Skip to main content

रिक्षावाले

लेखक अर्धवट
Published on शुक्रवार, 04/02/2011
कुठल्याही शहरातले रिक्षावाले यांचं माझ्याशी नक्की नातं काय हा प्रश्न मला अजून सुटलेला नाहीये. माझ्या चेहरयावर केवळ ह्या लोकांनाच वाचता येणाऱ्या भाषेत कायमचा एक यडबंबु भाव कोरून ठेवला असावा, किंवा त्यांना केवळ माझा चेहेरा पाहून 'हा येणारा इसम अगदीच ‘हा’ असून ह्याला गंडवलं नाही तर संघटना आपल्याला वाळीत टाकेल' अशी भीती वाटत असावी. नेमका मी गेल्यावर ‘ह्याला आपल्या घरी आज फुकट जेवायलाच घेऊन जायचंय’ असे चेहरे करून बघतात लेकाचे. त्रास ‘नाही’ म्हणल्याचा होत नाही हो, ते ज्या हलकट्ट सुरात म्हणतात त्याचा होतो.

वेज हाक्का नूडल्स

Published on शुक्रवार, 04/02/2011
दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे. सकाळचा नाश्ता करायला न मिळाल्यामुळे तुम्हाला कडकडून भूक लागली आहे. अशातच तुम्हाला गुप्त खबर मिळते कि तुमच्या हापिसातल्या खानावळवाल्याने (खानावळ हा योग्य शब्द आहे, कँटीन म्हणाव अस थोर पक्षी:चविष्ट काम काही त्या कँटीन वाल्याने केलेले नाहीये ) काही नवीन (?) पदार्थ विकायला सुरुवात केलेली आहे. हर्षाची लहर मनात उठून तुम्ही थेट त्या कँटीनच्या दिशेने चालायला सुरुवात करता. पोटातले कावळे ४ मिनिटांच अंतर १ मिनिटात पार करायला उद्युक्त करतात.

तुझ्या विना इथे प्रभू रे , सांग काय जगणे आहे..?

Published on शुक्रवार, 04/02/2011
मम अंतरीचे तरंग , तूच जाणसी बापा , मुक्या भावनांचे शब्द , तूच मांडसी बापा मी अर्पीले स्वतःला , अन माझीच फूले झाली चरणी लागता तुझीया , मी मोक्षात रे नहाली मी रीक्त झाहले जगती , सांडून वैभव सारे अन घातले ओटित माझ्या , तू विश्वाचे सूख सारे मोह मायेने घातला विऴखा , तू अलगद मो़कळे केले तोडून मोहाचे जाळे , सारे मार्ग मोकळे केले. काहीच न दिले तुजला, झाले संसाराचे पसारे अन तू झेलले एकट्याने , माझ्यावरील निखारे किती गर्द दाटले नभ, तू साथ दिलीस तेव्हा दिलास मायेचा उबारा , भितीने भिजले जेव्हा काय वर्णू तुझा महीमा , आज शब्द तोकडे पडले देह झाला हा पुण्याचा , तुझे वेड मजसी जडले.. मी शोधत होते

कट्टी अलमट्टीशी

लेखक शरदिनी
Published on शुक्रवार, 04/02/2011
चारा वैरण नेसून पैरण विकसित मार्गा ऊर्जा भक्षण नकोनको ते एकलजीवन बुद्धी नेव्हर वांछी अट्टल चोरा कत्तल साची डिंडिमवृद्धी फ़ुटाफ़ुटाची कशास मागे धावून पाहे उंची अलमट्टीची तवंग कट्टर भालाबरची प्रवेशचंचू मृगेन्द्रकैची नोनचिचुंद्री कुरतडचीची गोचीड पंखी लोभस गोची सांगा सत्वर .... कुठे वाढली किती जाहली ................उंची अलमट्टीची ??? आर्द्रलाकडे बोलटभीरू भल्या पहाटे उठला मोरू दिव्या काव्या बेहतरनारू कॉकसस्ट्रेप्टो कीड विखारू तोडमोजड्या सलज्जचोच्या कलादुगाण्या गोरजमिथ्या पत्रीगोत्री अट्टलभोज्ज्या जळूवाकडे द्विदलकुपथ्या उजाडबागी तद्धितझोला हटयोग्याचा स्वतंत्र चेला अटकेपारी तुरुंग लोला तख्

टोमॅटो राईस

Published on शुक्रवार, 04/02/2011
साहित्य : बासमती तांदुळ - १ वाटी लवंग - २ दालचिनी तेजपान - १ वेलची - २ जिरे - २ चमचे तेल मोहरी - १ चमचा चणा डाळ - १ चमचा उडीद डाळ - १ चमचा कढीपत्ता आलं बारीक कापुन - अर्धा चमचा साखर - चविपुरती मीठ कांदा बारीक कापुन - १ हिरव्या मिरच्या- २ टोमॅटो - ३ हळद - अर्धा चमचा लाल तिखट - १ चमचा धणे पावडर - १ चमचा गरम मसाला - अर्धा चम

एक खिडकी , एक मुलगी

Published on शुक्रवार, 04/02/2011
आज ऑफीस मध्ये एक मुलगी खिडकीतून बाहेर बघत होती , कितीतरी वेळ शून्यात बघत , त्यावरून एक कविता सुचली (सांभाळून घ्या बरेच दिवसनि गुस्ताखी) एक खिडकी , एक मुलगी एक झुळुक , एक लकेर एक सर , एक साठवण एक प्रियकर एक आठवण एक यौवन , एक विरह एक चटका एक असंग एक झुळुक एक स्वप्न एक पायवाट एक चातक एक खिडकी , एक मुलगी ..एक खिडकी , एक मुलगी !
काव्यरस

एग हाक्का नूडल्स

Published on शुक्रवार, 04/02/2011
एशियन पदार्थ बाकी युरोपिअन किंवा अमेरिकन पदार्थांपेक्षा जास्त आरोग्यपूर्ण असतात. तसाच एक पदार्थ म्हणजे घरी केलेल्या stir fried noodles/vegetables. घरी केलेल्या हे महत्वा चे कारण आपल्या कडे सर्रास मिळणारं ठेल्या वरचं 'इंडिअन चायनीज' हे बर्यापैकी तेलकट असतं.

मी नथुराम गोडसे बोलतोय .............

Published on शुक्रवार, 04/02/2011
या नाटकाचा काल ठाण्यात पुन्हा एक प्रयोग हाउस फुल झाला . नथुराम या व्यक्ती रेखे बद्दल समाजात २ मतप्रवाह आहेत . काही गांधी प्रेमी फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करतात. विरोध करायचा तर वैचारिक दृष्ट्या करावा असे माझे मत आहे. नाटक बंद पडून की साध्य होणार आहे . मिसळपाव प्रेमीना या बद्दल की वाटते जाणून घेण्यास उत्सुक . ================================ सावरकर भक्त , नथुराम समर्थक -- चिपळूणकर

कालपासून उद्याची चिंता

Published on शुक्रवार, 04/02/2011
परवाच मला माझा एक 'कालपासून उद्याच्या चिंतेत असलेला' मित्र भेटला. म्हटलं, "मित्रा कसा आहेस? काय चाल्लंय?" वास्तविक काही प्रश्न हे फक्त विचारायचे म्हणून विचारलेले असतात हे वास्तवात रहाणार्‍या माणसाला समजतात. पण त्याने ते प्रश्न फारच मनावर घेतले आणि कोणीतरी सहज का होइना पण आपल्या वर्तमानाबद्दल विचारतय हे बघून तो म्हणाला, "मागच्या पानावरून पुढे सुरू आहे. कालही उद्याची चिंता करत होतो, आजही तेच. सगळी सुखं जरी पैशाने विकत घेता येत नसली तरी अशा सर्व सुखांपर्यंत पोहोचण्याची माध्यमं मात्र खर्चिक असतातच.

ज्योतिषविरोधी याचिका फेटाळली

Published on शुक्रवार, 04/02/2011
ज्योतिषशास्त्र हे चार हजार वर्षापूवीर्चे शास्त्र असून राज्यघटनेच्या धर्मरिनपेक्षतेच्या तरतुदीला त्याची बाधा होत नाही, अशी माहिती गुरुवारी हायकोर्टापुढे केंदापुढे देण्यात आल्याने त्याविरोधातील जनहित याचिका कोर्टाने निकाली काढली. या संदर्भात जनहित मंचचे भगवानजी रैय्यानी यांनी केलेल्या याचिकेवर मुख्य न्या. मोहित शहा व न्या. वजिफदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यात केंदातफेर् या शास्त्राबद्दल वरील भूमिका व्यक्त करण्यात आली. ज्योतिषशास्त्री बेजान दारूवाला आणि इतरांकडून होणाऱ्या या व्यवसायालाच याचिकेत आव्हान देण्यात आले होते.