Skip to main content

पुरूषांच सोप्प लाईफ.......

लेखक पियुशा यांनी गुरुवार, 09/06/2011 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
पुरूषांच सोप्प लाईफ....... सकाळी सकाळी नारया का उगवला ? पाळण्यातला छोटा भोंगा ट्या- ट्या करून वाजला, बॅचलर होतो तेव्हा भरपूर केला दंगा ,मस्ती मजा ,मारामारी झालाय लग्न, पडली संसाराची जबाबदारी ,(बोला विट्ठल पांडुरंग हरी) "काय यार कटकट ,अग तू लक्ष दे ना जरा ,किचनमध्ये काय करते ? "(आतून) ,मी डब्बा बनवते, थोडा वेळ सांभाळायला तुझे काय जाते ? आमच्या सुमधुर गाण्याने ते अजूनच बोंबा मारतय, कधी केस ,चष्मा ,तर कधी मिशी धरून ओढतय , तोंडात ब्रश खांद्यावर टॉवेल घेऊन निघाली स्वारी पण बापूस ने आमच्या बाथरूम अडवलाय, च्या मारी ! रोज मी त्यां

चित्रकार एम एफ हुसेन गेले..

लेखक योगी९०० यांनी गुरुवार, 09/06/2011 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसिद्ध चित्रकार एम एफ (माधुरी फिदा) हुसेन यांचे लंडन येथे निधन.. आपल्या चित्राने दुसर्‍या धर्माच्या देवतांची विटंबना करणारा माणूस चचला याचा आनंद मानावा की माणुसकी म्हणूने शोक करावा ह्या संभ्रमात...!!

लोकपाल बिल - भ्रष्टाचार-विरोधी सर्वसामान्यांचा लढा ! फक्त एक फोन करा

लेखक वाहीदा यांनी गुरुवार, 09/06/2011 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
माननिय मिपाकर, नमस्कार ! भारत सरकारने अण्णांवर एक अट टाकली आहे जर २५ करोड नागरिकांना हे लोकपाल बिल हवे असेल तर त्यांनी या लोकपाल बिलाला आपली सहमती दर्शवायला हवी ! त्यासाठी काही फ़्रि नंबर लोकपाल बिलासाठी दिले गेले आहे उदा. +९१-२२-६१५५०७८९ / +91-22-61550789 हा नंबर मुंबई साठी आहे इतर शहरांची सध्या माहीती नाही तुम्हाला फ़क्त येथे एक विनामुल्य फ़ोन करायचा आहे.

लेखन काढले.

लेखक आंसमा शख्स यांनी गुरुवार, 09/06/2011 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
लेखन काढले. तसदी बद्दल क्षमस्व असे लेखन येथे येणार नाही याची काळजी घेईन.

देव किती ? अगदी बोटांवर मोजण्या एवढेच

लेखक शरद यांनी गुरुवार, 09/06/2011 07:18 या दिवशी प्रकाशित केले.
वेदातील तेहेतीस देवांवरून कल्पलेली " तेहेतीस कोटी " ही संख्या सोडून दिली तरी देव किती हा एक मजेदार प्रश्न शिल्लक रहातोच. मोजमाप करावयाच्या दृष्टीने त्यांची वर्गवारी करवयाचा प्रयत्न करू. (१) वैदिक देवता : मरुत, इंद्र, वरुण, अग्नी,उषा, सूर्य,सोम, इत्यादी.( विष्णु ही एक तृतीय श्रेणीतील देवताही होती.) यांपैली कॊणाचीही पूजा आज केली जात नाही. (२) पौराणिक देवता : पौराणिक काळात वैदिक देवता मागे पडून विष्णु, शंकर,देवी, गणपती, स्कंद या देवता पुढे आल्या. (३) ग्रामदेवता व कुलदेवता : गावाचे रक्षण करणार्‍या देवता (बहुतांशी स्त्रीदेवता) उदा.

भंगलेल्या मनाचा अभंग

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी बुधवार, 08/06/2011 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
चित्त आणि वृत्ती व्हावी एकरूप अहंकार लोप होवो माझा देव आहे नाही ठावे नसे मज माझे हितगुज मज पाशी मीच मला केले उभे न्यायालयी आत्माराम होई न्यायाधीश अलिप्तता ऐसी तैसी नाही सोपी किती बहुरूपी अंतरंगी परी नाही आता उपाव दुसरा अखंड पहारा चित्तावरी.....!!

.टिंब.

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 08/06/2011 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
रोज रोज संध्याकाळी ; टिंब रंगते एक होळी आडरानी पंक्चरणार्‍या टायराची रांगोळी मर्तीकेची गर्दभे येती चढवुनी कैफ गोळी येती सारी येकजात देता एक साधी हाळी चिवडा आणि अंडी उकडली ; फेकूनी द्या ती भाजी पोळी संपवुनी चखणा आणि चोखुनी नळी गडी पहुडले तर्र झोकुनी ; हाती घेवूनी रात्र काजळी उजेड फुटतो भल्या सकाळी आड भिंतीपलीकडे ओकलेली पित्तनळी उभे रहाता पाउले पकडती दिशा वेगवेगळी ओघळे ढेरी खेळती डोळे कोशिंबीर आंधळी बंद पाकीटाला ओढ एक तारखेची आगळी दुर्दम्य घायाळ आशावाद; जात नाही कधी काळी स्पर्श पहिल्या धारेचा ;चमके मुद्रा बावळी घेताना नांदते ओठावरी नवनवी लाखावळी जीवनात रंग भरे सृजनतेची

कम्युनल अँड टार्गेटेड व्हॉयलन्स विरोधातील विधेयक - एक गंभिर प्रकरण

लेखक विकास यांनी बुधवार, 08/06/2011 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
पंतप्रधानांच्या कार्यालयाअंतर्गत आणि सोनीया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाहीपद्धतीने निवडून न आलेल्या आणि राज्यघटनेच्या अंतर्गत कुठलेही पद नसलेल्या व्यक्तींची एक समिती नेमली गेली आहे. त्याचे नाव आहे "National Advisory Council" आणि युपिए सरकारचा कार्यक्रम नीट राबवला जात आहे का नाही ह्याची खातरजमा करण्यासाठी म्हणून ही समिती २००४ साली स्थापण्यात आली. त्यासमितीने आता "Prevention of Communal and Targeted Violence Bill" चा मसुदा तयार केला गेला आहे.

..बेंगलोर पासपोर्ट सेवा केंद्रामधील गम्मत..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी बुधवार, 08/06/2011 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
माझा पासपोर्ट नुकताच एक्स्पायर झाला त्यामुळे नव्या पासपोर्टसाठी अर्ज केला होता. मोठ्या मुश्किलीने अर्ज केल्यानंतर दोन महीन्यांनी पासपोर्ट सेवा केंद्रात अपॉईंटमेंट मिळाली. जाताना पुन्हा हेलपाटा नको म्हणुन लागणार्या सर्व कागदपत्रांची दोन दोन झेरोक्स प्रत बरोबर ठेवली होती. थोडक्यात माशी कुठेही शिंकु नये ह्याची योग्य खबरदारी घेतली होती. पण शिंकायची तिथे माशी शिंकलीच. माझे अप्लिकेशन फेटाळुन लावण्यात आले. कारण.. माझ्याकडे माझे स्वतःचे अ‍ॅड्रेस प्रूफ डॉक्युमेंट नव्हते. पण मी विवाहीत आहे आणि माझ्या पत्नीच्या नावाचे तसे डॉक्युमेंट आहे. त्यामुळे माझ्या बाळबोध बुध्दीनुसार माझे मॅरेज सर्टिफिकेट आणि बायकोच

रामदेव बाबा यांची प्रकृती गंभीर

लेखक नर्मदेतला गोटा यांनी बुधवार, 08/06/2011 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
योगगुरू रामदेव बाबा यांची प्रकृती आता खालावत चालली आहे. आज (बुधवार) बाबांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून, डॉक्‍टरांनी त्यांना द्रवस्वरूपातील पदार्थ सेवन करण्यास सांगितले आहे. तसेच, हे उपोषण लवकर थांबवा, असा सल्लाही दिला आहे. याबद्दल प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश शर्मा पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "रामदेव बाबा याची प्रकृती ढासळत चालली आहे.