अ ख्रिसमस मिरॅकल

लेखनविषय:
लेखनप्रकार
सुजीत, मनिषा आणि अर्णवला बाय करून अनंतराव घरात आले. बाहेरच्या बर्फाळ हवेतून घराच्या हीटर लावून उबदार ठेवलेल्या पोटात आल्यावर त्यांना जरा बरं वाटलं. किचनमध्ये जाऊन त्यांनी हॉट चॉकोलेट ओतून घेतले आणि पुढच्या खोलीत येऊन गुबगुबीत सोफ्यावर अलगद बसले. दोन दिवस एवढ्या मोठ्या बंगल्यात आता एकट्यानेच राहायचं या विचाराने त्यांच्या मनावर गरम दुधावर साय जमा होते तसा एक उदासवाणा तवंग जमा झाला. त्यांना वत्सलाबाईंची आठवण झाली. तशी ती इतरवेळीही दिवसातून पन्नासवेळा होतच असे. वत्सलाबाई जाऊन आता वर्ष होत आलं असलं तरी इकडे आल्यापासून त्यांची आठवण खूपच यायला लागली होती.

अभिनंदन !!!

लेखनविषय:
लेखनप्रकार
आताच हाती आलेल्या व्रुतानुसार आपले सगळ्यांचे लाडके मित्र श्री. कुन्द्या ह्यांस पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. तरी त्यांचे मिपा परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन !!!

हे कसे शक्य आहे?

मला खरच वाटेना १०० एक स्त्री पुरुष आदी मानवासारखे कसे सौना एकत्र घेऊ शकतात ?
संदर्भ - http://misalpav.com/node/15996 माझे स्प्ष्टीकरण - ज्या समाजात लैंगिक घुसमट होत नाही त्या समाजाला अशी पक्वता लाभणे शक्य आहे.

जगावेगळे विश्व कवीचे -

लेखनविषय:
जगावेगळे विश्व कवीचे अक्षरांसवे खोड्या करता - चिमटे काढी वा गुदगुल्या सराईतपण हाती येता ! जे ना दिसते कधी रवीला - म्हणे नेमके कवीस दिसते पाताळातुन थेट अंबरी - कवी - भरारी चालू असते ! बालपणी वा जरठपणी , खरडावी लेखणी वाटते ! परी लेखणी हाती असता कवीमनीं का खंत दाटते ! जुळवू कैसे यमकाला मी ! व्याकरणाला मनात भीता , गण - वृत्ता मी कसे ओळखू - काव्य - प्रचूती वाढवि चिंता ! अ - रसिका पहिले वंदावे - कवितेचे ते बोट धरावे , टीकाकारा मुळी न भ्यावे स्वानंदास्तव मस्त लिहावे !!

नूतन मराठीचा गौरव

लेखनविषय:
- जाने १९७९ निरलस प्रेमे रमवी मज तू तव सन्निध अये नूमवि भरोनी वाहो घट प्रेमाचे सदासर्वदा हे नूमवि मन्मातेपरि निज प्रेमाने टाकिसी भारूनी हे नूमवि यास्तव मज ह्या तव वास्तूचे बहूत प्रलोभन हे नूमवि मन्बंधूंचे लालनपालन केले हो या नूमवीने प्रणमुनी गातो गौरव आता या नूमवीचा प्रेमाने रम्य काल तो बहूमोलाचा आता मी त्या आठवितो तव प्रेमाचे दवबिंदू हे नयनातून मी साठवितो गौरव गाता उच्च स्वरांनी गगन मंडले दुमदुमती ती ही नूमवि अजुनीही रिझवी भासे मजला नवी नवी अतुल अपूर्व पराक्रमाने जगूनी जगती मानाने हे नूमवि तुज मिरवू आम्ही गाजवू ही ती दिग्गगने तव वैभवी जी विभा विमलतम ज्या विभूतीनी पसरविली त्या तेज

.. C.P.M.

लेखनविषय:
लेखनप्रकार

बाजूला स्वपत्नी (आणि रिमोट मिळाला तर स्वतःही. वोखटे का बोला..?) कट कट कट करुन चॅनेल बदलत असते. तिचा स्पीड ३० सीपीएम (चॅनेल्स पर मिनिट्) आहे. माझा २० आहे.

आता दोघांच्याही चॅनेल बदलण्यात सफाई तर खूप आलीय..पण स्पीडवर विशेष कष्ट घेणे आवश्यक आहे.

.........
लडकी है एक नाम रजनी है..
रजनी की एक ये कहानी है..

अशा काहीतरी ओळी निळ्यातून एकदम अचानक उगवतात आणि दूरदर्शनच्या शिर्वलांची आठवण होते.

मिपाकरांच्या त्रासदायक सवयी

लेखनविषय:
लेखनप्रकार
वा रे वा फक्त नवरा बायकोंच्याच सवयी त्रासदायक नसतात. मिपा करांच्या देखील काही त्रासदायक सवयी असतात. त्यापैकी टॉप १० (तुम्हाला मराठी काळात नसल तर इंग्लीश मधून मुख्य १०). १. चांगले चांगले लेख क्रमश: मध्येच दाबून ठेवणे. ज्यामुळे मिपा आलतु फालतू लेखांच्या भडिमारामुळे वाचनास निरुपयोगी होऊन बसते. २. आपले लेख किंवा प्रतिसाद अंगाशी यायला लागल्यावर (त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभ न राहता) उडवून लावणे. या भयंकर अ‍ॅनॉयींग सवयीबद्दल जितकं बोलाल तितकं कमीच आहे. पण आवरतं घेतो. ३. एकोळी धागे - निदान तुमच्या मताची तरी गरज असते. फक्त लिंक देऊन चालत नाही. ४.

डॉ. बिनायक सेन

छत्तिसगडमधील एक प्रमुख कार्यकर्ते, आदिवासींसाठी आरोग्यसेवांबाबत काम करणारे, आंतरराष्ट्रिय स्तरावर ज्यांच्या कामाची दखल घेतली गेली आहे असे डॉ. बिनायक सेन यांना आज रायपुर जिल्हा न्यायालयाने माओवाद्यांना मदत केल्याच्या आणि त्यामुळेच देशद्रोहाच्या गुन्ह्याबद्दल दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या निकालाबाबत सध्या बरीच भवतीनभवती चालू आहे. डॉ. सेन यांच्या समर्थकांनी त्यांची बाजू जोरदारपणे उचलून धरली आहे. जालावर जे काही थोडेसे संदर्भ मिळत आहे त्यावरून तरी डॉ. सेन यांच्यावरचा गुन्हा अगदी निर्विवादपणे शाबित होत आहे असे वाटत नाहीये.

नवर्‍यांच्या त्रासदायक सवयी

लेखनविषय:
वा रे वा आम्हा बायकांच्याच त्रासदायक सवयी नसतात काही. नवर्‍याच्या देखील काही सवयी त्रासदायक असतात. त्यापैकी टॉप १० (मुख्य १०). (१) टूथपेस्ट मधूनच दाबून ठेवणे. ज्यायोगे पुनर्वापरास ती निरुपयोगी होऊन बसते. (२) टॉयलेट सीट वरचे वरच ठेवणे. या भयंकर अ‍ॅनॉयींग सवयीबद्दल जितकं बोलाल तितकं कमीच आहे. पण आवरतं घेते.
Subscribe to