Skip to main content

लहान मुलांच्या जर्मन पुस्तकांतील चित्रांचे प्रदर्शन

लेखक चिंतातुर जंतू यांनी शुक्रवार, 08/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
तोच तोच काथ्या पुन्हा पुन्हा कुटून, फुटक्या कौलांवर पुन्हा पुन्हा दगड मारून कंटाळा आला असेल आणि वीकेंडला थोडा रुचिपालट हवा असेल तर हा घ्या... Sybille Hein सध्या पुण्यात पुस्तकांशी संबंधित एक गोड प्रदर्शन सुरू आहे. त्याविषयी माहिती देण्यासाठी हा धागा. शक्य असल्यास आपापल्या (किंवा इतरांच्याही) बच्चेमंडळीसह जरूर भेट द्यावी असं हे प्रदर्शन आहे. लहान मुलांच्या पुस्तकांत चित्रं हा फार महत्त्वाचा भाग असतो.

भसभसून उसळे नरड्यामधुनी धार

लेखक शहराजाद यांनी शुक्रवार, 08/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियाली यांच्या भेसूर अमानवी काव्याच्या धाग्यावर बऱ्याच भारतीय भुताखेतांच्या कविता आलेल्या दिसल्या. ही एक कविता अभारतीय पिशाच्चांची.

कुल-२

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 08/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
पेरेंट ऑफ द इयर ह्या परिक्षेत भाग घ्याल का? हा प्रश्न मी मिपावरील काही असलेल्या,होउ घातलेल्या, नुकत्याच झालेल्या पालकांना विचारला. उतरः नाही.(कारणे वेगवेगळी दिली पण नकार हा कॉमन फॅक्टर होता) ----------------------------------------------------------------------------------------- खालील प्रकटनातले प्रश्न पालकांना विचारले जातात. काही खाजगी शाळातुन तर अगदी 'कठीण' प्रश्न विचारले जातात. 'कठीण' प्रश्न विचारणार्‍या शाळांची फी सुद्धा जरा कठीणच असते.त्यातील काही पालकांना असे प्रश्न विचारले गेले नाही तर आपली फी वसुल झाली नाही असे वाटते.

हडळ जागी भूत जागे

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 08/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या संगीत तबकडीवर खेबूडकरांचे चंद्र आहे साक्षिला वाजत होते आणि आम्ही मिपावर प्रियालीताईंचे भयंकर, भेसूर आणि अमानवी काव्य वाचायला सुरवात केली ..
काव्यरस

रारंग ढांग पोरका झाला..

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी शुक्रवार, 08/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ चित्रपट निर्माते- दिग्दर्शक व श्रेष्ठ साहित्यिक श्री. प्रभाकर पेंढारकर यांचे पुण्यात काल दि. ७ ऑक्टोबर रोजी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. चित्रपट महर्षी भालजी पेंढारकरांचे ते सुपुत्र होते त्यामुळे कलेचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले होते. 'बाल शिवाजी' , 'शाबास सुनबाई' इ चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. 'बालशिवाजीचे' कथा-पटकथा-संवादही त्यांनी लिहिले होते.