Skip to main content

मुलगी ही लायाबिलिटी ?

लेखक तिमा यांनी बुधवार, 29/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्याच टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार एका सुप्रीम कोर्टाच्या महिला न्यायाधीशांनी आपल्या दोन्ही अविवाहित मुलींना 'लायाबिलिटी' म्हणून दाखवले आहे. आधीच आपल्या देशांत मुलींचे प्रमाण कमी होत चालले आहे म्हणून सरकारी पातळीवरुन ' मुलगा किंवा मुलगी' काहीच फरक नाही अशा अर्थाच्या जाहिराती चालू आहेत. त्याच्या विरुध्द जाणारे हे विधान आहे. स्त्री ही कधी समाजाच्या गळ्यातली धोंड होऊ शकते का ? लग्नाचा खर्च तर हल्ली मुलांनाही येतो. स्त्री पुरुष समानता या देशात कधी येणार ? हा स्त्री वर घोर अन्याय आहे म्हणून त्याचा तीव्र निषेध !!!

Bachelor's चिकन करी

लेखक खादाड अमिता यांनी बुधवार, 29/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या चिकन करीला bachelor's हे विशेषण देण्याचे कारण हे कि ही चिकन करी बनवायला काही पण वाटणे, घोटणे, कालवण करावे लागत नाही. फक्त एक कुकर आणि तो ही नसेल तर एक मोठं भांडं लागतं. तर तुमच्या मित्रांना किंवा (अम्म्म्म ... ) मैत्रिणींना impress करायचं असेल तर ही चिकन करी नक्कीच तुमच्या मदतीस येईल.

गणपा ह्यांची बेक्ड वांग्याची रेसिपी तसेच शॅलो फ्राय भरले वांगे.

लेखक जागु यांनी बुधवार, 29/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
परवा गणपा यांची बेक्ड वांग्याची रेसिपी पाहीली आणि ही करायचीच असे मनाशी ठरवले. त्यांच्या सगळ्याच पाककृती म्हणा अस ठरवायला भाग पाडतात. घरी सकाळीच मोठ्या वांग्याची भेट आलेली हाही एक योगायोग होता. मग घरी जाताना भाज्या घेउन जाण्याचा खटाटोप केला.

सोकावलेल्या अंधाराला इशारा

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 29/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सोकावलेल्या अंधाराला इशारा सोकावलेल्या अंधाराला, इशारा आज कळला पाहिजे वादळ येऊ दे कितीही पण, हा दीप आज जळला पाहिजे आंब्याला मानायचे कांदा, किती काळ असेच चालायचे? डोळे उघडून तू वाग जरा, नकोसा वाद टळला पाहिजे गाय इकडे आणि कास तिकडे, चारा मी घालायचा कुठवर? कधीतरी इकडे; या बाजूस, दुधाचा थेंब वळला पाहिजे प्रवेशदाराचा ताबा घेत, का उभा ठाकला आहेस तू? माझा प्रवेश नाकारणारा, इरादा तुझा ढळला पाहिजे आता थोडे बोलू दे मला, ऐकणे तुही शिकायला हवे हे आवश्यक नाही की तूच, दरवेळेस बरळला पाहिजे निर्भीडतेने 'अभय' असा तू, यज्ञकार्य असेच चालू ठेव ग्रहणापायी झाकोळलेला, चंद्र आता उजळला पाहिजे
काव्यरस

सगळेच अवघड होऊन बसले आहे ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 29/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
जगणे अवघड होऊन बसले आहे काही नाही तरी काहीतरी हवे आहे घरावरचे निळे आभाळ चंद्र चांदण्या नि काय नि काय सगळे डकवून ठेवले आहे कधी कोसळेल हे आभाळ कुणास ठाऊक ...? सगळेच अवघड होऊन बसले आहे हे ...
काव्यरस

बरान

लेखक अर्धवट यांनी बुधवार, 29/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
माझिद माझ्दी हा माझा अत्यंत आवडता दिग्दर्शक. कलर ऑफ पॅरेडाइज, चिल्ड्रन ऑफ हेवन, द फादर अशा सगळ्याच कलाकृतींचा मी प्रचंड चाहता आहे. माझ्या तेहेरानच्या वास्तव्यात माझी या असामीची भेट होऊ शकली नाही याची अजुनही मला हुरहूर वाटते. त्यांच्या सर्व कलाकृतींमधे माझी विशेष आवडती फिल्म म्हणजे 'बरान' रशिया - अफगाण युद्धामधे विस्थापीत झालेले अफगाणी निर्वासीत लोक लपूनछपून तेहेरान बाहेरच्या निर्वासीतांच्या छावण्यांमधून दुर्दैवाचे दशावतार भोगताहेत.

चल चांदण्यात जाउ...

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 29/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
चल चांदण्यात जाउ... अंगणातल्या गुलमोहराखाली आरामखुर्चीत बसून सतीश प्रवासाची आणखी काय काय तयारी राहीली ह्याचा विचार करीत होता. संध्याकाळची फ़िकट उन्हे अंगणात पसरलेल्या लाल पिवळ्या सड्यावर रेंगाळत होती. झाडावर असतांना दिमाखात डवरलेली ती चटपटीत शाल आता तुसे तुसे होऊन जमिनीवर विखुरली आहे असे वाटत होते. उद्या सकाळी बाई कचरा झाडून बाहेर फ़ेकून देईल. “चहा थंड झालाय समोर. कुठल्या तंद्रीत आहेस?” सुमतीची हाक सतीशच्या कानाच्या बाजुने भिंत ओलांडून शेजारच्या रमाबाईंकडे पोहचली. “ह्यांचे बरे आहे. दोन्ही मुलांची लग्ने हो़उन आपापल्या गावी सेटल झालीत. ह्यांना इथे काही व्याप ना ताप.

हिमवादळ !

लेखक मीली यांनी बुधवार, 29/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
न्यू जर्सी मध्ये यंदा खूप म्हणजे खूप बर्फ पडला.आमच्या घराची बाल्कनी तर बर्फाने पूर्ण भरून गेली होती.त्याचे काही फोटो ! बर्फा मध्ये अडकलेल्या गाड्या काढताना नाकी नऊ आले होते अगदी! बर्फाने झोडपलेल्या खिडक्या व बाल्कनी.