Skip to main content

युगलगीतः आपला संसार सुखाचा करूया

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 29/12/2010 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगीतः आपला संसार सुखाचा करूया
दोघः दोन इंजीनांची... दोन इंजीनांची गाडी आपण चालवूया आपला संसार सुखाचा करूया ||धृ|| तो: तुम्हीही कमवा अन मीही कमवते दोन पैसे संसाराला मीही आता लावते ती: नाही काही आता काळजी करायची चिल्यापिल्यांना आता आपण मोठं करूया दोन इंजीनांची गाडी आपण चालवूया ||१|| तो: दोघं मिळून आपण कामधाम करू या दिवस रात सारी मेहनत करू या ती: कष्टाने कमवू अन पोटभर खावू घाम गाळून गोडीचा संसार फुलवूया दोन इंजीनांची गाडी आपण चालवूया ||२|| तो: ये ग जरा दोन घास खावून घे ग नाही म्हणू नको, उपाशी राहू नको ती: तुम्ही काय सदा मला खावू घालता एकटी मी नाही खात, सारे एकत्र खावूया दोन इंजीनांची गाडी आपण चालवूया ||३|| दोघः दोन इंजीनांची गाडी आपण चालवूया आपला संसार सुखाचा करूया ||धृ|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २२/१२/२०१०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1730
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया