलग वाचनाचा आनंद मिळण्यासाठी तसेच जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावी यासाठी ही कथा आता सलग एकत्रीतरित्या प्रसिद्ध करतो आहे.] ----------------------------------- गूढ कथा : कालग्रहांचे भविष्यआरसे!!! --The Fortune Mirrors of Time Planets!!! ----------------------------------- ही कथा सुरु होते २०२२ साली दि. २२/०२/२०२२- मंगळवार- वेळ सकाळी चार मुंबईत अंधेरी येथे "समल" हॉस्पीटलकडे जाणारा रस्ता सुना होता वाहनांची वर्दळ नव्हती. पाऊस पडत होता.