साहित्य : बासमती तांदुळ - १ वाटी
लवंग - २
दालचिनी
तेजपान - १
वेलची - २
जिरे - २ चमचे
तेल
मोहरी - १ चमचा
चणा डाळ - १ चमचा
उडीद डाळ - १ चमचा
कढीपत्ता
आलं बारीक कापुन - अर्धा चमचा
साखर - चविपुरती
मीठ
कांदा बारीक कापुन - १
हिरव्या मिरच्या- २
टोमॅटो - ३
हळद - अर्धा चमचा
लाल तिखट - १ चमचा
धणे पावडर - १ चमचा
गरम मसाला - अर्धा चमचा
काजुचे तुकडे - १ चमचा
कोथिंबीर
कृती : तांदुळ धुवुन अर्धा तास ठेवुन द्यावे.
एका भांड्यात २ चमचे तेल गरम करुन त्यात जिरे , तेजपान , दालचिनी , लवंग व वेलची घालावी. त्यात तांदुळ घालुन परतुन घ्यावेत. दोन वाट्या पाणी व मीठ घालुन मोकळा भात शिजवुन घ्यावा.
भात जरा गार होउ द्यावा.
नंतर एका भांड्यात २-३ चमचे तेल गरम करावे, त्यात चणा डाळ व उडीद डाळ घालुन थोडावेळ परतावे.
नंतर मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यानंतर त्यात जिरे , काजुचे तुकडे , आलं , कढीपत्ता , हिरव्या मिरच्या घालुन परतावे. कांदा टाकुन गुलाबी रंगाचा होइपर्यंत परतावा. त्यानंतर हळद , लाल तिखट, धणे पावडर घालुन एकत्र करावे. यात बारीक कापलेले टोमॅटो , साखर , मीठ, गरम मसाला घालुन टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत परतावे. यात शिजवलेला भात घालुन चांगले एकत्र करावे.
कोथिंबीर घालुन खायला द्यावे.

याद्या
6718
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त... शेवटचा फोटो कसला खतरा
आहाहा!!!
काय मस्त दिसतोय भात !आत्ताच डाऊन्लोड करुन घेते.
In reply to आहाहा!!! by कच्ची कैरी
Highly advanced technology :
In reply to काय मस्त दिसतोय भात !आत्ताच डाऊन्लोड करुन घेते. by आजानुकर्ण
अशक्य !! गणपाभौ म्हणतोय तस
टॉमॅटो राईस .. आरारारा ...
प्राजक्ता पवार,(तुझा एकेरी
वा! बढीया !
छान..
मलाही जाम आवडतो.. मी टोमॅटो
पाकृ आवडली, शेवटचा फोटो मस्तच
In reply to मलाही जाम आवडतो.. मी टोमॅटो by प्राजु
एम डी एच चा किचन किंग मसाला.
In reply to पाकृ आवडली, शेवटचा फोटो मस्तच by सखी
फोटू,कृती छानच. सजावट अगदी
प्राजुतायचा सल्ला बरोबर आहे..
शेवटचा
झबर्डस्ट.... फोटु तर एकदम
धन्यवाद !
छान
शेवटचा फोटो जबरी!
कसला जीवघेणा फोटू आहे तो!