Skip to main content

किसने बचाया मेरी आत्मा को - आलोक धन्वा

लेखक शुचि यांनी रविवार, 13/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
या जगात नानाविध भव्यदिव्य अनुभव आहेत. कर्तुत्व गाजविण्याच्या संधी आहेत. महत्त्वाकांक्षा, वक्तृत्व, प्रसिद्धी, श्रीमंती, वैराग्य आदि डोळ्यांचे पारणे फेडणारे गुण आहेत. अनेक प्रकारची व्यक्तीमत्वे या ना त्या कारणाने सतत आपल्या सहवासात येत असतात. यातील अनेक जण ज्ञानाने, धनाने, सामर्थ्याने आपल्यापेक्षा थोर असतात. आपल्याला असूया, दबदबादेखील वाटू शकतो. पण थोडा अंतर्मुख होऊन विचार केला तर आपल्या लक्षात येते की - आपल्या जीवनात वरील भव्य गोष्टी या अळवावरच्या पाण्यासारख्या येतात आणि जातात.

[थू थू गीत]

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 13/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा- थू थू अजि थुकला, थनी टोचला थुंके थुथु ताजा | तो थुथुराजा आता थुंकला, थनी टोचला थुंकुची थाथूर होते थाप, जे थुंक थांबले| परि वचन थुथुने त्याशी थुंकवंत ठेले|| थुंकत थाथूर शब्द त्या पुन्हा थुंकण्याते| थुथवुनी सकल माझी थुथुशक्ती फस्त होते आता थुंकला, थनी टोचला
काव्यरस

डु-आयडी थेरपी

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 13/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
नियतीने कोरले जे असे चेहऱ्यावरती तसे ते ठसे नित्य मुखवटे तेच खुपावे बंध किती हे सहन करावे? नाव जसे मिळविले कर्माने निष्कलंक नी अबाध्य जपणे जपती सगळे प्राणपणाने झुकतो आत्मा ह्या ताणाने मुक्त श्वास घेण्या तापातून उपाय असती फ़ार पुरातन नाट्य, तमाशा, किंवा लेखन प्रदान करीती अलगच दर्शन कोणी जाती हास्यगृहांतरी टिंगू अथवा लंबू दिसे जरी हसूनी स्वत:ला खरे पोटभरी मुखवट्याची बोच नष्ट करी जाल जादुई बघा उभरले चेहरा पुस्तक तेथ उमटले ब्लॉग विविध आयडींने केले समाज दर्पण जणू उभरले महाजाल बघ विणले घट्ट का करिशी स्वत्वाचा हट्ट? धरी आयडी नाना कळा घेई श्वास बेबंद मोकळा संस्थळींचे जादुई दर्पण तणाव-नाशक मुक्त

अस्साच आहे तो!

लेखक निनाव यांनी रविवार, 13/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
तो नं? - अस्साच आहे पडतो धडतो पण नाही रडत तो उभा राहातो तो पुन्हा उठून भरारी घेतो पुन्हा दम भरुन धरा करते धरशायी त्यास कधी घेतात उंच लाटा त्यास पाशात अग्निबाणच घेतात कधी परिक्षा त्याची पण तो नाही होत अनुत्साहीत खरं तर होते त्याचे मग 'फिनिक्स' अन आगितून जन्मते नव-जीवन तेवढ्याच उस्ताहानं नव्या जोमानं सर्व उभे करण्याच्या जिद्दीनं अस्साच आहे तो...जिद्दी!!

उकडपिंडी :-

लेखक निवेदिता-ताई यांनी रविवार, 13/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य:- तांदूळ पिठी एक वाटी, हि.मिरच्या दोन-तीन, मिठ-साखर चवीनुसार,कढीपत्ता पाने सात-आठ,कोथींबीर,आंबट ताक अर्धी वाटी, पाणी दीड वाटी, फ़ोडणीचे साहित्य- मोहरी जिरे- हिंग , तेल एक डाव. कॄती :- तांदूळ पिठी ताक व पाणी घालून कालवुन घ्यावी, त्यातच मिठ-साखर चवीनुसार घालावे, तेलाची खमंग फ़ोडणी करुन त्यात कढीपत्ता पाने,मिरच्या तुकडे टाकावेत व त्यात कालवलेली तांदूळ पिठी घालावी व चांगले ढ्वळावे, गुठळी होउ देवु नये, चांगल्या दोन - तिन वाफ़ा आणाव्यात, ही उकडपिंडी तय्यार. गरम गरम खाण्यास द्यावी. हा झटपट होणारा पदार्थ आहे. व पौष्टीकही आहे.