Skip to main content

पेपर टाकण्याचे पैसे......

लेखक मनराव यांनी शुक्रवार, 25/02/2011 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी पेपर बरोबर एक पॅमप्लेट आलं........... मथळा होता..... "पुणे व्रुत्तपत्र वितरक संघ" त्यात लिहिलेला काहि मजकूर असा....... "गेल्या १० वर्षात महाघाई वाढली आहे......दुधाचे भाव वाढले, पेट्रोल वाढले....... पण पेपर चे भाव स्थिर राहिले आहेत. त्या मुळे वितरकांना मिळणार्‍या कमिशन मधे काहिच वाढ झालेली नाही...... सध्या बरिच व्रुत्तपत्र नविन नविन स्किमस देत अहेत....... (उदा. ११ रुपयात चार महिने पेपर, २५० रुपयात २ वर्ष पेपर......). तर त्याचा त्यांना मिळणारा फायदा कमी आहे.......... म्हणून १ जानेवारी पासुन त्यांनी "टाकनावळ" (पेपर टाकायचे पैसे, चांगला गोंडस शब्द शोधला आहे) घरटी १० ऐवजी अता २० रुपये केली आहे.........." खरच त्यांना कमिशन इतक कमि मिळत का कि त्यांनी पेपर टाकण्याचे पैसे असे जाहिर करुन वाढवून घ्यावे लागत आहेत.......... ??? जर तस असेल.......तर मग १० वर्ष हि मंडळी झोपली होती का ? जाणकारांनी प्रकाश टाकावा...

वाचने 4063
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

पेपर चे भाव स्थिर राहिले आहेत. त्या मुळे वितरकांना मिळणार्‍या कमिशन मधे काहिच वाढ झालेली नाही
ह्याविषयी शंका आहे.व्रूत्तपत्रे हा प्रचंड उलाढाल असलेला धंदा आहे.पेपर टाकणारे फक्त पेपरच विकत नाहीत तर ग्लॅडरॅग्स्,फिल्लम फेयर सारख्या मासिकांतूनही त्यांना कमिशन मिळत असावे. दांगट एजन्सी काय म्हणते?

In reply to by चिरोटा

>>व्रूत्तपत्रे हा प्रचंड उलाढाल असलेला धंदा आहे हेच माझं पण मत आहे......... घरटी २० रुपये महिना..... एका सॉसायटी मधे १०० फ्लॅट्स... म्ह्णजे पेपर नुस्त टा़कण्याचे पैसे मिळणार........ २००० :o मला नाहि वाटत..........एक पेपर वाला.........फक्त १०० घरातच पेपर टाकत असेल..........

आमच्याकडेपण हे पत्रक आले होते.
पण पेपर चे भाव स्थिर राहिले आहेत. त्या मुळे वितरकांना मिळणार्‍या कमिशन मधे काहिच वाढ झालेली नाही......
हे तितकेसे पटत नाही. १० वर्षांपूर्वी सकाळ, लोकसत्ता सारख्या पेपरची किंमत १.५० ते २ रू. होती. आता ती दुप्पट झालीय. कमिशन मध्ये पण वाढ झालीय. एक पेपर एजन्सीवाला आमच्या ओळखीचा आहे त्याच्याकडूनच माहिती मिळाली. शिवाय स्कीम्स असल्यातरी पेपरवाल्यांचे कमिशन फिक्स असते. नुकसान सहन करावे लागते ते वृत्तपत्रांना जे ते जाहिरातींद्वारे भरून काढतात. मध्यंतरी लोकमतने १ रू. किंमत ठेउन विक्रेत्यांचे कमिशन कमी केले होते तेव्हा ह्याच सर्व वृत्तपत्र विकेत्यांनी लोकमतवर बहिष्कार घातला होता व लोकमतला मग स्वतंत्र व्यवस्था करावी लागली होती. कालांतराने यात वाढीव कमिशनरूपी तडजोड झालीच. विक्रेत्यांना जाहिरात पत्रकांद्वारेही उत्पन्न मिळतच असते. आमचा विक्रेता आम्च्याकडून फक्त ३ रू. टाकणावळ घेतो. आता फारतर ५/६ रू. घेईल. शेवटी त्यांनाही ग्राहक टिकवायचे आहेतच.

४०% कमिशन असते ह्या व्यवसायात असे वाचल्याचे आठवते. शिवाय सध्या पॅम्प्लेट वालेही पैसे देतातच.

मी स्वतः जवळ जवळ १५/१६ वर्षं (तीर्थरुपांच्या दुराग्रहामुळे) पेपर टाकत होतो. त्यामुळे मला व्यवस्थित माहिती आहे. ज्यांच्याकडे एजन्सी असेल त्यांना थोडा तरी फायदा होत असावा, पण जे फक्त पेपर 'टाकत' असतात त्यांना फारच मामुली उत्पन्न मिळते. मी लहान असतानाच दीड / दोन रुपयांच्या पेपरमागे फक्त २५ पैसे सुटत असत, त्यावरून इतक्या क्षुल्लक कमाईसाठी एवढे कष्ट उपसण्याची गरज काय म्हणून वडिलांशी भांडणं पण केलेली आठवताहेत. पण अत्यंत लघुदृष्टीचे पिताश्री शिक्षणाला पैसे देणार नाही म्हणत (आणि कधी कधी खरंच वह्या/पुस्तकांसाठी पैसे पण देत नसत) म्हणून केवळ ही हमाली करत होतो. अवांतराबद्दल क्षमस्व, पण हे खरय की अत्यंत अल्प कमाईवर हा धंदा करावा लागतो, पहाटे पहाटे उठून थंडी पावसातून पेपर न भिजवता धावावं लागतं प्रतिसाद काढून टाकू नये, भलत्या सलत्या गोष्टींची भीड बाळगून सत्य झाकायची गरज नाही.

In reply to by sagarparadkar

१०० % सहमत आहे! १० - २०रुपये प्रत्येक घरामागे वाढल्याने वैयक्तिक फारसा खर्च वगैरे होणार नाहिये! पण त्यामुळे ह्या पेपर टाकणार्या मुलांच्या उत्पन्नात थोडी देखील वाढ झाली, तरी मिळवले!

In reply to by स्वैर परी

ह्या पेपर टाकणार्या मुलांच्या उत्पन्नात थोडी देखील वाढ झाली, तरी मिळवले! पण ही वाढ त्यांच्यापर्यंत पोहोचावी...हिच सदिच्छा

In reply to by निवेदिता-ताई

अनुमोदन.... नहितर एकि कडे पैसे ज्यादा मागून दुसरी कडे पेपर टाकणार्या मुलांचा आहे तोच पगार रहायचा

In reply to by नितिन थत्ते

विकास , क्लिंटण आणि कोदा ह्यांच्याशी सहमत , पुढील प्रतिसाद वाचण्यास उत्सुक !! - भक्षलवादी

पण जे फक्त पेपर 'टाकत' असतात त्यांना फारच मामुली उत्पन्न मिळते.
अवांतराबद्दल क्षमस्व, पण हे खरय की अत्यंत अल्प कमाईवर हा धंदा करावा लागतो, पहाटे पहाटे उठून थंडी पावसातून पेपर न भिजवता धावावं लागतं
पूर्णपणे सहमत.

सागर पराडकर तुमचे म्हणणे अत्यंत रास्त आहे. पेपरएजन्सी मध्ये पेपर टाकण्याचे काम करणार्‍या मुलाना कमीशन मिळत नाही. कष्टाचे काम आहे. वर्तमानपत्राचे उत्पादनमूल्य ( परोडक्षन कॉस्ट ) ही जवळ जवळ १८ ते वीस रुपये असते. झैरातीमुळे तो खर्च + फायदा निघतो. काही वेळा बतमी छापण्याचे पैसे मिळतात काही एवर्तमानपत्राना बातमी न छापण्याचे पैसे मिळतात पण पेपर एजन्सीला मात्र पेपरटाकण्याचेच पैसे मिळतात. हा व्यवसाय तितका ल्युक्रेटीव्ह आहे असे वाटत नाही.

१०० घरांच्या सोसायटीतले सगळे पेपर घेतात का? एकाच माणसाकडून पेपर घेतात का ? सिनेमॅक्सचे तिकीट रात्रीतुन १०० चे २५० झाले तरी विनातक्रार जाताच ना ? पाच रुपयात मिळणारा वडापाव वेगळ्यारुपात आला की ३०-४० रु आनंदाने मोजताच ना? मग पेपरवाल्यांनी १० च्या ऐवजी २० रुपये मागितले तर का जीवावर येते? नसेल परवडत तर बंद करा आणि पायी जाऊन घेऊन या ! सिंपल !!

In reply to by कुंदन

सध्या अनपेक्षित युतींचे प्रयोग करण्याचे दिवस असल्याने वरच्या सर्वांशी सहमत.

In reply to by रमताराम

मंगळ, राहु, केतुं आणि शनीची युती झाल्यावर आम्ही गपगुमान +१ जोडतो. (earth-ly)

In reply to by Nile

आणि तसेही वाचायला घेतलेल्या पेपरची नंतर रद्दी टाकुन तुम्ही पण नफा कमावताच की !

आशा कितेक सोसायटी आहेत ना? वाढ्वलेले रुपये पेपर टाकणारयाला मिळत नाहित हे खरे वट्ते व त्याचेच वाइट वाटते. पेपरवाल्याना काहितरि कारणच लगते. विनित