Skip to main content

व्हॅलेंटाईन दिनी

लेखक श्रीगणेशा यांनी सोमवार, 14/02/2022 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
कोणे एके काळी व्हॅलेंटाईन दिनी मोठ्या उत्सुकतेने मी आणली होती साडी होती जरी साधी ती खुश मात्र झाली प्रयत्न केला खूप तिने पण नीट नेसता नाही आली गोंधळली क्षणभर हसली ती म्हणे हे ध्यान माझ्या भाळी पण गोड आठवण प्रेमाची तिने अजूनही जपून ठेवली आता एवढ्या वर्षांनी सुचतील कशा प्रेम ओळी पण मला पाहायची असते तिच्या गालावरील सुंदर खळी त्यासाठी कविता विनोदी ऐकून म्हणे अजून नाही जमली मला वाटलं कविता तिला म्हणायचं होतं साडी (सौं साठी!)

ब्रेकअप

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी सोमवार, 14/02/2022 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रेकअप ---------------------------------------------------------------------------------------------------- वॅलेंटाईन डेला समर्पित ... -------------------------------------------------------------------------------------------------- तरुण मुलीची आई म्हणजे जिवाला घोरच की ! अगदी नॉर्मल परिस्थितीत सुद्धा . म्हणजे मग इतर परिस्थितीत तर विचारच करायला नको. मीही त्याला अपवाद नव्हतेच. पोरीचं ब्रेकअप झालंय अशी शंका मला होती... -/-/-/ निशा कॉलेजमध्ये होती. त्यात तिचं कॉलेज नावाजलेलं . अन सांस्कृतिक कार्यक्रमांच्या बाबतीत पुढारलेलं . कॉलेजचे दिवस म्हणजे सोनेरी दिवस ! ते ती पुरेपूर एन्जॉय करत होती.

ताज्या घडामोडी- फेब्रुवारी २०२२ - भाग ३

लेखक मदनबाण यांनी शुक्रवार, 11/02/2022 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या हिजाब वरुन मुद्दामुन बवाल केला जात आहे, यात राजकारण आहे हे देखील उघड आहे. याच विषयावर शबनम शेख हीने तिचे विचार मांडले आहेत. मालेगाव आणि कुत्ता गोळी यांचा घनिष्ठ संबंध का आहे?गंभीर गुन्हे करताना आरोपी कुत्ता गोळीच्या नशेत होते असे पोलिसांना आठळुन आलेले आहे. दोन धर्मात तेढ निर्माण करण्यासाठी सुनियोजित दंगल घडवुन आणण्याचे प्रयत्न होत आहेत का ?

आक्रीत

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 11/02/2022 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
सापशिडीच्या डावात माझ्या घडते आक्रीत शिड्या गिळतात साप आणि टाकतात कात बुद्धिबळाच्या डावात माझ्या घडते आक्रीत राजा पांढरा, तयाची काळ्या रंगावर प्रीत घडे आक्रीत तसेच माझ्या जगण्यात रोज वास्तवाच्या कोलाहली कानी अद्भुताची गाज
काव्यरस

अंतरंग - भगवद्गीता - भाग २

लेखक शीतलउवाच यांनी गुरुवार, 10/02/2022 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
प्रश्न…. समस्या…… अर्जुन ……काल … आजही! अश्मयुगापासून आजपर्यंत आपल्या अचाट बुद्धीमत्तेच्या जोरावर माणसाने खुप प्रगती केली. भौतिक सोयी सुविधांची अनेक साधने निर्माण केली. अनेक अडचणींवर मात केली. पण काही प्रश्न आजही अनुत्तरीतच राहीले. इतक्या सा-या सुविधांमध्ये मानव खरंच समाधानी आहे का? जर असेल तर अजुनही सतत नवनवीन सुखसाधनांचा शोध घेतला जातो, तो कशासाठी? प्रत्येक व्यक्तीचं सुख निराळ्या गोष्टीत आहे, तर मग सुखी असणं म्हणजे नक्की काय आहे? केवळ हवं ते मिळणं म्हणजेही सुख नाही, कारण हवं त्याची यादी कधी संपतच नाही. सतत काही ना काही हवं असतंच.

गुजरात सहल २०२१_भाग ७-अडलज वाव व अहमदाबाद

लेखक गोरगावलेकर यांनी गुरुवार, 10/02/2022 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग येथे वाचा गुजरात सहल २०२१_भाग ६-जुनागड सहलीचा नववा दिवस. अहमदाबादला रात्री उशिरा पोहचून झोपेपर्यंत खूप उशीर झाला होता तरीही नाश्ता आटोपून नऊ वाजता सर्वजण अडालज वावला जाण्यासाठी गाडीत येऊन बसले होते. हॉटेलपासून अंतर अर्ध्या पाऊण तासाचेच (२०किमी) होते . दहाच्या आतच अडालजला पोहचलो. अडालज गावातील ही पायऱ्यांची विहीर अडालज वाव किंवा रुडाबाईनी वाव नावाने ओळखली जाते. राणा वीर सिंग याने या विहिरीचे काम सुरु केले होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी राणी रुडाबाईने ही विहीर सन १४९८-९९ सालात बांधली होती.

शर्यत

लेखक नीळा यांनी बुधवार, 09/02/2022 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
शर्यत अजून संपली नाही मी अजून जींकलो नाही घाम गाळत रक्त ओकत धावताना अजुन संपलो नाही हिरव्या दरीच्या धुक्या कडेशी नीळ्या तळ्याच्या काठाशी कधी अजुन दंगलो नाही स्वप्ने तुटताना कचाकड्याची ऊलटताना रात्री बीनस्वप्नांच्या आतुन अजुन भंगलो नाही त्या सुरांच्या स्तब्ध मैफली ईद्रंधनुच्या शब्द चौकटी मी अजुन रंगलोच नाही

फोन

लेखक पाटिल यांनी मंगळवार, 08/02/2022 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
"आरे पत्त्या कुठाय तुजा‌.! किती फोन केलं मी.! सगळं बंदच असतंय गा कायम?" हॅलोs ? कोण ? "बास का आता? आता आवाज पन इसरला का आमचा?" नाय रे.. आवाज नाय ओळखला मी. "आरे पवन बोलतोय पवन.!" पवन ?.. पवन ताटे का? मला आवाजाची काय ओळख लागली नाय रे आजून. "पवन जाधव बोलतो. पळशीवरनं." आरे हां हां.. हां.. बोल बोल.. कसा काय फोन केला..? "काय नाय.. बगावं म्हणलं काय चाललंय..! तुजा काय फोन नाय काय नाय..कुठं हाईस कुटं तू ? " हाय की.. हितंचाय.. चाललंय निवांत. "आरं पन आसं कुटं आस्तंय गा ? एवडं करूनी लगा.. एवडं कुटं तोडत आस्तेत गा?

अंतरंग - भगवद्गीता - भाग १

लेखक शीतलउवाच यांनी मंगळवार, 08/02/2022 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, भगवद्गीता हा नेहेमीच सगळ्यांच्या कुतुहलाचा विषय राहीला आहे. निरनिराळ्या संदर्भात लहानपणापासून या पुस्तकाबद्दल आपण ऐकत असतो. काही जणांना लहानपणी यातील एखादा अध्याय (ब-याचदा जबरदस्तीने!) पाठही करायला लागला असेल. पण ते कुतुहल, कुतुहल याच पातळीवर राहते त्यात फारशी प्रगती होउन आपण स्वतःहून या पुस्तकाच्या वाटेला क्वचितच जातो. पुढे कुठेतरी ट्रेनिंग्ज, सिरियल्स, मॅनेजमेंट प्रेझेंटेशन्स, ऑनलाईन कंटेट वगैरे च्या माध्यमातून गीता आपल्यासमोर येत राहते आणि आपले हे कुतुहल जागवत राहते. माणसाला पडणा-या अनेक सामान्य असामान्य प्रश्नांची उकल करणारे पुस्तक म्हणून गीता आपल्याला माहीत असते.