ग्रो अप बेब्ज..!!
नाही नाही.."आजकालचे तरुण-तरुणी".."पाश्चात्यांचं अंधानुकरण"..असा त्रिफळाचूर्णी लेख नाही हा..तरीही हा यापूर्वी पहिल्यांदा लिहीला तेव्हा मला कोणीतरी आधुनिक बुरख्याआड लपलेले कृष्णराव हेरंबकर (अश्लीलमार्तंड) म्हणाले होते. त्या रात्री मात्र मी त्रिफळाचूर्ण नाही तरी जरा हवाबाण हरडे घेतले..असो..
तर ..
वक्षखिंड (Cleavage ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) दाखवणारे काचोळीसदृश (Bra ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) उत्तरीय घालून महाविद्यालयात येणा-या पात्रांवर ड्रेस कोड नावाचा काहीतरी निर्बंधवजा अत्याचार होतोय असं पेपरमध्ये मध्यंतरी कळलं.
मिसळपाव