Skip to main content

(पाठीखालच्या भागावर )

लेखक अडगळ
Published on बुधवार, 16/02/2011
लहानपणी ज्या ज्या लोकांनी आम्हाला मारहाण केली त्या सार्‍यांना सप्रेम सादर : प्रेरणा अर्थात ही पाठीखालच्या भागावर बसलेले अनेक रट्टे दात लहानपणी गोट्या खेळतांना पाडलेले, क्रिकेटच्या स्टंपने फोडताना कधी, तर कधी उगाचच. बापाचे बाहु बुकलण्यासाठी आतुर झालेले. चुकार आयशी मधूनंच , मार देत फुकणी परजत, आणि झाडणीने अंगभर सडकत मारताना वेळेचे भान नसे. अकलेचा कांदा असल्याच्या सबबीवर मुस्काट फोडताना पोटात मारलेल्या बुक्क्या अन हाताला लागलेला खडू अंगभर पसरत असे. आता स्वतः बाप झाल्यावर पोरासोरांना बुकलतान
काव्यरस

प्यासा

लेखक विकास
Published on बुधवार, 16/02/2011
लोकसत्तेत वाचले... व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने टाईम साप्ताहीकाने १० "प्रेमकहाण्यां"च्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. त्यात पाचवा चित्रपट हा गुरूदत्तचा प्यासा आहे.
Where did classic Hollywood go when it died?

....... नरें निर्मिले

लेखक सुनील
Published on बुधवार, 16/02/2011
जेपर्डी ह्या प्रश्नोत्तराच्या (खरे तर उत्तर-प्रश्नाच्या) कार्यक्रमात कालपासून एक आगळा-वेगळा प्रयोग सुरू झाला आहे. एरवी ह्या कार्यक्रमात तीन स्पर्धक व्यक्ती भाग घेतात. परंतु, १४, १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी होणार्‍या कार्यक्रमांत दोन व्यक्तींसमवेत IBM ने बनवेली WATSON नावाची संगणक प्रणाली भाग घेणार आहे. जगातील विविध विषयांवरील अब्जावधी बाईट्सचा विदा ह्यात भरलेला आहे. प्रश्न समोर येताच त्याचे पृथःकरण करून, विदा धुंडाळून उत्तर काढण्याचे काम ही प्रणाली करील. कालच्या अपूर्ण राहिलेल्या कर्यक्रमाच्या अखेरीस, ही प्रणाली आणि एक स्पर्धक ५००० डॉलरची रक्कम मिळवून आघाडीवर होते.

क्रांती ~ आणि क्रांतीमधील एका 'आयकॉन' च्या फोटोची जादू...!!

Published on मंगळवार, 15/02/2011
CheA" alt="CheA" /> इजिप्तमध्ये अखेर "क्रांती" झाली आणि एक सत्ता उलथवून टाकण्याची एकजुटीची शक्ती जनतेत कशी आणि केव्हा एकवटते याचे पुनश्च एकदा जगभरातील क्रांतीप्रेमींना प्रत्यंतर आले. अर्थात हा लेख त्या क्रांतीवर नसून एका क्रांतिवीरावर आहे.

(पारावरचं आत्मचरित्र)

Published on मंगळवार, 15/02/2011
ही प्रेरणा. पारावरचं आत्मचरित्र वाचताना टोचलेले खडे काही उगाच गमजा मारताना टाकलेले तर काही असेच निष्कारण अजाणतेपणी सुटलेले चुकार फ्रेंड्स मधूनच लाईक करत हवेत चढवत आणि चेहेर्‍याची पुस्तकं टाकताना, लिहीताना वेळेचे भान नसे चुचकारताना डबके झालेल्या, जाहीर लिहीताना हवेत मारलेल्या उड्या अन् अंगावर उडवलेला चिखल भिंतभर पसरवत बसे. आता काम साधल्यावर दारं बंद करून घेताना उगाचच जीव कसानुसा होतो काहीतरी टोचतं आणि अडगळीत पडल्याचा भास जाता जात नाही. माझ्यासकट सर्व attention hogs ना समर्पित.
काव्यरस

आकाशातील मी घन काळा

लेखक गणेशा
Published on मंगळवार, 15/02/2011
आकाशातील मी घन काळा रोज शृंगारीत होतो मी लेऊन रंग शलाका नाही सीमा नाही बंधन नभात स्वैर फिरणारा मी मेघ-राजा पण लोभ असा मज जडला प्रवास संपून गार हवेच्या प्रेमात जीव अडखळला प्रीतीत तिच्या मी जग विसरून गेलो अस्तित्वास मुकून मी आज बरसून गेलो आसवांच्या झाल्या जलधारा जीवनाचा हा खेळ सारा जन्मण्यास पुनश्च देह माझा नदीसागरात विलीन झाला --------- शब्दमेघ ( २००७)

डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग ५

लेखक अवलिया
Published on मंगळवार, 15/02/2011
मागील भाग - http://misalpav.com/node/16785 *** उन्हाळातल्या लाहा लाहा होणार्‍या दिवसांत अचानक कुठुन तरी चुळुक चुळुक आवाज येतो. घूंगरांचा तो परिचित आवाज येताच मनाला जवळच रसवंती असेल असे समजते आणि कोरड्या झालेल्या घशाला अन तापलेल्या डोक्याला थंड करण्यासाठी पाय आपोआप त्या आवाजाच्या दिशेने चालू लागतात. कधी जोरजोरात आवाज करणारा टेपच जवळच्या रसवंतीची सूचना देत असतो. गेल्याबरोबर हाफ नाही तर फुल्ल ची ऑर्डर देत आपण हाश्श हुश्श करत बसतो. समोर रस येताच पटकन ते अमृत घेत, तृप्त होत परत आपल्या मार्गाने निघुन जातो. किती वेळा आपण त्या रसवंतीत कामाला असलेल्या लोकांचा विचार करतो ? बहुधा नाहीच.

एक सर्व्हे- आय.टी. कामगारांचा !

Published on मंगळवार, 15/02/2011
(मला आलेल्या एका इ-पत्राचा मराठी अनुवाद) * १०% आय.टी. कामगार हृदयविकार,मणक्याचे आजार,सांधेदुखी इ. ने त्रस्त असतात. * २०% आय.टी. कामगार त्यांच्या सहकार्यान्शीच लग्न करतात.(च्या मायला) * ३०% आय.टी. कामगार हे 'लिव इन रिलेशन' मध्ये राहण्यात उत्सुक असतात .कारण त्यांना ऑफिस आणि घर दोन्ही ठिकाणी जबाबदारी घ्यायला आवडत नाही. ;) * ४०% आय.टी. कामगार हे गोंधळलेले असतात कि सेटल कुठे व्हावं.(भारतात कि भारताबाहेर ???) * ५०% आय.टी. कामगारांची बँकेत काहीच बचत नसते. :( * ६०% आय.टी. कामगार त्यांच्या चालू पगाराबद्दल नाखूष असतात. * ७०% आय.टी.