Skip to main content

वाहन वीक्री उच्चांक..

Published on बुधवार, 16/02/2011
जानेवारी महीन्यातील वाहन वीक्री उच्चांक.. (एमेल च्या पोतडीतुन..) Chevrolet Optra : 296 Cruze : 715 Aveo : 240 UVA : 331 Tavera : 1691 Spark : 3267 Beat : 3338 Captiva : 91 Fiat Linea : 947 G Punto : 1203 Palio : 24 Ford Ikon : 0 Fiesta : 1059 Endeavour : 351 Figo : 8616 HM-Mitsubishi Pajero : 94 Outlander : 69 Lancer + Cedia : 21 Montero : 2 Ambassador : 450 (approx) Honda City : 5059 Civic : 508 Accord : 174 Jazz : 579 CRV : 38 Hyundai Santro : 4,648 i10 : 16,694 i20 : 5,773 Accent : 1,317 Verna : 1,858 Sonata : 11 Santa Fe : 5 Mahindra Logan : 1120 Xylo : 2733 Scorpio : 4304 Bolero : 8463 Marshall, Maxx etc. : 588 Maruti M800 : 1876 Omni : 8059 Alto : 33118 Estilo : 3652 WagonR : 14186 Dzire : 9771 SX4 : 2159 Eeco : 5886 Swift : 11353 A-Star : 4124 Ritz : 6046 Gypsy : 191 G Vitara : 1 Nissan Micra : 1784 X-Trail : 52 Teana : 21 370Z : 0 Skoda Laura : 630 Fabia : 1460 Superb : 391 Yeti : 344 Tata Nano : 6703 Indica : 10591 Indigo + Manza : 8456 Sumo : 2187 Safari : 1796 Aria : 321 Venture : 158 Toyota Innova : 5284 Corolla P : 490 Corolla D4D : 649 Fortuner : 1103 Etios : 1651 Camry : 3 Prado : 3 Landcruiser : 1 Prius : 1 VW Jetta : 247 Beetle : 20 Polo : 3,023 Vento : 2,308 Passat : 2 Phaeton : 1 Volvo S80 : 4 XC60 : 26 XC90 : 9

वाचन संख्या 5464
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

भितीदायक आहे हे :( रोड तेवढेच रहाणार , गाड्या मात्र वाढणार , पेट्रोल साठे कमी होणार पर्यायाने किमती वाढणार :) जगदंब जगदंब :( बाकी बीएमडब्लु ७३० डी बुक करणार होतो काल . मित्र म्हणाला २० किलो तांदुळ आणि २०० रुपये कॅशबॅक अशी अफलातुन ऑफर आहे ह्या गाडी वर :) पण च्यायला मी गेलो आणि ऑफर खल्लास :( म्हणुन णाही घेतली गाडी !! अवांतर : फोक्सवॅगन च्या जट्टा आणि पसाट हे मॉडल्स सद्ध्या विक्रीस उपलब्ध नाहीत , तरीही कशी काय बॉ बुक झालीयेत ? म्हणुन आकडेवारीबाबद साशंक :)

In reply to by टारझन

भितीदायक आहे हे :( रोड तेवढेच रहाणार , गाड्या मात्र वाढणार , तेव्हढेच राहणार नाहीत, गाड्या चालवण्यासाठी रोडावणार! ;)

आधीच रस्त्यावर चालताना नाकावर रुमाल ठेवावा लागत आहे! वरील आकडे पाहुन अस वाटत आहे, कि घरातुन बाहेर पडायलाच नको! कारण पुढील काही वर्षात हे आकडे कित्येक पटींनी वाढतील!

मस्तच. प्रगतीच प्रगती. आयकॉन एक पण नाही खपली? आणि अँबॅसेडर ४५० (approx)? approx म्हंटलय म्हणजे पांढर्‍याच असणार बहुतेक!

मला ४ ते ६ लाखांच्या मधली एक कार घ्यायची आहे. कंपनी लीज किंवा लोनवर. म्हटलं तर वैयक्तिक अशा बाबीसाठी वेगळा धागा काढणं बरोबर वाटत नाही म्हणून इथे औचित्य / संधी साधतो. माझी आत्ताची दहा वर्षे जुनी झाल्याने तातडीची गरज आली आहे. माझा आकार स्थूल आहे आणि उंची सुमारे सहा फूट. अर्थात ड्रायव्हर सीट पोझिशन उंचावर आणि हेड स्पेस बरी असावी. एकूण गाडी प्रशस्त असावी. पाच लोक तरी बसू शकावेत. कारमधे फार वाकून शिरावे लागू नये. (सँट्रो या बाबतीत उत्तम, पण सध्या तीच वापरतो आणि आता चेंज हवाय.) मायलेज १५ पेक्षा कमी नसावे. दिवसाला १०० किमी रनिंग आणि वीकेंडला ४०० पर्यंत. शेवरोलेची बीट टेस्ट ड्राईव्ह केली, त्यात पाय बसत नाहीत. बाकी अजून काही एक्स्प्लोअर केले नाही. फिगो नुसतीच बघितली पण खूप बुटकी वाटली. टेक्निकली कारमधले काही कळत नाही म्हणून कृपया गाडी सुचवावी. टेस्ट ड्राईव्ह करु जातो म्हटलं तरी रुटीनमधे सर्वच कार चालवून पाहत बसता येणार नाहीत. त्यासाठी मुळात एक शॉर्टलिस्ट असणं गरजेचं आहे. सुचवल्यास खूप आभारी राहीन.

In reply to by गवि

मारूतीची 'स्विफ्ट' घ्या. एकदम मस्त गाडी आहे. आरामशीर, उंच, मायलेज चांगला वगैरे.

In reply to by गवि

मायलेज १५ पेक्षा कमी नसावे. दिवसाला १०० किमी रनिंग आणि वीकेंडला ४०० पर्यंत
पुढील दोन संकेत स्थळांवर असलेल्या फोरम वर अतिशय चांगली माहिती मिळेल www.carwale.com www.team-bhp.com/ तुमच्या गरजे अनुसार मला टाटा इंडीका विस्टा (डिझेल) योग्य वाटतेय , मारुती फॅन असाल तर रिट्ज़ चा पर्याय आहे थोडे थांबणार असाल तर टोयोटा (एटिओस) हॅच बॅक आणि होंडा ५/६ लाखाच्या रेंज २०११ उत्तरार्धात लॉंच होईल.

In reply to by माझीही शॅम्पेन

दिवसाला 100 किमी रनिंग असेल तर डिझेल गाडी घेतलेली उत्तम. मारूती स्विफ्ट डिझेल हा चांगला पर्याय आहे. थोडे वाट पाहण्याची (व बजेट ताणण्याची) तयारी असेल तर निस्सान किंवा फॉक्सवॅगनच्या गाड्याही चांगल्या आहेत. पेट्रोल गाड्यांमध्ये i10 बेष्ट आहे.

In reply to by आजानुकर्ण

सहमत आहे ... जर एस यु व्ही घेणार असाल तर ऑडी क्यु७ किंवा बिएमडब्लु एक्स६ वस्ताद गाड्या आहेत . डिस्काऊंट देखील चालु आहे अलिकडे ! थोडं बजेट ताणता येत असेल तर हम्मर एच ३ येतेय इंडियात .. एखादा पेट्रोल पंप विकत घ्यावा लागेल इतकंच :) या पै़की काही नाही तर मग मारुती८०० ला पर्याय नाही :) पद्मिनी प्रिमियर पण भेटेल शेकंड हँड

In reply to by टारझन

सुचवण्याबद्दल खूप थँक्स. स्विफ्टला सर्वांचीच पसंती दिसते आहे. आणि डिझेलमधेही आहे. त्यामुळे तीच आधी ट्रायतो.. विस्टासुद्धा..मला वाटते जिचे इन्जिन फियाटचे आहे तीच का ही?

In reply to by गवि

होय !
विस्टासुद्धा..मला वाटते जिचे इन्जिन फियाटचे आहे तीच का ही?
जुन्या स्विफ्ट , विस्टा आणि पालिओ एकच डिजेल वेरियेंट आहे /होत. मात्र सध्या स्विफ्ट के-सिरीज उपलब्ध आहे.

In reply to by गवि

Toyota Prius - मजबुत (सर्वोत्कृष्ठ) मायलेज Honda CRV - तुमच्या उंचीला साजेशी

हेच सांगणार होतो..

ह्म्म्म... यात काय नवल !!! ;) हे आकडे सुद्धा कमी असतील असं वाटतया... ;) बाकी या ५०० बद्धल पण वाचा बरं का... ;) च्यामारी कोन म्हनतोय हिंदुस्थानी लोकांकडे पैका न्हाय ते ? ;) (दुचाकी चालवणारा) ;)

रोचक माहिती आहे. अल्टोने (नेहमीप्रमाणे) खपाच्या बाबतीत बाकी गाड्यांवर मात केलेली दिसते. आय १०सुद्धा जोरात आहे. टोयोटा प्रायस, मारुती ग्रॅन्ड व्हिटारा आणि फॉल्क्सवॅगन फेटनला या महिन्यात एकेकेच ग्राहक मिळाला. :) स्पार्कपेक्षा बीट जास्त खपल्या हे विशेष आहे ! मारूतीने एकट्याने एक लाखापेक्षा जास्त कार विकत खपाच्या बाबतीत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. एकंदर जानेवारी महिन्यात भारतात २ लाख २४ हजार नव्या कार्स रस्त्यावर आल्या. तरी यात ट्रक, टेम्पो, रिक्षा, बसेस आणि दुचाकी वाहनांची मोजदाद केलेली नाही. त्या तुलनेत रस्ते किती वाढले हे बघायला पाहिजे. ही आकडेवारी खरी असेल तर भविष्यात भारतीय रस्त्यांवर हाहा:कार माजणार आहे. (अवांतर- Ritz : 6046 पैकी एक ग्राहक मी असून ही आकडेवारी फुगवण्यात हातभार लावला आहे. :( )

In reply to by टारझन

गप्प बैस! जसा काही भारतातून तू बाहेर पाऊल टाकायला नाही म्हणतोय्स. केसाला लावायचं तेलही तू परदेशातून मागवणार आणि म्हणे दुसर्‍यांनी डाव केलाय. भारतातल्या लोकांना परदेशी वस्तू न खरेदी करण्याचा ऑप्शन आहे तो वापरावा.

In reply to by रेवती

गप्प बैस!
हाताची घडी आणि तोंडावर बोट असलेली स्मायली :)
जसा काही भारतातून तू बाहेर पाऊल टाकायला नाही म्हणतोय्स.
टाकलंय का ? टाकल्यावर मीपण " भारतात तर बै खुप्पंच महागाई वाढलीये . " :) असं म्हणनार :)
केसाला लावायचं तेलही तू परदेशातून मागवणार आणि म्हणे दुसर्‍यांनी डाव केलाय.
आम्ही देषी बजाज चे आल्मंड ड्रॉप केश तेल वापरतो :)
भारतातल्या लोकांना परदेशी वस्तू न खरेदी करण्याचा ऑप्शन आहे तो वापरावा.
बापरतो की ... :)

रोडची अवस्था व पेट्रोलचे भाव बघता गाडी घरातल्या घरात चालवायला घेत असावेत. आपल्याकडे खरं तर इलेक्ट्रिक गाड्या चांगल्या.. पण जिथे चार ते आठ तास लोड शेडिंग चालंत तिथे कसलं इलेक्त्रिक अन कस्लं काय!

छान! असेच सुरु रहिले तर जगातला पेट्रोलसाठा पुढच्या ५० ऐवजी ५ वर्षातच संपेल, ..... त्यानंतर मात्र जग प्रदूषण मुक्त होइल!