Skip to main content

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप -१

लेखक टर्मीनेटर यांनी बुधवार, 22/12/2021 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
मारुतीच्या शेपटी सारखा वाढतच चाललेल्या लॉकडाऊन कालावधीचा फारच कंटाळा आलेला असतानाच्या काळात मिपावर दुर्गविहारी ह्यांची गोव्यातल्या किल्ल्यां बद्दलची सुंदर माहितीपुर्ण लेखमालिका आणि गोरगावलेकर ताईंची कोकण व तळ कोकणातल्या भटकंतीची मस्त मस्त प्रवासवर्णने वाचून असे काही टेम्पटेशन आले होते की ह्या आधीच्या कोकण-गोवा भेटींमध्ये तिथल्या अनेक बघायच्या राहिलेल्या गोष्टी पहाण्यासाठी प्रवासावरचे निर्बंध थोडेफार शिथिल झाल्यावर त्वरीत ह्या ठिकाणांना भेट देण्यापासुन स्वतःला रोखू शकलो नाही. COVID-19 मुळे लागू करण्यात आलेले अनेक निर्बंध स्थानिक परिस्थिती नुसार काही ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात कायम असल्यामुळे तर

गोवा एका वेगळ्या रुपात - अंतिम भाग

लेखक मित्रहो यांनी मंगळवार, 21/12/2021 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ मार्ग भाग २ सायकलींग गोवा सायकल दौऱ्याचा हा शेवटला भाग, या भागात सायकल दौऱ्यात निवास आणि भोजन कुठे केले याची माहिती आहे. divarresort (दिवार बेटावर एक तळे) निवास आणि भोजन दौऱ्यात काही ठिकाणी निवासाची सोय मोठ्या हॉटेलमधे होती त्यामुळे ते जसे असायला हवे होते तसे होते. दिवार बेटावर आम्ही Mercure Devaaya Retreat या रिसॉर्टवर राहिलो होतो.

शीर्षक सुचले नाही

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 21/12/2021 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
झोप येईनाच आज झोप हवी असताना जांभयाच्या येती लाटा वर तारे मोजताना काय आणून वहावे निद्रादेवीच्या चरणी झोप येऊन निवांत उद्या उजाडेल झणी किती थकून भागून देह दिला पसरून डोळ्यात बाहुल्यांना काय दिसते अजून? दिसे कालचा प्रकाश अन्, तम भेसूर उद्याचे त्यांच्या मध्ये भांबावले पाऊल हळव्या झोपेचे एक मायेचा, माथ्याला हवा सांगणारा हात सोड उद्यावर, नीज खूप झाली आहे रात - संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, २१/१२/२१)

कोल्हापूर ते उडुपी एक थरारक प्रवास - 600 KM Thrilling Journey To Reach Udupi - Bike Road Trip - Ep 1

लेखक व्लॉगर पाटील यांनी सोमवार, 20/12/2021 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापूर ते उडुपी एक थरारक प्रवास - 600 KM Thrilling Journey To Reach Udupi - Bike Road Trip - Ep 1 कर्नाटक एक्सप्लोर करण्यासाठी स्पॉटवारची पहिली बाइक रोड ट्रिप. सुमारे 600 किमीचा प्रवास 1 दिवसात उडुपीपर्यंत पोहोचण्याचा थरारक प्रवास. आम्ही (मी आणि सागर) कोल्हापूर (इचलकरंजी) येथून प्रवास सुरू केला.

गाव

लेखक अनुस्वार यांनी सोमवार, 20/12/2021 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी साधं गाव होतं ते. लोकसंख्या कशीबशी २०००. गावात कुणी जास्त शिकलेलं नव्हतं, साहजिकच पन्नासेक पोरं तेव्हढी जवळच्या शहरात कामगार म्हणून राहायची. बाकी बराचसा गाव मळ्यांमध्ये राहायला गेलेला. मळ्यात प्यायला विहीरीचं पाणी होतं अन् आकडे टाकायला लायटीची तार पण. गावात शंभरेक घरं अजूनही होती. झेड. पी. च्या शाळेच्या पाच खोल्या (बालवाडी + चौथी) पोरांच्या शिक्षणासाठी कमी आणि लग्नाची बुंदी ठेवायला जास्त कामी येत. पाच वर्षांपूर्वी शिक्षण विभागाने एक नवीन खोली बांधून दिली - संगणक प्रशिक्षणासाठी. त्यात एक भारी टी.व्ही. पण आहे असं काहीजण सांगायचे. विजेची जोडणी नाही म्हणून त्या खोलीला टाळं आहे.

प्रभावी भाषणासाठी...

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 20/12/2021 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यातील काही जणांवर आपले व्यवसाय वगळता सार्वजनिक मंचावर छोटेमोठे भाषण देण्याचा प्रसंग कधीतरी येतो. अशा प्रसंगांमध्ये कौटुंबिक मेळावा, मित्रांचे संमेलन, सामाजिक उत्सव आणि विविध विशेष दिनांचे कार्यक्रम इत्यादींचा समावेश होतो. माझ्यावर अशी वेळ आतापर्यंत बरेचदा आलेली आहे. तेव्हा आपल्यासमोर उपस्थित असणारा श्रोतृवर्ग हा विविध वयोगटांतील आणि विभिन्न प्रकृतींचा असतो. अशा प्रसंगी थोड्या वेळात प्रभावी बोलणे ही एक कला आहे. ही कला मी प्रयत्नपूर्वक विकसित करीत राहिलो. त्यासाठी काही थोरामोठ्यांच्या भाषणांचा व त्यांच्या मेहनतीचा अभ्यास केला. माझ्यावर झालेले शालेय शिक्षकांचे संस्कारही यासाठी उपयोगी पडले.

पुतळे आदर्शाचे

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 20/12/2021 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची शुक्रवार १७/१२/२०२१ रोजी विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नका उखडू पुतळे आदर्शाचे जे आम्हा पुजनीय असती नका विटंबवू आदर्श आमचे जे आमच्या हृदयात वसती हे पुतळे नेहमीचे साधे नाहीत अगदीच लेचेपेचे नाहीत ते जीवंत जरी नसले तरीही कार्य त्यांचे तळपत राहील पुतळे जरी नष्ट केले आदर्श नष्ट होत नसतात त्यांच्या येथल्या असण्याने तुम्ही येथे राहत असतात - पाषाणभेद २०/१२/२०२१
काव्यरस

जंगल (२०१७)

लेखक चिमी यांनी सोमवार, 20/12/2021 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या बाबांना survival story based सिनेमे आणि डॉक्युमेंटरीजची भारी आवड. बाबांजवळ बसून The Edge, The Poseidon Adventure सारखे कित्येक सिनेमे मी रात्री जागू जागू पाहिलेले. पुढचे २-४ दिवस त्यातले अस्वल किंवा भेसूर चेहरे स्वप्नात येऊन दचकवून परत जागरण घडवायचे तो भाग वेगळा. कितीही घाबरीफाईड झालं, तरी परत पुढचा सिनेमा बघायला मी मोठ्या उत्साहाने तयार असायचे. कारण बाबांच्या मागे लपून बसून तर बघायचे असायचे. तेव्हा सर्वांत सेफ जागा म्हणजे बाबांच्या मागे. तिकडे टीव्हीवर एखाद्या अस्वलाने किंवा मगरीने कोणावर तरी हल्ला करण्यासाठी आ.. केला की दुसरा आआआं.. माझा असायचा.

मालाडचा म्हातारा...

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 19/12/2021 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
म्हातार्‍याचे भिरभिर डोळे- आठवणींचा भुगा भुगा छटाक उरले खोड, पोखरी कभिन्न काळाचा भुंगा म्हातार्‍याचे वखवख डोळे- लवथव गोलाई बघती दारु संपला जसा फटाका दावू न शकतो स्फोटभिती म्हातार्‍याचे टपटप डोळे- पापणीत पाऊसमेघ जसा वळीव कोसळतो कधिही तसा कढांचा आवेग म्हातार्‍याचे विझुविझू डोळे- पैलतिरी काऊ बघती कोकुनी हाकारितो अहर्निश उडून जा त्याला म्हणती
काव्यरस