चांदण्यांस मिठी मारतांना
चांदण्यांस मिठी मारतांना
चंद्रास गोड का वाटत असेल?
त्यास आलिंगनात भरतांना
रात्रीस मोह का आवरत असेल?
दिवस उजाडुच नये कधी
वाटत तिला ही असेल
मोहक चंद्रा च्या पाशातुन सुटतांना
जीव तारकांचा का आवळत असेल?
चंद्रा च्या कुशी खालून
अलगद पदर खेचून पहाटे
आंथरुणातून उतरत रात्र जेंव्हा असेल
सुटलेल्या केसांमधुनी
लाज आवरत पदरा खालील
मन तिचे का बांवरत नसेल?
मधु-चंद्र काय असावे
चंद्रास का ते कळत असेल?
रोजच असते रात्र त्याचीच
मोह मिलना चे का उमगत असेल?
चांदण्यांस मिठी मारतांना
चंद्रास गोड का वाटत असेल?
चंद्रास आलिंगनात भरतांना
रात्रीस मोह का आवरत असेल?
काव्यरस
मिसळपाव