साहित्यः
१ वाटी बेसन (चणाडाळीचे पीठ)
२ वाट्या पाणी
३/४ वाटी ताक
१ इंच आले+२-३ हिरव्या मिरच्या भरड वाटून किंवा पेस्ट
मीठ चवीनुसार
१/२ टेस्पून हळद
१/२ छोटी वाटी खवलेले ओले खोबरे
१/२ छोटी वाटी चिरलेली कोथिंबीर
फोडणी चे साहित्यः
२ टेस्पून तेल
१/२ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून तीळ
चिमूटभर हिंग
पाकृ:
पीठ चाळायच्या चाळणीत बेसन, आले+मिरची पेस्ट, मीठ, हळद, ताक व पाणी घालून गाळून घेणे म्हणजे गुठळी होणार नाही.

जाड बुडाच्या पातेल्यात गाळलेले मिश्रण घालून गॅसवर ठेवावे व सतत ढवळावे.

मिश्रण घट्टसर होत आले की झाकण ठेवून मंद गॅसवर शिजवावे.

शिजलेले मिश्रण असे दिसेल.

स्टीलची ताटं पुसून कोरडी करावी ,
पाणी , तेल अजिबात लावू नये.
तयार मिश्रण गरम असतानाच ताटावर पटपट पसरावे.

त्यावर सुरीने उभ्या रेषा माराव्यात व त्यावर तयार फोडणी , खोबरे, कोथंबीर घालावी.

अलगदपणे पट्टी गुंडाळून वड्या तयार कराव्यात.

पुदिनाच्या चटणीसोबत खायला द्याव्यात. (नुसत्याही खायला छान लागतात :) )

प्रतिक्रिया
अहीला....
वा वा वा...मला सुव फार्फार
आवडीचा पदार्थ
वा वा वा!
आआआआआआआआआआआआ अरे हा आयडी बॅन
मस्त दिसताहेत वड्या. भारी !
छान दिसतायत.
मस्त दिसतायत!
खोबरे कोथिंबिरीत चिक्कूपणा का?
धन्यवाद
In reply to खोबरे कोथिंबिरीत चिक्कूपणा का? by योगप्रभू
मस्तच दिसताहेत वड्या!
खासच
मी या धाग्यावर आलोच नाही, फटु
हेच काय ते करुन बघायचं
मी ही करुन
फोटो ही खूप छान...
मस्त :)
मी ही अशाच करते. माझीही
पाकृ सगळ्यांची आवडती
छान वड्या. खायला कधी मिळणार
अवघड पाकक्रुती सुलभ करुन दाखवल्याबद्दल आभार.
कधि खान्याचा योग आला
खल्लास !!! अळुवडी नंतर मला
अति ब्येक्कार...!!!
आहाहा!!!!!!!
छान दिसतायेत
फटु छान
माझी एकदम आवडती डिश.. तोंडाला
छान !
असेच म्हणते
अफलातून.
छान...सध्यातरी शेवटच्या
लय भारी ...एकच नंबर.... माझा
सोपी (वाटणारी) क्रमवार कृती