नेहमीप्रमाणेच बुचकळ्यात पडलोय. (थोडक्यात अॅज युज्वल कन्फुझ्ड)
भ्रष्टाचारावर चाललेली/ल्या चर्चांना ऊत आलाय. नेहमीप्रमाणे कुणाला विरोध करण्याचा हक्क आहे, नाही, कोण काळा पैसा जनरेट करतो, कोण त्यात कसा सहभागी आहे, अमुक तमुक इ.इ.इ.
मुद्दा असा आहे :
माझ्या मते मी भ्रष्टाचार करत नाही, लाच घेत नाही.
थोडे स्पष्टीकरण : मी माझ्या नोकरीमध्ये अशा ठिकाणी आता आहे की लोक मला किंवा मी लोकांना त्यांचे काम करण्यासाठी, काम झटपट करण्यासाठी, कामाची रक्कम वाढवण्यासाठी, झालेले/ दाखवलेले काम जास्त खोलात न शिरता करण्यासाठी पैसे, भेटवस्तू देऊ शकतात अथवा मी मागू शकतो.