Skip to main content

प्रतिभावंतांच्या तऱ्हा !

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 17/01/2022 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात. या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणाऱ्या किश्शांची संख्याही भरपूर असते. अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल !

कविता

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 17/01/2022 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
कामधेनूच्या कासेचे दूध म्हणजे कविता डंखानंतर मिळे तो मध म्हणजे कविता कल्पवृक्षाच्या छायेचे छत्र म्हणजे कविता अनाहत गुंजणारा मंत्र म्हणजे कविता किनार्‍याला जोखणारी लाट म्हणजे कविता अज्ञेयाला भिडणारी वाट म्हणजे कविता दहा दिशांनी घेरती अपरात्री पाश तिचे दिवसाच्या धगीमधे पार वितळे कविता

सारे प्रवासी घडीचे

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 16/01/2022 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
या चंद्रमौळीत माझ्या लक्ष सुखे ऱममाण असते कधी सुखाला सांगा कुठे परिमाण जिर्ण शीर्ण झोपडीत माझ्या तिरीप कोवळ्या उन्हाची भासे जणू ही रेघ सोनसाखळी गळ्याची वाकून पाहतो हा चंद्र पौर्णिमेचा ठेवतो नजर हा थवा चांदण्याचा क्षण माझीया सुखाचे चोरावया पहातो उन्मुक्त होऊनी मी चादंण्यात नहातो घुसतो धटिंगण वारा सवे आणतो थेंब पावसाचे उध्वस्त करू पहातो साम्राज्य माझिया सुखाचे कोणी गरीब म्हणूनी हसती मजवर सारे इथे काय आहे म्हणूनी आकलेचे तोडती तारे सारे प्रवासी घडीचे सांगा कोण कुठे काय नेते समाधान हेच असते परिमाण ते सुखाचे या चंद्रमौळीत माझ्या ...... १६-१-२०२२
काव्यरस

ध्रांगध्रा - १३

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 16/01/2022 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
नक्कीच कोणीतरी इथे वावरतय. स्वच्छता ठेवतय. ..... पण मग पूजा..... फुले काहीच कसं नाही. तसं पूजा करायला इथे देवाची मूर्ती ही नाहिय्ये म्हणा. त्या अष्टकोनी गाभार्‍याच्या कानाकोपर्‍यातून माझ्या कॅमेर्‍याची नजर फिरतेय. एका कोपर्‍यात काहितरी हालचाल जाणवतेय. कोणीतरी तिथे उभे आहे.
मागील दुवा ध्रांगध्रा - १२ http://misalpav.com/node/49783 मी कॅमेरा डोळ्यासमोरून बाजुला करतो. त्या बाजूला एक दार दिसतय.पहाणाराला पटकन दिसणार नाही असं भिंतीतल्या नक्षीत चपखलपणे लपवलेलं. त्यामुळेच कदाचित मघाशी दिसलम नाही. ते दार उघडलय.

एका (शैक्षणिक) सहलीची सांगता

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 16/01/2022 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
महाविद्यालयाची अधिकृत सहल गेल्याच महिन्यात झाली. माथेरानला. बरोबर प्राध्यापक, प्राध्यापिका आणि विद्यार्थिनीसुद्धा. धमाल आली. या सहलीच्या गमती जमती वेगळ्या. चमचमीत तर्रीदार मिसळ नेहेमीच खातो, पण कधीतरी घरी आ‌ईने केलेल्या मटकीच्या उसळीत फ़रसाण, कांदा घालुन लिंबू पिळुन ती मिसळ घरच्यांबरोबर खाण्यात एक वेग्ळी मजा असते, तशी. असो. विषयांतर नको, त्या सहलीचा वृतांत पुन्हा कधीतरी. तर सांगायची गोष्ट अशी की सहलीची खुमखुमी सर्वांना आली. नुकतीच सहल हो‌ऊन गेल्यामुळे पुन्हा सहलीला घरचे पाठवणं शक्य नव्हतं. मग काय करणार? ना‌ईलाजानं शैक्षणिक सहल आयोजित करावी लागली. कार्य सिद्धीस नेण्यास सदस्य उत्सुक होतेच.

ध्रांगध्रा - १२

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 14/01/2022 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
" शिवा. शिवा. अरे हे बघ. इकडे बघ. हे काय आहे" महेश उत्सूकतेने ओरडतोय. उत्सूकता की काय समजत नाही. पण ती तीस पावले मी धावत जातो. डोंगराला वळ्या पडाव्या तसं वर आलेलं ते टेकाड गाठतो.महेश मला हात करून दाखवतो. डोळ्यावर विश्वास बसत नाहीये मागील दुवा ध्रांगध्रा - ११ http://misalpav.com/node/49775 डोळ्यावर विश्वास बसत नाही. त्या टेकाडावरून पुढे थोडे खाली एक मंदीर दिसतय. थोड्या वेगळ्या पद्धतीचे मंदीराचा कळस दिसतोय. त्या नंतर लगेचच पायर्‍या.खाली उतरत जाणार्‍या. पायर्‍या समोर सोंड वर केले दोन दगडी हत्ती. अगदी खरेखुरे वाटावेत असे. हत्तींच्या सोंडेत दगडी हार.

सर्व मिपाकरांना, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 14/01/2022 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, कसे आहात? सर्व मिपाकरांना, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा... हिंदू सणांचे, हे एक वैशिष्ट्य आहे की, वर्षभर कितीही भांडलो, वादविवाद झाले, प्रसंगी एकमेकांना टोमणे मारून झाले तरी, दसरा, होळी आणि संक्रांतीच्या दिवशी, एकमेकांना शुभेच्छा देतोच आणि सहज शक्य झाले तर, गाठीभेटी पण घेतोच. मिपामुळे, आपण सगळेच एकत्र आहोत.वाद तर होतच राहणार, त्याला पर्याय नाही. मत भिन्नता असणे, हे नैसर्गिक आहे, पण ते मत, सुयोग्य भाषेत, सार्वजनिक रित्या मांडण्याची मुभा देणे, ही लोकशाही आहे. अशा, खरोखरी लोकशाही तत्वावर, एकमेकांना साथ देत चालणार्या, सर्व मिपाकरांना, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...

(वल्लीदांच्या सहवासात)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 14/01/2022 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाला चांदण्यांच्या सहवासात रमावेसे वाटते तर कुणाला अजून कोणाच्या, आमची एक इच्छा अपूर्ण आहे ती म्हणजे एकदिवस तरी वल्लीदांच्या सहवासात रमण्याची बघू केव्हा पूर्ण होते ती?

मी काय म्हणतो ?

लेखक उन्मेष दिक्षीत यांनी शुक्रवार, 14/01/2022 02:04 या दिवशी प्रकाशित केले.
तर मी असे म्हणतो, कि वाय नोबडी इज ईंटरेस्टेड टु नो ट्रुथ ऑर लिव लाइफ द वे इट इ़ज, द लाइट वे ? लोकांना अस्वस्थता अजिबातच नाही का ? लाईफ फुल्ली एंजॉय करावेसे वाटत नाही का ? सारख्या धक्का देणार्या गोष्टी टाळाव्याश्या वाटत नाहीत का ? मजा म्हणजे काय, निश्चिंत असावे असे वाटत नाही का ? एकमेकाला काल्पनिक बंधनात बांधणेच आपण खरे मानतो आहोत का ? चालू घडामोडी सोडून आपल्या आयुष्यात बदल घडू शकतात हे मान्यच नाही का ? चक्क यु जीं नी सुद्धा (एकदा) म्हटलं आहे, कि यु हॅव मेड हेल आउट ऑफ धिस ब्युटिफुल हेवन !