Skip to main content

उपमा

लेखक शरद यांनी मंगळवार, 21/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
उपमा शाळेत सर्वात प्रथम शिकवला जाणारा अर्थालंकार म्हणजे उपमा. कळावयाला व ओळखावयाला, उपयोगात आणावयाला सोपा.वाघासारखा शूर सैनिक. वाघ शूर.. माहित आहे; सैनिक वाघासारखा आहे .. सांगितले, सैनिक शूर आहे कळले; एकदम सोपे ! उदाहरण द्या. लांडग्यासारखे क्रूर मास्त.... चुकलो, चुकलो... गायीसम गरीब आई ! लक्षात ठेवावयाचे चार घटक : [१] ज्या पदार्थाचे वर्णन करावयाचे त्याला प्रस्तुत किंवा उपमेय म्हणतात ... येथे सैनिक / आई. [२] ज्याची उपमा दिलेली असते त्याला अप्रस्तुत किंवा उपमान म्हणतात....

फ्रोह वाईनाख्टन!!!

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 21/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता सगळीकडे ख्रिसमसचे वातावरण आहे,ते वातावरण सगळ्यांमध्ये वाटावेसे वाटले म्हणून हा इतरत्र पूर्वप्रकाशित लेख - या आधी- नाताळची चाहूल! पहिला आडव्हेंट झाला की नाताळच्या मेजवान्यांची आमंत्रणं सुरू होतात.

आहेर, भेटवस्तू आणि संकट

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 21/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आहेर किंवा भेटवस्तू देणं-घेणं ही एक फार प्राचीन परंपरा आहे. प्रसंगानुरुप किंवा प्रसंगाशिवाय भेटवस्तू देणं किंवा स्वीकारणं हे आपल्या अंगवळणी पडलेलं आहे; इतकं अंगवळणी पडलं आहे की वस्तू काय आहे, तिची उपयुक्तता काय आहे, त्या वस्तूची आपल्याला गरज आहे का, त्या वस्तूची किंमत किती आहे वगैरे बाबी लक्षात न घेता आहेर किंवा भेटवस्तू दिल्या-घेतल्या जातात. आता हेच बघा ना, लग्नातला आहेर किती गमतीदार असतो. अगदी जवळच्या नात्यातलं लग्न नसेल तर आहेर विकत घेतला जात नाही; तो घरातच जुळवला जातो.

मासे १८) खुबड्या - खुबड्यांचे सुके आणि एलवण्याची कढी

लेखक जागु यांनी मंगळवार, 21/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
खुबड्या समुद्रातील खडपांवर ओहोटीच्या दिवसांत मिळतात. ह्या पकडण्यासाठी रात्री कंदील घेउन जावे लागते. अंधारात ह्या खुबड्या कडकांवर येतात त्या ओंजळीने गोळा करतात. सकाळी किंवा दिवसा ह्या खुबड्या तुरळक दिसतात दगडा खाली लपलेल्याही असतात. खुबड्या हे शेलफुड असल्याने त्यात भरपुर कॅल्शियम असते. ह्या खुबड्या लहान मुलांच्या चिंबोर्‍याप्रमाणे आवडीच्या असतात. सुईने गोळे काढतानाच लहान मुले अर्ध्या फस्त करतात. खुबड्या चांगल्या ४-५ पाण्यात धुवुन घ्यावात व त्या बुडतील इतके पाणी आणि थोडे मिठ टाकुन उकडून घ्याव्यात.

corn flour white sauce

लेखक लतिका धुमाळे यांनी मंगळवार, 21/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजुने विचारले म्हणून कॉर्न फ़्लोअर वापरून व्हाइट सॉस करायची कृति देत आहे. मैद्यापेक्षा कॉर्न फ़्लोअर कमी लागते आणि पदार्थ क्रीम न वापरता क्रीमी होतो. एक किंवा अर्धा चमचा लोणी चवी करता घालायचे.कमी कॅलरीज. पातळ सॉस१ मोठा चमचा (शिग भरून) कॉर्न फ़्लोअर. २५० मिली लिटर दूध. कॄति-- अर्धा कप दूधात कॉर्न फ़्लोअर मिक्स करून ठेवावे. उरलेले दूध गॅसवर ठेवावे. दूध उकळले की गॅस कमी करावा. सतत ढवळत केलेले मिश्रण हळूहळू उकळत्या दूधात घालावे. २ मिनिटे उकळू द्यावे. मी हा सॉस क्रीमी पास्त्यासाठी करते. चिझ आपल्याला हवे तेव्ह्ढे घालावे. हाच सॉस साखर व व्हॅनिला घातला की अ‍ॅपल पाय बरोबर पण छान लागतो.

लढवय्यांचे वंशज

लेखक रम्या यांनी मंगळवार, 21/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आजच मिसळपाव वरील एका लेखात बहादूर शहा जफर यांच्या गजलींविषयी वाचलं. आमच्या अंगभूत स्वभावानुसार बहादूर शहा जफर यांच्या बद्दल इतर काही माहीती गुगलली. माहीती वाचता वाचता बहादूर शहा यांच्या वंशजा पर्यंत, सुलताना बेगम, पर्यंत पोहोचलो. चहाची टपरी चालवून अत्यंत गरीब परिस्थितीत राहणार्‍या सुलतानाबद्दल वाचून वाईट वाटलं.

मसल्स दिखाऊ संस्कृती

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 21/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या बालपणी आम्ही एकमेकांना दंडाच्या बेडक्या दाखवित शक्तिप्रदर्शन करीत फिरायचो. ज्याची दंडुकळी उंटाच्या पाठीसारखी टम्म फुगणार तोच खरा शक्तिमान! आमच्या वरल्या आळीची पोरं 'तालिमगीर' होती. छाती पुढे काढून, बाह्या दुमडून किँवा बनियनवर फिरायची. त्यांचा तो दणकट देह पाहून आम्हांलाही व्यायामाची खुमखुमी यायची. मग पहाटे उठून नदीकाठच्या गवतात डबडं लपवायचं, अन् रस्त्याने धावत सुटायचं. ही आमची पद्धत. हिवाळ्याची चाहूल लागली की आम्हांला व्यायामाचा किडा चावायचाच. व्हायचं काय की पहिल्याच दिवशी दोन चार मैल पळून आल्याने दुसरा दिवस अंथरुणातच उगवायचा. पोटऱ्‍या सुजून यायच्या, फटपट बोलू लागायच्या.

व्यथा वार्धक्याची

लेखक अनिल आपटे यांनी मंगळवार, 21/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
व्यथा वार्धक्याची नको नको ते लाजिरवाणे जगणे आता आम्हाला अर्थही नसतो असल्या भेकड दुबळ्या जीवनाला दुखणे खुपणे चालू असते त्याची कटकट सगळ्यांना असुनी अडचण सदा वाटते घरच्या सर्वही लोकांना गरजे पुरते जवळी येतील ठाऊक आहे आम्हाला प्रेमाचा तिथ शब्दही नसतो वा मायेचा ओलावा आम्ही भुकेले प्रेमासाठी नातवंडे ती भूक पुरविती अंधारातील प्रकाश तारे उजळविति जीवन गगनाला अनिल आपटे

३१ डिसेंबर : मदत : हॉली-डे रिसॉर्ट ( माहिती )

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 21/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, मागच्या काही दिवसात खादाडीच्या चर्चेत जे भरभरुन प्रतिसाद आले तेच पाहुन ( असो, पण टीआरपीचा आम्हाला मोह नाही ) ही चर्चा टाकण्याचे धाडस करतो आहे. विषय : पुण्यापासुन ५०-६० किमी अंतरापर्यंत असणारे एखादी हॉलिडे रिसॉटची माहिती सांगणे अंदाजे ८-९ लोकांसाठी बजेट : नो बार ! अपेक्षा ( कमीत कमी ) : १. शहरापासुन, गर्दीपासुन, गोंगाटापासुन दु ऽऽऽऽऽ र असावे २. जंगलात, तळ्याच्या काठाशी ( मराठीत : लेक नियर ) किंवा हिल-स्टेशनवर असलेले चालेल. ३. रहाण्यास एकच मोठ्ठी डॉर्मेट्री वगैरे असलेलेच रिसॉर्टच हवे. ४. २४ तास रुम सर्व्हिस असणे अपेक्षित आहे ५.

सौ चुंहे खाकर बिल्ली हज ..........

लेखक रणजित चितळे यांनी मंगळवार, 21/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आधी खुप भ्रष्टाचाराला खत पाणी घाला. मग अंगाशी यायला लागले तेव्हा पाच कलमी कार्यक्रम राबवा (हे पहिल्यांदीच करायला पाहिजे होते). पण पुढच्या निवडणुकांची तयारी कशी झाली असती मग. पंतप्रधान बिचारे काय करणार. जो लाच घेतो, लाच देतो व भ्रष्टाचारी तो पापी व राष्ट्रद्रोही असतो. मग कोण देशप्रेमी. आपल्या संवेदना बोथट होत चालल्या आहेत. पुर्वी लाखात घपला असायचा. मग करोडोत आता म्हणे हजार करोड वगैरे. अबबब