Skip to main content

.... प्रेम कर!!

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 14/04/2011 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या हरेक क्षणांवर .. प्रेम कर अस्तित्वाच्या घनघोर रणावर .. प्रेम कर नात्यांमध्ये गुरफ़टणार्‍या ओलाव्याने मोहरणार्‍या मनाच्या या उधाणपणावर.. प्रेम कर कळ्या उमलती तू हसतना स्पर्श छेडती कोमल ताना देहाच्या प्रत्येक सणावर.. प्रेम कर नको विचारू गतकालाला करेन वश मी त्या दैवाला माझ्यामधल्या याच गुणावर.. प्रेम कर घाव झेलले जगण्यासाठी राखेमधुनी उठण्यासाठी हृदयावरच्या त्याच व्रणावर.. प्रेम कर नुरतील तेथे काही व्यथा एक आगळी शांत अवस्था मुक्ती देणार्‍या सरणावर.. प्रेम कर अंत नसतो सृजनाला त्या विलयाच्याही बस्स रेघोट्या सृष्टीच्या या कणाकणावर .. प्रेम कर - प्राजु

जन्मदिनी डॉ. आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन

लेखक तर्री यांनी गुरुवार, 14/04/2011 07:09 या दिवशी प्रकाशित केले.
१४ एप्रिल . भारतरत्न डॉ. बाबासाहेब आम्बेडकरांच्या जन्मदिना निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन . हिन्दु धर्मामधील जाती व्यवस्थेविरुध्द विद्रोह करणार्‍या तसेच भारतीय घटनेच्या शिल्पकारास कोटी कोटी प्रणाम .मराठी वर आत्यंतिक प्रेम करणार्‍या ह्या महामानवाच्या महाराष्ट्राची मात्र सर्व बाजुनी अधोगती होते आहे हा दैव-दुर्विलास.

दूर दूर जातानां

लेखक निनाव यांनी गुरुवार, 14/04/2011 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
दूर दूर जातानां मज जवळ ठेवशील ना रे? आभाळाखाली तिथल्या मज तु जपशील ना रे? तुझे नि माझे गाणे गुणगुणती गावा च्या वाटा शपथ तुला ह्या वाटांची हिरव्या तु बघशील ना रे? दूर दूर जातानां मज जवळ ठेवशील ना रे? आभाळाखाली तिथल्या मज तु जपशील ना रे? आसवे कळीस भ्रमर तसे मी पाहिन वाट तुझी रे क्षण क्षण हे जाता जाता हर क्षण मी तुज आठवीन ना रे? दूर दूर जातानां मज जवळ ठेवशील ना रे? आभाळाखाली तिथल्या मज तु जपशील ना रे? -- अंतरातुनि वजा जाता राहिन तुझाच सखी गं डोळे मिटुनि बघशील दिसेन मीच जवळ तुला गं राहुन पाण्यात जशी ह्या मास्यास विझे न तहान प्रेमात तुझ्या तसा मी कसे होईल प्रेम कमी गं? -- दूर दूर जा

पुनर्जन्म

लेखक ajay wankhede यांनी गुरुवार, 14/04/2011 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
हजारो वर्षापासुन पडुन होतो.. डोंगराच्या पायथ्याशि दगड बनून. कुठुन अचानक आज एक शिल्पकार आला... त्याचा हात लागताच माझा पुनर्जन्म झाला. मनाचे सारेच बन्द कप्पे अलगत उघडत गेलेत.. जिवनाच्या कवितेला स्फुरण चढत गेले. हजारो वर्षापासुन ओसाड वाटणारा निसर्ग .. आज धुन्द करु लागला. वसन्त,शरद्,ग्रिश्म्,श्रावण सारेच ऋतु .. मनाला भावू लागलेत. सुर्य, चन्द्र जणु माझे डोळे झालेत... आता तर क्षितिजा पलिकडिल जग हि दिसु लागले. आता मि जगणार धुन्द्,मधहोश.. कारण आता माझा पुनर्जन्म झाला.

कोलंबी भात.

लेखक ज्योति प्रकाश यांनी बुधवार, 13/04/2011 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
गोगोल यांना हवी असलेली कोलम्बी भात पाककॄती. साहित्यः-१)३ पेले बासमती तांदूळ,२)२ चमचे धणे,३)२० सुक्या लाल मिरच्या(किंवा आपल्या तब्येतीनुसार), ४)२५ लसणीच्या पाकळ्या,५)१ इंच आले,६)१ मोथ कांदा,७)सुके खोबरे,८)५-६ लवंगा, ९)२ दालचिनीचे तुकदे,१०) २ मसाला वेलची,११)साफ केलेली कोलंबी.१२)तूप,१३) २ कांदे तळण्यासाठी, १४)थोडे शहाजिरे. कॄती:- प्रथम लसुण्,खोबरे,आलं,कांदा,धणे,सुक्या मिरच्या यांची कच्ची गोळी वाटावी.भरपूर तुपात प्रथम कांदा तळून घ्यावा व बाजुला काढून ठेवावांअंतर त्याच तुपात लवंग्,दालचिनी,मसाला वेलची फोडणीस टाकावी. त्यावर वाट

हिच का देशभक्तांची किंमत??

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 13/04/2011 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच ईसकाळवर एक बातमी वाचनात आली. "कॉंग्रेस संदेश' या मुखपत्राच्या ताज्या अंकात भगतसिंग व राजगुरू या क्रांतिवीरांना आदरांजली वाहताना त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आल्याने तो राजकीय वादाचा विषय ठरला आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या तिघांनाही ब्रिटिशांनी 23 मार्च 1931 ला लाहोरच्या मध्यवर्ती तुरुंगात फाशी दिली. त्यानंतर लाहोरपासून 50 किलोमीटरवरील हुसेनवाला येथे त्यांच्या मृतदेहांचे गुपचूप दहनही केले. या ठिकाणी आजही स्मृतिस्तंभ आहे.

सुरळीच्या वड्या

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 13/04/2011 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः १ वाटी बेसन (चणाडाळीचे पीठ) २ वाट्या पाणी ३/४ वाटी ताक १ इंच आले+२-३ हिरव्या मिरच्या भरड वाटून किंवा पेस्ट मीठ चवीनुसार १/२ टेस्पून हळद १/२ छोटी वाटी खवलेले ओले खोबरे १/२ छोटी वाटी चिरलेली कोथिंबीर फोडणी चे साहित्यः २ टेस्पून तेल १/२ टीस्पून मोहरी १/२ टीस्पून तीळ चिमूटभर हिंग पाकृ: पीठ चाळायच्या चाळणीत बेसन, आले+मिरची पेस्ट, मीठ, हळद, ताक व पाणी घाल

(चावता चावता)

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 13/04/2011 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः इथे कुणाचाही अनादर करण्याचा हेतु नसून केवळ मनोरंजनासाठी हा धागा आहे याची नोंद घ्यावी. कालच एका दमात प्रा. दारोदार टीआरपीनंद कोळंबींच्या ME and TRP या हिब्रू लेखाचा कानडी अनुवाद वाचून संपवला आणि एक बर्‍याच वर्षांची कोळंबी फ्राय खाण्याची इच्छा अपूर्ण आहे अशी आठवण झाली. लेखाचा परिचय करून देणं माझ्या (टीआरपी) लेखनक्षमतेच्या आवाक्याबाहेर आहे. पण माझ्या एका बोळावंशशास्त्रज्ञ असलेल्या पुणेरी मित्राने सांगितलेल्या एका सत्याची पुन: एकदा प्रचीती आली. त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. तो म्हणतो की, जगभर बोळा तुंबण्याचे प्रकार होत असतात.

जालियनवाला बागेतील अमानुष हत्याकांड

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 13/04/2011 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
आज १३ एप्रिल. ९२ वर्षंपूर्वी याच दिवशी जालियनवाला बाग येथे अमानुष नरसंहार घडला होता. बैसाखी मेळ्यानिमित्त जमलेल्या हजारो निरपराध नागरीकांवर मायकेल ओडवायर व डायर यांच्या अधिपत्याखालील शिपायांच्या तुकडीने गोळयांच्या १६५० हून अधिक फैरी झाडत ३७९ माणसे ठार केली तर हजाराहुन अधिक जखमी केली. मृतांचा आकडा अधिक असल्याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे. नि:शस्त्र नागरिकांना कोंडीत गाठुन असहाय्य अवस्थेत टिपुन मारण्यात आले. अनेक जण जीव वाचविण्यासाठी विहिरीकडे धावले तर अनेकांनी भिंती चढुन जाण्याचा प्रयत्न केला. पण परिणाम एकच - मरण. या नरसंहाराबद्दल कुणाला ना खेद ना खंत.