Skip to main content

भारत व रशिया इजारेल नेपाल ( महत्वाचे भागीदार )

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी मंगळवार, 21/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मी आधी सुधीर काळे ह्यांच्या पुतीन संबंधित लेखात प्रतिक्रियेत म्हटले होते कि रशियाला सध्यस्थितीत भारताशी व्यापारिक संबंध वाढवले पाहिजे .अर्थात आज पासून रशियन राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव भारताचा २ दिवसाचा दौरा करणार आहेत .त्याच्यासोबत व्यापारी मंडळ असून किमान १५ सौदे होणार आहे जे अंतराळ /बिन लष्करी परमाणु सहयोग / व अनेक महत्वाचे प्रामुख्याने व्यापारी सौदे होणार आहेत .पुढील ५ वर्षात २० अब्ज डॉलर च्या व्यापाराचे उदिष्ट दोन्ही देशांनी ठेवले आहे .ह्यात सर्वात महत्वाचा सौदा जेट विमानाच्या ५ व्या पिढीतील विमानाचा असून ते भारत व रशिया सहकार्याने बनवत आहे .(जगात ह्या पिढीचे अत्याधुनिक विमान फक्त अम

दुर्ग - ढाकोबा आणि दार्‍या घाट

लेखक अप्पा जोगळेकर यांनी मंगळवार, 21/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्ग - ढाकोबा आणि दार्‍या घाट हा एक छान रूट आहे. दुर्ग वरुन ढाकोबा ची वाट सापडता सापडत नाही. दैव चांगलं म्हणून आम्हाला जागोजाग स्थानिक माणसं भेटत गेली. नुकतीच क्लिक्सची खरेदी केल्यैय. त्यामुळे खाण्यापिण्याचा तर नुसता माज केला. उकडलेली अंडी, कॉफी, श्रीखंड, भाकर्‍या, चटणी आणि मॅगी यांनी बहार आणली.मागच्या महिन्यात पावसामुळे ढवळ्या घाटाचा प्लॅन फसला त्यामुळे लई शॉट बसला होता. पण आता जरा छान वाटतंय. डोंगरात भटकणे हा आमचा खास स्किलसेट असला तरी छायाचित्रण हा आमचा प्रांत नाही. किंबहुना फोटो काढायचा कंटाळाच येतो. दोस्तांनी काढलेले फोटो पाहत बसणं मात्र फारच आनंददायक.

(पृथ्वी समर्थ आणि पक्षनिष्ठा)

लेखक मूकवाचक यांनी मंगळवार, 21/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडच्याच एका प्रसंगी दिल्लीच्या परिसरात काही नेते म्याडमदर्शनाच्या इच्छेने यत्न करत होते. युवराजांना ओळखून त्यांनी आपला हेतू सांगून त्यांचे सहाय्य मागितले. युवराजांनी त्यांना निष्ठा दृढ करा असे सांगून ते ही त्यांचेजवळ बसले. एक प्रहर रात्र उलटल्यावर म्याडम आदिमायेच्या रूपात स्वीय सचिव, आपल्या खास मर्जीतली चौकडी, ट्रकभरून फायलींचा गठ्ठा, हातात बंद लिफाफा आणि एक स्वीस देशीची वर्गणी पुस्तिका अशा लवाजम्यासह तिथे दाखल झाल्या. त्या वेळी बरोबरच्या सचिवाला "वेळ निभवावी" असे म्हणून सिलेक्शन करायला सांगितले. सचिवाने एक टेबलखुर्ची मांडून त्यावर एक मेणबत्ती लावली व एकेक फाईल काढून वाचू लागला.

लावणी- लावण्यखणी?

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 20/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
लावणी हा एक महाराष्ट्रातील नृत्य प्रकार.खास करून उत्तर पेशवाईत अधीक लोकप्रीयता मिळालेला. दक्षीनेत नृत्याची जशी मंदीरांसोबत /धार्मीक उत्सवांसोबत सांगड घातली जाते. अरंगेत्रम सारखा समारंभ कुटुंबासमवेत मोठ्या थाटात साजरा केला जातो. गुजरातेत नवरात्र निमित्त स्त्री पुरुष हे एकत्र नाचतात. त्या उत्सवास धार्मीक रंग आहे. महाराष्ट्रात कोळी लोक सोडले तर स्त्री पुरुष मिलून एकत्र एखादे नृत्य करतात असे कुठेच दिसत नाही. मागे कोणीतरी म्हणाले की लावणी हा महाराष्ट्राचा अभिमान वाटावा असा ठेवा आहे. लावणीचे सौम्दर्य गायन कलेत आहे. शब्द कलेत आहे.

बहादुर शाह जफर के कुछ आखरी अशार...

लेखक अश्फाक यांनी सोमवार, 20/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
१८५७ च्या उठावा नंतर इंग्रजांनी बहादुर शाह जफर यांच्या दोन्ही मुलांचे शीर धडा वेगळे करुन ताटात सजवुन पेश केले आणि त्यांना रंगुनं येथे बंदिस्त केले , तेव्हा तिथल्या वातावरणात ही गजल लिहिली होती ( आज ही लाल किल्ल्यात स्मरण म्हणुन गजल लिहिली आहे) लगता नहीं है जी मेरा उजड़े दयार में !
काव्यरस

[ज्योतिष] दिनांक ४ जाने २०११ रोजीचे सूर्यग्रहण

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 20/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ४ जाने २०११ रोजी सकाळी ९ वाजून ०२ मि सायन मकर राशीत १३ अंशावर ३८ मि अमावस्या होत असून ही अमावस्या सूर्यग्रहणयुक्त असून वर्षारंभीच होत आहे.

घराच्या खाणाखुणा लक्षात ठेवाव्यात अशी घरे ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 20/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
घराच्या खाणाखुणा लक्षात ठेवाव्यात अशी घरे आता राहिलीच आहेत कोठे ..?? आमच्या लहानपणची घरे जशी होती तशीच होती कितीक काळ कुणास ठाऊक.? माडीवरचे बळद कितीतरी जुने असावे पुसलेच जात नाही मनातून सिगारेट ओढणारा फेल्ट ह्यात घालणारा पत्री डब्यावरचा अनेक मुखवट्याचा तो डबा त्यात साठवलेल्या कितीतरी चीनी मातीच्या बाहुल्या लोलक,भवरे आणखीन काय नि काय कितीक काळ तसाच होता पुसलाच जात नाही मनातून ....!! डबल ब्यारलची सायकल होती हर्क्युलसची मस्त दणकट मजबूत ...!! आजोबांच्या काळातली मामा वापरून त्याची मुले वापरू लागलेली तशीच होती कितीक काळ कुणास ठाऊक...?
काव्यरस

ए.सी.....ते शी.शी....शाळेला चाललो आम्ही

लेखक सुनिल पाटकर यांनी सोमवार, 20/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षणापासून कोणीही वंचीत राहू नये यासाठी सरकारने वाडीवाडीवर शाळा सुरु केल्या.सक्तिच्या शिक्षणाचा कायदाही केला आहे.ज्या देशात श्रीमंतांची मुले ए.सी.शाळेमध्ये शिकतात, त्याच देशात ग्रामीण भागात मात्र शिक्षणासाठी मुलांची फरफट होत आहे प्राथमिक शाळा .वापरात नसलेली बक-यांची गलिच्छ शेड ..त्यामध्ये भरणारी प्राथमिक शाळा..शिक्षण व्यवस्थेत भरडणारी मुलं ..आणि त्यांचं भवितव्य घडविणारा तुटलेला फळा ..हि विदारक स्थिती महासत्ताक बनू पाहणा-या भारतात आजही आहे