Skip to main content

एक त्रागा सुनेचा

लेखक विदेश यांनी मंगळवार, 05/04/2011 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल : एक धागा सुखाचा -) एक त्रागा सुनेचा , शंभर त्रागे सासूचे - घरोघरी हे चित्र माणसा , तुझिया संसाराचे ! तू असशी जरी कर्ता तगडा , सासू सुनेचा बघशी झगडा - सुटकेसाठी करशी नाटक - तूच आजारांचे ! उचलबांगडी बालपणाची , धुळीत स्वप्ने तारुण्याची - जीर्ण माय मग उरे शेवटी - अजीर्ण अर्धांगीचे ! सासू सुनातें बघतो कोणी , एक सारखी बसती फुगोनी - कुणा न दिसले , भांडणात त्या - हाल बिचाऱ्याचे !
काव्यरस

प्लान! ... एक गूढकथा ...

लेखक विनीत संखे यांनी मंगळवार, 05/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
"थेरडे! थेरडे सोड तिला. अगं दम काढशील तिचा. मरेल ती. सोड! सोड म्हणतेय ना मी.", हवालदारीण मंजुळाला पकडून खेचत होती. पण आज मंजुळा दोन पोलिसांना ऎकत नव्हती, एवढी तिच्या हाती ताकद आली होती. सवित्रीला जाऊ द्यायचेच नाही असे तिने ठरवलेले. आज शनिवारची नामी संधी मिळाली होती तिला. कपड्यावरचे डाग नीट धुतले गेले नाहीत म्हणून सकाळी सावित्री आली अन तिने मंजुळाशी वाद घातला. मंजुळानेच साऱ्याजणींचे कपडे धुतले होते. सावित्रिचे मात्र मळलेले होते. मग काय दोन रान मांजरी भिडल्या. आपल्या बापाचं ज्यांनी कधी ऎकलं नाही त्या एकमेकींचं काय ऎकून घेतील? झालं मग द्वंद्व.

सावधान! 'व्हर्चुअल फ्रेंड ' ची 'रियालिटी ' भोवली.

लेखक विनायक बेलापुरे यांनी मंगळवार, 05/04/2011 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
चाळीशीच्या इसमाकडून २० वर्षीय तरुणीचा विनयभंग इंटरनेटवर चैटिंग करत घट्ट मैत्रीत अडकलेल्या २० वर्षीय तरुणीला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. व्हर्चुअल फ्रेंडशी तरुण तरुणींनी किती मैत्री वाढवावी याबाबत सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मेडिकलच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी ४१ वर्षीय व्यक्तीला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी कोथरूड येथील तरुणीने डेक्कन पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सलील भालचंद्र नानल (वय ४१ वर्षे रा.

त्या 'यो'

लेखक सुधीर मुतालीक यांनी मंगळवार, 05/04/2011 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
काल पुण्यात एका अजस्त्र कंपनीने त्यांच्या निवडक वीस इंजिनियर्स साठी एका क्लिष्ट टेक्निकल विषयासाठी एक ट्रेनिंग प्रोग्राम ठेवला होता. ट्रेनिंग द्यायला मला बोलावले होते. मला दोन तासांचा वेळ दिला होता. दुपारी अडीच वाजता ट्रेनिंग सुरु होणार होते. बसायची जागा मर्यादित असलेने आधी यादी काढुन, येणा-यांची गरज, पात्रता, त्यातून कंपनीला होणारा फायदा याचा विचार करून, ती यादी मला आधी कळवुन वगैरे म्हणजे बरीच तयारी करून इंजिनियर्स ना बोलावले होते. मलाही त्यामुळे खूप तयार असणे गरजेचे होते. आधी पाऊण तास माझ्या दोन सहका-यां बरोबर ट्रेनिंग रूम मध्ये पोहोचलो.

(यांना विसरुन कसे चालेल ? )

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 05/04/2011 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा आख्खा देश विश्वचषक जिंकल्याचा आनंद साजरा करत होते तेव्हा भारताच्या विजयाच्या शिल्पकाराला आपण विसरत होतो असे मला वाटते. मिपा वर एवढे धागे येउन गेले पण एकानेही विजयाचे योग्य ते श्रेय या इसमाला दिले नाही याचा खेद वाटतो म्हणुन हा धागाप्रपंच. खरे म्हणजे या व्यक्तीशिवाय आपण विश्वचषक जिंकु शकत नाही हे सुरुवातीपासुनच सर्वांना माहिती होते. त्या अनुषंगाने मला सुरुवातीला काही ढकलपत्रे आणि काही भ्रमणध्वनी संदेश देखील आले. पण म्हणतात ना गरज सरो वैद्य मरो (अर्थात कोणाला वाटले म्हणुन हा वैद्य मरेल असे नाही). त्या अनुषंगाने लोक या इसमाला विसरले. कोण आहे हा?

उन्मन क्षण

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 05/04/2011 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
मुलाचा तमीळ सहकारी रुपेश आणि इतर मित्रही घरी आले होता गप्पा मारायला, क्रिकेट वर्ल्ड कपचा जल्लोष संपला तरी चर्चा चालूच होत्या. For a change, मी सीएनएन लावलं. Anderson Cooper चं AC 360 चालू होतं, जपान मधल्या हाहा:काराचं वर्णन संपून सुरु झालं ते मध्य-पूर्वेत आणि इतरत्र पसरतच चाललेल्या अशांततेचं सविस्तर कव्हरेज. ट्युनिशिया आणि इजिप्त पासून सुरु झालेली जन-क्रांतीची लाट पसरत चालली आहे.... सिरीया, बहारीन, जॉर्डन तसंच लिबिया आणि येमेन - वडवानलासारखा जनेच्छेचा रेटा प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देतोय, कुठे तरी एखादा ओळखीचा नेता, पण बराचसा निर्नायकीच संग्राम.

अंजन कांचन करवंदीच्या देशा

लेखक योगेश२४ यांनी मंगळवार, 05/04/2011 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
मंगल देशा , पवित्रा देशा , महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा राकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा नाजुक देशा , कोमल देशा , फुलांच्याहि देशा अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा महाराष्ट्र गीतात ज्या अंजन कांचन आणि करवंदीचा उल्लेख केला आहे त्या फुलांचे छायाचित्र किती जणांनी पाहिलेत. ? :-) ज्या फुलांच्या सौंदर्याची भुरळ कवीलाही पडली आणि त्यांनी महाराष्ट्र गीतात स्थान दिले त्याच अंजन, कांचन आणि करवंदीच्या फुलांचे प्रचि आज आपण पाहूया.

झाशीच्या राणीवरील अन्याय

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 05/04/2011 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
झी टिव्ही वरील झांसी की रानी ही मालिका मी बर्‍यापैकी नियमितपणे पहातो. पुण्यात राहून शाळेच्या पुस्तकात किवा इतर माध्यमातून झाशीच्या राणीच्या कर्तृत्वाचा यथार्थ परिचय कधिच झाला नव्हता. शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात दोन-चार ओळीत तिला गुंडाळण्यात आले होते. टिव्ही वर चालू असलेली मालिका इतिहासाचे reconstruction आहे, हे मला मान्य आहे. त्यामुळे काही ठिकाणी (प्रसंगात) विशेषत: संवादामध्ये ही मालिका दर्जा घसरून हिंदी सिनेमा प्रमाणे संवंग बनते. त्यामुळे तपशीलाचा अपवाद केला तर मालिकेत चित्रीत केलेल्या घटना या अस्सल असाव्यात ( म्हणजे कपोलकल्पित नसावेत).