आता उरल्यात फक्त तुझ्या आठवणी,
आता उरल्यात फक्त तुझ्या आठवणी,
खिडकीतून येणाऱ्या कवडश्यात समोर टेबलावर दिसतो तो तांब्या आणि त्यावर उपडं ठेवलेलं फुलपात्र, पूर्ण खोलीभर पसरलेला तो रातराणीचा सुगंध, टेबलाच्या पायापाशी पडलेलं ते वर्तमानपत्र.
रेदिओ वर लागलेलं ते मुकेशचं गाणं "जाऊन कहा बताये दिल...."
पूर्ण खोलीभर व्यापलेला अंधार ज्याच्या कुशीत संध्याकाळचा उन हळू हळू निजू पाहताय, आणि तो आपला पदर मायेना त्याच्या अंगावर पास्राव्तोय, खुद्ची एकसारखी लयीत मागेपुढे होतेय
आणि हळूच येणाऱ्या वार्याच्या झुळकीने तुझ्या फोटोवरचा चंदनाचा हार हलतोय...
.... आता... आता फक्त उरल्यात तुझ्या आठवणी....
माहिती हवी आहे - प्रि -अॅप्रुव्ह्ड होम लोन
प्रि -अॅप्रुव्ह्ड होम लोन बद्दल सविस्तर माहिति हवी आहे.
धन्यवाद,
आपली
Digital Camera कुठला घ्यावा.
Digital Camera कुठला घ्यावा.
१) Sony
2) Nikon
3) Canon
4) FujiFilm
बजेट रु. १०,०००/-
उपयोग- साधारण फोटोग्राफि
जाणकारानि योग्य तो सल्ला द्यवा.
मि. पा. कर माय्बाप, बालकाचा नमस्कार..
मि. पा. कर माय्बाप,
सध्या "नवीन"लेखकांची बरीच चलती आहे म्हणून म्हटले की आपण पण वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावेत... मी पण मि. पा. वर नवीनच आहे.सदस्यत्वसाठी विनंती करून बरेच दिवस झाले, पण स्वीकॄतीचा निरोप आला नव्हता. एक दिवस अचानक कळले की आता आपण पण मि.पा वर क्रियाशील सदस्य बनू शकतो म्हणून!
लिहिण्याचा तसा मला काही अनुभव नाही. मी अजुन कोठेही लिहत नाही. १०वीत निबन्धासाठी केलेल्या कविता सोडल्यास मला कवितांचा पण काही अनुभव नाही. प्रयत्न करायाचा सध्या काही विचार पण नाही. पण मि. पा. मला आवडते हे सांगण्यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे.
पाटोड्यांची आमटी..
साहित्य..:
लसुण, खोबरे,कांदा,कोथिंबिर्,गरम मसाला,
हरभरा डाळ, बाजरी,तांदुळ,तीळ,
बेसन पीठ,तिखट,मीठ,तेल..ओवा
पुर्वतयारी:
१) हरभरा डाळ, बाजरी,तांदुळ,तीळ, हे सगळे भाजुन पीठ तयार करुन घ्या..
२) खोबरे,कांदा,लसुण मिक्सर मध्ये बारीक करुन पेस्ट करुन घ्या..
३) बेसन पीठ,तिखट,मीठ,तेल..ओवा..हे मिश्रण थोडेसे पाणी घालुन घट्ट भिजवा.
कृती:
फोडणीसाठी पातेलीत तेल घाला...
त्यावरुन जिरे,मोहरी,हिंग प्रमाणात
त्यानंतर (क्र.२)ची पेस्ट त्यात सोडा...
परतु द्या..नंतर त्यात गरम मसाला घाला...
मसाला घातल्यावर त्यात थोडेसे
युपीतल्या ह्या पदार्थाचे नाव काय?
गेल्या महीन्यात युपीला गेलो होतो,गंगाकीनारी गाईडच्या आग्रहास्त्व एक मिठा पान व हा पदार्थ खाल्ला.पान खालल्याचा पश्चाताप झाला पण हा पदार्थ अप्रतिम होता.
ह्यात बटाट्याची भाजी कचोरीसारख्या आकाराच्या गोळ्यात भरलेली होती,थोडे मसाल्याचे पाणी व त्यात शिजवलेले चणे होते.ह्या सर्वांवर थोडीशी लालसर पावडरसारखी चटणी.हे सर्व वेगवेगळ्या भांड्यात असत व देताना मिक्स केल जात.
मी ताबा ठेउन तीन रुपयाची एकच थाळी(?) खाल्ली पण आता ह्याचे नाव माहीती करायचे आहे.
माहीतीगारांनी कृपया मदत करावी.
हस्ताक्षर.........
परवा आई बारशाला चाललेली कोणाच्यातरी..........
पैशाचं पाकीट भरून झाल्यावर तिने मला हक मारून सांगितलं, "प्रसन्न अरे जरा नाव टाक रे पाकिटावर " (मी मिपा वर पडीक असल्याने समाधी भंग झाल्यागत चरफडत उठलो :( )
"दे पेन ...... काय तू पण ..... साधं नाव नाही टाकता येत?" ------------------ इति मी .
नाही अरे , इतकं सुंदर अक्षर आहे तुझं. तूच टाक ना...(आई पण ना "मस्का " मारण्यात expert आहे )
मी वैतागून पेन हातात घेतलं आणि लिहायला सुरुवात केली ,आणि बापरे ...."tube " पेटली , आपण किती दिवसानंतर मराठी लिहितोय ...
कारण हल्ली पेन सह्या करण्यापुरत लागतं...
तुनळीवरील दत्तधाम चित्रफीती
खाली दिलेल्या १५ चित्रफीतींमधून महाराष्ट्र, गुजराथ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदि विविध राज्यातील दत्त धामांचे मनोहर, अतिशय सुंदर दर्शन घडते.
सोला, नारेश्वर, पैठण, करंजा, गरूडेश्वर, शेगाव, अक्कलकोट, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, तळेगाव आदि ठीकाणच्या दत्त मंदीरांचे लोभस दर्शन या चित्रफीतींमधून घडते.
संकलन आणि निवेदन उत्कृष्ट आहे. संगीत, नारेश्वरधून अतिशय कर्णमधुर आहे हे यांचे वैशिष्ट्य.
गुजराथी भाषेत असल्या तरी समजण्यास अगदी सोप्या आहेत.
मिसळपाव