Skip to main content

मुलांची कोडी

लेखक शरद यांनी बुधवार, 15/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द कोडी मुलांकरता माझी धाकटी नात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाऊ लागली तेंव्हा सर्व आजी-आजोबांच्या मनात असते तशी [निरर्थक] भीती माझ्या मनातही निर्माण झाली " आता हीच्या मराठीचे काय ?" शेजारची मुले-मुली मराठीच होती पण तीही इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधलीच! तेंव्हा आता ही जबाबदारी आजी-आजोबांचीच असे ठरवून एक ठरवले की तीच्याशी बोलतांना आपण इंग्रजी शब्द टाळावयाचे. तीलाही तसेच सांगावयाचे. पण एवढे पुरेसे वाटले नाही. . वर्ष दोन वर्षे गेली. मग आम्ही एक निराळा खेळ सुरु केला. तीला तीन-चार अक्षरांचा मराठी शब्द द्यावयाचा व त्यापासून, त्यातील अक्षरे घेऊन निरनिराळे शब्द बनवावयाचे.

कामाच्या ठिकाणचे स्नेहसंबंध

लेखक शुचि यांनी बुधवार, 15/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
केवढी गरज असते व्यक्तीला समाजाभिमुख रहाण्याची, अन्य लोकांशी निकट स्नेहसंबंध वृद्धींगत करण्याची. आपण जेव्हा गप्पा मारतो, मन उघडं करतो तेव्हा, कोणीतरी आपलं बोलणं सहानुभूतीपूर्वक ऐकावं असं आपल्याला वाटतं. कोणाबरोबर तरी विचारांची देवाण्-घेवाण व्हावी, वादविवाद व्हावेत आणि विरंगुळ्याचे ४ क्षण आपल्या वाट्याला यावेत , आपल्या बरोबर समोरच्या व्यक्तीचादेखील विकास व्हावा हीच प्रत्येकाची इच्छा असते. तीच गोष्ट भेटवस्तूंची.

(एक बाई ठेवावी म्हणतोय!)

लेखक पिवळा डांबिस यांनी बुधवार, 15/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या विडंबनासाठी वापरलेला कच्चा माल :) एक बाई ठेवावी म्हणतोय.... एक बाई ठेवावी म्हणतोय, करायला गरमागरम भाकरी मटण्-मुर्गीच्या रश्श्याबरोबर, जोडी जुळत नाही हो दुसरी!! शुभ्र दळलेली जवार बनवी होऊनि तदाकार अस्सल मर्‍हाटी भाकर सुबक, पातळ, गोलाकार एक बाई ठेवावी म्हणतोय दिसायला असु द्या कशीतरी नसो अंगी बाकी काही गुण फक्त भाकरी मिळो ऊनऊन तर एक बाई ठेवावी म्हणतोय! (मित्रहो, तुमचा काय सल्ला?) :)
काव्यरस

एक बायको करावी म्हणतोय

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 14/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
एक बायको करावी म्हणतोय सुंदर .. सालस .. सावरी .. तिचे शब्द असावे तिळगुळ अन ओठांवरी काळसर तिळ नाजुक नक्षीदार ... असावे डोळे पाणीदार नजर धारदार .. असावी मराठी बाणेदार एक बायको करावी म्हणतोय सुंदर .. सालस .. सावरी .. भोळ्या या राजाची बाकी इच्छा नाहि दूसरी ... ----- शब्दमेघ ( १४ डिसेंबर २०१०) नोट : ऑफिसटाईम संपला आहे ,हणुन एक-दोन कडवी राहिली आहेत .. तरी अपुर्ण का असेना द्यावी म्हंटले कविता .. तेव्हद्याच्या अपुर्ण असलेल्या इच्छेस अर्पण म्हणता येइल ( असेच लिहिले आहे .. मजेने ह.घ्या)

गच्च मिठी शहारलेली

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 14/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
हळुवार कातरवेळी गच्च मिठी शहारलेली चंदेरी किणार ल्यालेली आकाशी ओढणी रंगबिरंगी तव गालावर रेशमी किरणांची केशरी लाली जांभुळनयनात हरवली गच्च मिठी शहारलेली सोहळा रजनीगंधाचा स्पर्श रेशमी आनंदी .. लाजुनी दडला सूर्य ओठांची निशब्द बोली.. ---- शब्दमेघ (१४ डिसेंबर २०१०) * अवांतर : १. जांभुळनयन हा शब्दप्रयोग मी पहिल्यांदाच केला आहे, कदाचीत आश्चर्य वाटु शकते, पण माझ्या एका मैत्रीणेचे मोठे काळे पाणीदार डोळे पाहुन मला नेहमी जांभळाचीच आठवण यायची .. ही कविता त्या जांभुळनयनांना अर्पण ....
काव्यरस

कवितेचे झाड !!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 14/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेचं झाड लावलेय त्याने अंगणात पारिजातकाचे झाड आहेना.. ? त्याच्याच बाजूला...!
काव्यरस

फिटे अंधाराचे जाळे (छायाचित्रे)

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 14/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश या ओळी मी दोन वर्षांपुर्वी काढ्लेल्या छायाचित्रांच्या माध्यमातुन सादर करीत आहे.

हळूच द्या मज झोका कान्हा

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 14/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
हळूच द्या मज झोका कान्हा
हळूच द्या मज झोका कान्हा चित्त नाही माझे थारा हळूच द्या मज झोका कान्हा ||धृ|| मन विचलीत झाले वासनांनी भरले घुसळोनी लोणी काढूनी घेती तयाप्रमाणे वासना काढाना ||१|| संसारी राहून पाही जगजेठी पापपुण्या लावी गाठी कितीक करावी तुमची आरती जन्ममरणाचा पाळणा हलवा ना ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०४/११/२०१०
काव्यरस

एक आठवण

लेखक संजयशिवाजीरावगडगे यांनी मंगळवार, 14/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
एक आठवण तुझी येता कातरवेळी . काहुर जागवणारी मनातलं अवेळी. साजंकाळी येता तुझी एक आठवण . मन सुन्न होऊन जळणारी आठवण. मनातल्या मनातं रडणारी एक आठवण. मनातल्या मनात अस्वस्थ होणारी आठवण. जीव भेदून जाते आठवण तुझी जीवघेणी, देते मज असंख्य वेदना मनी. अशी तुझी ती एक आठवण !! @ संजय गडगे
काव्यरस

मटार पॅटीस

लेखक जागु यांनी मंगळवार, 14/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
भाजीचे साहित्य मटार दाणे अर्धा किलो कांदे २ छोटे चिरुन आल लसुण पेस्ट टोमॅटो १ बारीक चिरुन राई, जिर, हिंग, हळद, मसाला १/२ चमचा गरम मसाला मिठ तेल ओल खोबर कव्हरसाठीचे साहित्य: १ किलो बटाटे चांगले उकडून मिठ रवा किंवा बटरचा मिक्सरमधुन काढलेला चुरा. तळण्यासाठी तेल पाककृती: प्रथम वरील भाजीचे साहित्य घेउन तेलावर राई, जिर, हिंग ची फोडणी देउन कांदा गुलाबी रंगावर परतवायचा. नंतर त्यावर आल लसुण पेस्ट, हळद व मसाला घालून मटार टाकायचा. आता वरती झा़कण ठेउन त्यावर पाणी ठेउन मटार वाफेवर शिजुन घ्यायचा.