Skip to main content

एक निवेदन [पोलिओ ड्रोप्स लसीकरण - २७ फेब्रुवारी २०११]

लेखक Pearl
शुक्रवार, 25/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
श्रोतेहो, एक निवेदन: रविवार दिनांक २७ फेब्रुवारी २०११ रोजी सरकारतर्फे देशभरात सर्वत्र पोलिओ लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पाच वर्षाखालील सर्व बालकांना या कार्यक्रमाअंतर्गत मोफत लस देण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. आणि आसपासच्या लोकांना याबाबत माहिती द्यावी / आठवण करावी. निवेदन संपलं :-) [आकाशवाणी स्टाइल ;-)]

खुलासा

शुक्रवार, 25/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपा करांनो, माझ्या आय. डी. वरून बराच गोंधळ होण्याची शक्यता आहे. म्हणून हा खुलासा. माझा आणि "परीकथेतिल राजकुमार" यांचा दुरयान्वहेही काही संबंध नाही. मी हा आय.डी. निव्वळ माझ्या आवडी नुसार निवडलेला आहे. यात "परीकथेतिल राजकुमार" यांना चिडवण्याचा, कुठलीही स्पर्धा करण्याचा अथवा खोडसाळपणा करण्याचा हेतु नाही. गेले १ वर्ष मि मिपा वरिल लिखाण वाचत आहे. मला हे संस्थळ प्रचंड आवडते. म्हणुन मि इथे येउन दाखल झालो. मिपा चा उद्देश आणि एकुणच वाटचाल पाहुन थक्क व्हायला होते. आणि म्हणुनच मला या परीवाराचा सदस्य व्हावेसे वाटले. आय.डी. काय घ्यावा या विचारात असतांना "परीकथेतिल राजकुमार" हा आय.डी.

अंतर

शुक्रवार, 25/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या माझ्यातील अंतर........ तसे बर्हीगोल भिंगाच्या आरशातील प्रतिबिंबासारखे..... कितीही दुरावले....... तरी...... जवळ भासणारे.......... ................. अंतरे वाईट नसतातच............... अंतरांची कारणे मात्र वाईट असू शकतात.......... .............. भरभरून कोसळ्णारा पाऊस........ एक न टाळता आलेली रणरणती दुपार.................... जीवाला घोर लावणारी कातरवेळ..................... ह्रदयाच्या अंतापर्यंत पोहचणारी उत्तररात्र..................... अन्..........

महत्वाची सूचना - आर्थिक व्यवहार आणि मिसळपाव.

लेखक नीलकांत
शुक्रवार, 25/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपाव.कॉम हे संकेतस्थळ कुठल्याही प्रकारे कुणालाही वैयक्तीक निरोपाद्वारे मिसळपाववर किंवा अन्य कुठल्याही संकेतस्थळावर पैशाची किंवा अन्य मदतीची मागणी करत नाही. मिसळपाव.कॉम हे संकेतस्थळ केवळ मराठीसाठी योगदान करण्याच्या इच्छेतून चालवले जाते. यातून मिळणारा आनंद हाच एकमेव परतावा आम्ही मानतो. या व्यतिरीक्त अन्य कुठल्याही प्रकारचे व्यवहार मिसळपाव.कॉम करीत नाही. लोकांनी मिसळपाववर यावे आणि मराठीतून व्यक्त व्हावे. शक्य होईल तसे मराठीत लिहावे हीच केवळ अपेक्षा आहे. मिसळपाव.कॉम तर्फे होणारी घोषणा ही मिसळपाव.कॉम वर जाहीर होत असते.

पेपर टाकण्याचे पैसे......

लेखक मनराव
शुक्रवार, 25/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी पेपर बरोबर एक पॅमप्लेट आलं........... मथळा होता..... "पुणे व्रुत्तपत्र वितरक संघ" त्यात लिहिलेला काहि मजकूर असा....... "गेल्या १० वर्षात महाघाई वाढली आहे......दुधाचे भाव वाढले, पेट्रोल वाढले....... पण पेपर चे भाव स्थिर राहिले आहेत. त्या मुळे वितरकांना मिळणार्‍या कमिशन मधे काहिच वाढ झालेली नाही...... सध्या बरिच व्रुत्तपत्र नविन नविन स्किमस देत अहेत....... (उदा. ११ रुपयात चार महिने पेपर, २५० रुपयात २ वर्ष पेपर......). तर त्याचा त्यांना मिळणारा फायदा कमी आहे..........

इनो संपल्या नन्तर .....

लेखक विजुभाऊ
शुक्रवार, 25/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
हे काय नशीबी आले...हे भाग्य हे असले कसले बघ निघुन गेले सारे साथी...माझे मनोगतही फ़सले मी डोळे उघडुन बघतो..तेंव्हा माझे मला कळते घ्यायला घास मोठा गेलो ...तेंव्हा दंताडच हरवुनी बसले बहर माझा लिहिता लिहिता केंव्हाच सुकोनी गेला फ़ुका कौतुक होत होते...तेही आता अंतरले उरल्या कथा ;जेवण यादी .प्रतिसाद नाही मिपावरती विखार माझा फ़ुसका ठरला...अन विचार वैभव हरले आता शिव्या उरल्या ओठी...... पोटी परी जळजळणे ईनो घेउन.जिवंत रहाणे हेच नशिबी केवळ उरले उपक्रम एकटाच राबवीत बसलो ऐसा मीच मला म्हणूवूनी थोर..

मिपाची हालहवाल..

शुक्रवार, 25/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
चाललंय काय चाललंय काय.. मिपावर सध्या चाललंय काय.. बिका शेख, रंगा शेठ रजेवर आहेत VRS ची चाचपणी करत आहेत.. कमी हजेरीबद्दल प्राजुतैला शिक्षा होणार आहे तिला आता कोदाच्या सायटीवर संपादक करणार आहेत.. कोदा आमचा ज्ञानेश्वर आहे शुचि मुक्ताईची जागा घेतच आहे... गवि आणि हर्षद पाठीशी आहेत निवृत्ती सोपान शोभत आहेत.. अदिती आजकाल विस्थापितांवर लिहिते विस्थापिताचे दु:ख विस्थापितांनाच जाणवते.. मकी आजकाल गायब असते फक्त व्यनीत रममाण असते.. टार्‍या पुन्हा अन-आवरेबल झाला आहे आता कुठे मिपाला रंग चढायला लागला आहे.. अवलियाचा आयडी हॅक झालाय दूषित वातावरण निरोगी करायला लागलाय... डान्राव म्हणे प्रतिमा सुधारणार आहेत
काव्यरस

ओरिजिनल म्हणी

लेखक Pearl
शुक्रवार, 25/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
कालच मला १ इंटरेस्टिंग गोष्ट कळाली. (इंटरेस्टिंग ला तंतोतंत समानार्थी शब्द सुचवा. मला तरी आत्ता सुचत नाहिये :-/) आपण वर्षानुवर्षे वापरत असलेल्या २ म्हणींचे खरे रूप कळाले. त्या २ म्हणी आहेत, १) पुराणातली वांगी पुराणात २) अठरा विश्वे दारिद्र्य (लहानपणी ह्या म्हणींचा अर्थ मला खरेच कधी लागला नव्हता. नंतर मी तो लावून घेतला ;-)) पण या म्हणी अपभ्रंश झालेल्या म्हणी असून ओरिजिनल म्हणी अशा आहेत १) पुराणातली वानगी पुराणात (वानगी = दाखला, उदाहरण) २) अठरा विसे दारिद्र्य (याचा अर्थ असा आहे की १८ * २० = ३६०.

आजकाल मुलाचा मुक्काम फेसबुकवर असतो ..!!

शुक्रवार, 25/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
घर छोटे झालेय गाव छोटे झालेय शहर .... देश.... हे जग ...!! सगळे वितभर खोक्यात सामावून गेलेय अगदी खूप वर्षापूर्वीची जाहिरात खूप खरी झालीय आता हे घर ....!