Skip to main content

यू टू, क्रान्तिताई?

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 16/06/2011 06:06 या दिवशी प्रकाशित केले.
शत्रूंच्या तलवारींना मी कधीच नाही भ्यालो मित्रांच्या टपल्यांनी पण मी अनन्वीत टेंगुळलो असं एका थोर कवीने म्हणून ठेवलेलंच आहे. तशीच काहीशी टेंगुळलेली अवस्था तुमची 'वड बोलला यमाला' ही कविता वाचून झाली. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली, स्वतःला कलाकार म्हणवून घेणाऱ्यांची जी मनमानी चाललेली आहे ती पाहून वीट यायला लागला आहे. सर्वसामान्य ज्यांना वंदनीय समजतात त्या व्यक्ती, संकल्पना, विभूती, परंपरा यांच्यावर हल्ला केल्याशिवाय आपलं श्रेष्ठत्व सिद्धच होत नाही असं यांना वाटत असावं. अशा विचारजंतांची यादी मोठी आहे.

धमाल मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

लेखक इंटरनेटस्नेही यांनी गुरुवार, 16/06/2011 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव खरडसम्राट, आमचे निकटचे स्नेही व आपल्या सर्वांचे लाडके मिपाकर धमाल मुलगा, श्री. कैवल्य देशमुख यांचा आज, १६ जुन हा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या खरडवहीला असेच उधाण येत राहो, व त्यांनी आपल्या जालीय व जालाबाहेरील आयुष्यात यशाची नवनवीन शिखरे सर करावीत, हिच श्री गणेशाचरणी प्रार्थना. :) हॅपी बर्थडे धमाल, कीप रॉकिंग! :)

स्टॅनली का डब्बा

लेखक मस्त कलंदर यांनी बुधवार, 15/06/2011 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवस पाहायचा पाहायचा म्हणून हा पिक्चर पाहायचा राहूनच गेला होता. अलग वेळ देणं होत नसेल तर मी सिनेमे दहा-पंधरा मिनिटांच्या तुकड्यांत बघते. माझ्या या तंत्राला चांगले सिनेमे मात्र दाद देत नाहीत. ते एकाच बैठकीत कधी पाहायला भाग पाडतात हे कळतही नाही. बर्‍याच दिवसांनी असा पिक्चर पाहण्याचा योग आला. डिस्क्लेमर: लेखावरून बरीचशी कथा कळतेय. ज्यांना असा रसभंग व्हायला नकोय त्यांनी इथंच थांबावं.

जंगल ! चित्रे मुद्दाम मोठी टाकली आहेत. लोड व्हायला वेळ लागेल.. But it's worth it....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 15/06/2011 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
राकेशचा माझ्या सेलवर निरोप आला की रात्री ९.३० वाजता जंगलाच्या सफरीवर निघू. होकार कळवून आम्ही जेवायची गडबड उरकून तयार झालो. आम्ही चौघे माझ्या गाडीत आणि बाबा व त्याचा मित्र त्यांच्या मोटरसायकलवर असे निघालो. माझ्या शेजारी राकेश हातात मोठा टॉर्च घेऊन खिडकीतून बाहेर झाडांवर काही दिसते आहे का ते बारिक नजरेने बघत होता. चालत्या गाडीतून याला असे काय दिसणार असे म्हणून मी मनात हसलो आणि गाडीचा वेग खूपच कमी केला. पण बेट्याची नजर भलतीच तयार होती हे थोड्याच वेळात माझ्या लक्षात आले. थोड्याच वेळात राकेशने गाडी थांबावायला सांगितली आणि आम्ही खाली उतरलो.

(पाव्हनं चला, झाडावरती बसू !)

लेखक केसुरंगा यांनी बुधवार, 15/06/2011 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
वेताळणीनं वेताळाला सांगितली गोष्ट अन मग आमीबी म्हनलं जरा गुलुगुल बोलूयात पावन्यासंगं..... ;) वाद असे बहरात वाचका, तुम्ही नका ना रुसू पाव्हनं चला, झाडावरती बसू ! बघा थेरडा मेला 'घोडा' शिव्या हासडून मारा जोडा लाज संस्कृती सारी सोडा उगा वाटतं खूप लिहावं नकाच काही पुसू पाव्हनं चला, झाडावरती बसू ! काढिल खोडी नव्या दमाच्या पुचाट गप्पा स्वातंत्र्याच्या स्टोरी सांगिल वेताळाची जरा मोकळ्या ह्या जालावर खविस नागरी हसू पाव्हनं चला, झाडावरती बसू ! तीन गटांची थेरी मांडा जुन्या दुव्यांची घेउन खांदा हलक्या हाताने काड्या घाला अता खातरी ही शतकाची पब्लिक लागं फसू पाव्हनं चला, झाडावरती बसू ! -केसुरंगा
काव्यरस

अस्वस्थ दशकाची डायरी - आपले मत?

लेखक शानबा५१२ यांनी बुधवार, 15/06/2011 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
काहीतरी 'ध्येयवर्धक' वाचावे म्हणुन मराठी पुस्तक शोधत होतो,घरात तसे काही सापडले नाही.नववीत की दहावीत असताना वाचलेला एक धडा आठवला,फार आवडलेला,तो ह्या कादंबरीमधला होता म्हणुन ही विकत घ्यायचा विचार आहे. http://majesticprakashan.com/?q=node/703 ३०० रुपये वाया जाउ नयेत म्हणुन हा लेख लिहतोय. आपणापैकी कुणी वाचली आहे का? वाचली असेल तर आपले मत काय? काही परीचय देउ शकाल का? 'ध्येयवर्धक' आहे का?

वड बोलला यमाला

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 15/06/2011 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
वटपूजेनिमित्त आमच्या वडाच्या भावना व्यक्त करायचा हा प्रयत्न! वड बोलला यमाला, "हा काय जाच आहे? बांधून घ्यायला का मी एकटाच आहे? पूजा इथे करावी, त्रागा घरी करावा नवर्‍यास त्या म्हणावे, "तू बावळाच आहे!" हा जन्म 'जी हुजूरी' करण्यात घालवी जो, ऐसा गुलाम साती जन्मी हवाच आहे? आंबे, फळे, सुपार्‍या अन् दक्षिणा भटाला, दोरेच फक्त माझे? ही शुद्ध लाच आहे! वैविध्य पाहु दे ना दोन्ही गटांस आता सांगेन जन्म त्यांचा हा सातवाच आहे!"
काव्यरस

साहित्याशी जवळिक साधत -

लेखक विदेश यांनी बुधवार, 15/06/2011 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्याशी जवळिक साधत खुशाल हा बसणार , गोड बोलुनी सर्वांशी हा साहित्यातच रमणार ! भविष्यवाणी सांगुन गेले जाणते कुणी स्वर्गाला भविष्यवाणी खोटी नव्हती , सांगतोच मी तुम्हाला ! बालपणीचा काळ सुखाचा - म्हटले आहे कुणीतरी वह्या नि पुस्तक हाती पडता, चीरफाड मी नित्य करी ; शैशवात मी वह्यांत लपवी - आठवणींची मोरपिसे , फूल सखीच्या गज-यामधले पुस्तकातुनी दडवितसे ! कविता, कादंबरी नि नाटक यांचा नव्हता गंध मला दैनिक मासिक पुस्तक साहित्याची आवड तरी मला ! साहित्याशी सलगी करणे मजला खूपच आवडले, 'वजनदार साहित्य' मलाही रद्दीत घेणे परवडले ! दीड-दान्डीचे मोल मला; ते नसेल काही इतरांना - हर्ष होतसे मलाच , माझा
काव्यरस

एका कथेची गोष्टं ------- लघुकथा -------- जयनीत दीक्षित

लेखक जयनीत यांनी बुधवार, 15/06/2011 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
ते एका नवीन, एकदम ओरीजीनल कथेच्या शोधात होते. लेखकाने त्यांना एक नवीन कथा दाखवली. नाही हो मी ज्याच्या शोधात होतो ते हे नाही. तिकडे बघा कशा कथा लिहील्या जातात, एकसे एक! त्यांना म्हणतात ओरीजीनल! आपल्या कडल्या एकाही कथेला त्याची सर नाही. गेली कित्येक वर्षे वाट बघतोय अशी एखादी तरी कथा हाताळायला मिळावी म्हणून, पण आपल्या देशात कधी तशा कथा जन्माला येतील कुणास ठाउक? लेखकाने त्यांना दूसरी कथा दाखवली. नाही! थोड़ी चीनी कम वाटतेय. लेखकाने त्यांना तीसरी कथा दाखवली. नाही हो ह्यात मसाला नाही. पब्लिकला माल मसाला लागतोच हो. समजताय ना मी काय म्हणतो आहे ते?. लेखकाने त्यांना अजून एक कथा दाखवली. उं हूं!