माझी गरज.... तू
सोनुले,
रोज रात्री प्रमाणे आजही रात्री परत तो सर्प स्वप्नात आला... भूतकाळाच्या आठवणींचे वेटोळे घालून बसला मला तो... जीवाचा आकांत करून ओरडत होतो, पण शब्द देखील फुटत नवता तोंडातून.... जाग आली तेव्हा फक्त गदद्द अंधार होता सोबतीला... रोजच्यासारखा... तेव्हा जाणीव होते प्रकर्षाने तू नसल्याची,
हवा असतो फक्त तुझा स्पर्श... मन भीतीने जेव्हा थरथरत असत तेव्हा त्या हळुवार स्पर्शाचीच गरज असते मला... आस लागलेली असते मनाला... त्या वेळी फक्त हवी असते डोक्याखाली तुझी मांडी, आणि केसातून फिरणारा तुझा हात... शब्द सुद्धा गोंगाट वाटतो, भीतीदायक वाटतो...
मिसळपाव