Skip to main content

किम्म्त .. विचारांची ..

लेखक गणेशा यांनी बुधवार, 22/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सिग्नलला रीक्षात बसललो असताना समोर एक भिकारी आला सुरकतलेला चेहरा अन थरलेला हात करुन नजरेने त्याच्या मन कासावीस झाले दिवसभराच्या घाईगर्दीत विचार कुठे करतो आपण अश्यावेळेस मग हे विचार अगदी डोक्यावर नाचतात विचार..? अन आपन मध्यमवर्गीय यापलीकडे म्हणा काय करु शकतो..? देश प्रगतीपथावर चाललाय.. सेन्सेक्स वाढतोय..मग ही स्थीती का? विचारले मग मी त्याच म्हतार्‍याला का रे बाबा असा भीक मागतोस...? तसा उसळला माझ्यावर मी अवाक..परत विचार आला परिस्थीती मानसास उद्धट बनविते पुन्हा भावूकपणे मी विचारले तेंव्हा नजरेतून भाव सरकण सरकले त्याच्या एका सेकंदात त्यात दिसली त्याच्या जीवनाची व्यथीत कहानी पुढे..

जा जग !! .. (अध्यात्मिक कदाचीत)

लेखक गणेशा यांनी बुधवार, 22/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मी दिसतो तुज फ़क्त निळा सोगा घातलेला आणि शुभ्र अंगरखा पांघरलेला.. ? वेडे.. अन माझी भेट ..? कश्यासाठी .. ? अग डोकाव आपल्या आत.. अंतरात.. दिसेल तेथेही मीच, तुझे शरीराचे जळमट घातलेला... कश्यास हवे आहे तुला अंगारा ते हि त्या तरल ढगांचा ... ढग ..(हसून).. अग ठग आहेत ते क्षणात येथे ..क्षणात तेथे त्यांपासुन का शक्ती हवी आहे तुला ? वेडे तू जगतेच आहे .. फ़क्त जग सर्वांसाठी.. शोध मलाही दुसर्‍यांच्या मनात.. हो आणि म्हनु नको तेथे का पांघरलेत शरीराची जळमटे... रागवलीस ..? बर सांगतो मी मी आहे असाच निद्रिस्त सर्व मानवात.. ओळख माझी अशीच ..

९/११ कारस्थान - काहि शोध

लेखक वडिल यांनी बुधवार, 22/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
९ /११ /२००१ हा दिवस ९/११ म्हणुन जगभर प्रसिध्दिस आला. ११ सप्टेंबर ला अमेरीकेतील न्यु यॉर्क शहरातील सर्वात उंच इमारती दोन विमानां चा वापर करुन पाडल्या. ह्या घटने मागे इस्लामी अतिरेकी होते असे जग जाहिर करण्यात आले. गेल्या दहा वर्षात ह्या घटने मागचा शोध चालु आहे पण अनेक गोष्टि संशयास्पद वाटत आहेत. वेब वर अनेक संस्थळे काहि पुरावे देवुन ह्या घटने मागिल सत्यता पडताळुन पहात आहेत. काहि नवे पुरावे पुढे येत आहेत ज्यामुळे अमेरीकन सरकार आणि काहि यहुदि ( ज्यु) लोकं , सि आय ए ( अमेरीकी गुप्त हेर संस्था) आदि ९/११ घटने मागे असावेत असे संकेत आहेत.

अशोक केळकर यांना 'रुजुवात'साठी साहित्य अकादमी पुरस्कार

लेखक चिंतातुर जंतू यांनी बुधवार, 22/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर यांना 'रुजुवात' या लेखसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकवाङ्मय गृहानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. वाङ्मयाची आणि कलेची आस्वाद मीमांसा आणि समीक्षा या विषयांतल्या केळकरांच्या काही लेखांचं संकलन या पुस्तकात आहे. म्हैसूरची भारतीय भाषा संस्था (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिअन लँग्वेजेस), मुंबईची राज्य मराठी विकास संस्था, पुण्याची मराठी अभ्यास परिषद अशा संस्थांमागे केळकरांची प्रेरणा आणि त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. वैखरी, मध्यमा वगैरे त्यांची भाषाविषयक पुस्तकंही मराठीत यापूर्वी रसिकप्रिय झाली आहेत.

अग्नि..

लेखक ज्ञानराम यांनी बुधवार, 22/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कालजात माझ्या अजून राग आहे , मेलेल्या नजरेला अजून जाग आहे, कोण विझवेल माझि चिता हि माझि?
काव्यरस

मंथूनी नवनीता...व्यर्थ कथा सांडी मार्ग।

लेखक प्यारे१ यांनी बुधवार, 22/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सद्ध्या देव, धर्म, ईश्वर, पुराण असे विषय आले की धर की आपट, धर की आपट (सौ. बारीक टा.) असे विचारवंत लोकांचे सुरु असते. आणि ज्यांना हे धर आपटणे सुरु असते ते 'बर्‍याचदा' ज्या कौटुंबिक, सामाजिक वातावरणात वाढलो गेलो त्यातून आलेली भोळसट श्रद्धा असणारे, सारासार विचार न करण्याची, तसा विचार करु न देण्याची दडपशाहीची, भीतीची निर्माण झालेली भावना कारणीभूत झालेले लोक असतात. (देवाचे ना करायलाच हवे असे मत, का कशासाठी ते ठाऊक नसले तरी चालेल ) जुन्या भारतीय तत्वज्ञानामध्ये (अर्थातच वैदिक्/हिन्दू) बरेच मतप्रवाह आहेत आणि त्यामध्ये मूळाकडे जाण्याची प्रेरणा जाणून घेण्याचा प्रयत्न सर्व मार्गांमध्ये आढळतो.

युध्द : जागतिक अर्थव्यवस्थे ची गरज ?

लेखक वडिल यांनी बुधवार, 22/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिक अर्थव्यवस्था कोलमडत आहे. अमेरीके सारखा श्रीमंत देश जवळ जवळ कंगाल झाला आहे. युरोप त्याच स्थितित आहे. भारत , चीन, ब्राजिल, रशिया सारखे देश जागतिक अर्थव्यवस्था पुन: जिवित करतील अशी आशा जगभर आहे. ओबामा नंतर रशिया, चीन , फ्रान्स आदि देशांचे प्रमुख भारताचे कौतुक करुन (हरभर् या च्या) झाडावर चढवत आहेत. स्वत: च्या फायद्या साठि भारतीय बाजारपेठ आणि कन्जुमर कडे सगळ्यांचे लक्ष आहे. युध्द शस्त्राचा भारत हा मोठा आयात कर्ता आहे.

चिलीया बाळाची कथा

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 22/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
दत्तगुरूच्या संदर्भातील काही कथांवर इथे बरेच चर्वण झालेय. त्याच संदर्भातील एक गाणे आठवले . त्या गाण्यात " चिलीया बाळाची बारीक भाजी " असे काहीसे शब्द होते ती कथा नक्की काय आहे हे कोणास ठाऊक आहे का? असल्यास ती कथा काय आहे ते सांगावे. चिलीया बाळ कोण होता ? दत्त संप्रदाय आणि नाथसंप्रदाय हे एकच की वेगवेगळे? हे संप्रदाय कोणी स्थापन केले? नाथ संप्रदयातील गुरुपरंपरेबद्दल कोणी सांगेल का?