Skip to main content

खिद्रापूर चा कोपेश्वर मंदिर ( माहिति सोबत )

लेखक शाहिर यांनी सोमवार, 27/06/2011 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
खिद्रापूर : कृष्णा नदी तीरावर वसलेले सुंदर पण भग्न मंदीर .. या मे महिन्या मध्ये भेटीचा योग आला ..११ व्या शतकाच्या सुरुवातीला हे मंदीर शिलाहार राजा ( गन्दारादित्या , विजयादित्य आणि भोज २ रा ) कडून बांधण्यात आले .. पौराणिक कथा : देवी सती हि भगवान शिवाची पत्नी होती ..तिचे वडील राजा दक्ष यास भगवान शिव जावई म्हणून पसंत नव्हते .. दक्ष राजाने एकदा मोठा यज्ञ केला आणि शिव -सती ला बोलावले नाही ..सती ने याबद्दल राजा ला जाब विचारला असता त्याने शिवा चा अपमान केला ..ते सहन ना होऊन सती ने यज्ञा मध्ये उडी घेतली .. हे कळताच भगवान शिव क्रोधीत झाले ..आणि दक्ष राजा चा वध केला .. आणि कृष्णा तीरावर येऊन बसले ..तिथे भगवान विष्णू नी येऊन त्यांचा राग शांत केला .. म्हणून या मंदिरा ला "कोप + ईश्वर " कोपेश्वर म्हणतात .. विशेष म्हणजे या मंदिरा मध्ये नंदी नाही .. स्थापत्य : पूर्ण मंदिर ९६ हत्ती च्या पाठीवर कोरले आहे ..१०८ खांब आहेत तसेच कळसावर शिवलीलामृत कोरले आहे .. संपूर्ण मंदिर भर महाभारत आणि रामायणा मधले प्रसंग कोरले आहेत ..तसेच स्वर्ग मंडप ,यज्ञ मंडप (होमा चा धूर जाण्या साठी छत मध्ये उघडा गोल ठेवला आहे ) ..आणि गर्भ गृह आहे .. औरंगजेबा चा सरदार खैदर खान याने या मंदिरा ची तोड फोड केल्याचा ऐकण्यात आले .. आज हि हे मंदिर आपल्या प्राचीन वैभवाच्या खुणा जपत उभे आहे

इण्टरेस्टिंग गोष्ट

लेखक इरसाल यांनी सोमवार, 27/06/2011 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी कुठली गोष्ट कुठे जुळून येईल सांगता येत नाही. झाले असे की २४ जून ला ऑफिस मधे सहजच चाळता-चाळता एका फोल्डर मधे मागील वर्षाचे काही फोटो सापडले. तारीख होती २५ जून २०१०. नेमका ह्या दिवशी आमच्या मागच्या कंपनीत एच. आर. चा पाठवणी कार्यक्रम होता. त्यावेळी हजर असणार्‍या सगळ्यांना म्हणजे हेडना फोन लावला कारण आम्ही बहुसंख्य तिथून आधीच कटलो होतो. सगळे एकदम खुश, बोलले की पुन्हा एकदा मागील वर्षी जिथे भेटलो होतो तिथेच भेटूया. थोडीफार फोनफोनि करून जागा ठरवली. डि. एस. ओ. आय. धौला-कुआ, नवी दिल्ली. तुम्ही मिलीटरी किंवा तत्सम पाठबळचे नसला तर डि.एस.ओ.आय. मधे तुम्हाला प्रवेश नाही.

(हिंदूंना एकत्र आणणारी विश्व हिंदू परिषद).

लेखक नितिन थत्ते यांनी सोमवार, 27/06/2011 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
. . . प्रेरणा आज ओळख करून घेऊ, भारतात जन्मलेल्या पण जागतिक झालेल्या संघटनेची. सर्व हिंदूंना एकत्र आणणारी विश्व हिंदू परिषद. इतिहासात पाहिले असता, महात्मा गांधींच्या खुनानंतर हिंदुत्ववादी लोकांना भारतात तोंड दाखवायला जागा उरली नाही. त्यांची अवस्था दारूण होऊ लागली होती. तसेच सर्वसामान्य हिंदू घटनेत समावेश केलेल्या पुरोगामी तरतुदींकडे आकृष्ट होऊ लागला होता. पुराणमतवादी हिंदुत्ववाद्यांना असलेला हा सर्वात मोठा धोका टाळण्यासाठी नेहरूंच्या मृत्यूनंतर लवकरच स्वामी चिन्मयानंद यांनी विश्व हिंदू परिषदेची स्थापना पवई मुंबई येथे १९६४ मध्ये केली.

परी आणि भूताची गोष्टं ---- जयनीत दीक्षित

लेखक जयनीत यांनी रविवार, 26/06/2011 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
एक माणूस एकदा एका अरण्यात फिरता फिरता वाट चुकला. भटकत भटकत तो अरण्याच्या खूप आत पोहचला. अरण्याचा हा भाग एकदम निर्जन होता. तिथे एका परी अन एका भूताचे राज्य होते. दोघेही आपापल्या राज्याच्या वेशीवर बसून शिळोप्याच्या गप्पा करीत होते. वाट चुकलेल्या माणसाला बघून परी म्हणाली अरे मी ओळखते ह्याला! लहान पणी मी ह्याच्या स्वप्नात जायचे, हा खूप खूप आनंदून जायचा मला बघून! मग आम्ही खूप खूप खेळायचो, नाचायचो खूप खूप भटकायचो. हा तर अगदी हट्टच करायचा तू जाउ नकोस म्हणून. मला आठवतंय सगळं त्यालाही आठवेल! तो ओळखेल मला नक्कीच! मला वाटतं माझ्याच शोधात आलाय तो इथे. मी त्याचं अगदी जोरदार स्वागत करील.

आली माहेरपणाला

लेखक शरद यांनी रविवार, 26/06/2011 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
आली माहेरपणाला व्यथा कोणाला चुकल्या आहेत ? लहान बालक, तरुण प्रियकर-प्रेयसी, वृद्ध आईवदील, शंबुक-एकलव्यासारखे खालील स्तरातील माणसे व त्यांना शिक्षा देणारे राम-द्रोणाचार्य यांसारखी उच्च स्तरातील राजे-राजगुरू, "जाणता राजा" शिवशंभू व क्रूरकर्मा बादशहा औरंगजेब, दोन वेळा जेवण मिळावयाची भ्रांती असणारे श्रमिक व कोट्यावधींचा घोटाळे करणारे राजकारणी, मनस्वी कलाकार, सर्वांना काही ना काही व्यथा आहेतच. वैयक्तिक माणसे सोडाच पण समाजाचा एखादा संपूर्ण घटकच व्यथित असू शकतो.

गाढवदादा गाढवदादा -

लेखक विदेश यांनी रविवार, 26/06/2011 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
गाढवदादा गाढवदादा - माणूस म्हणू का ? माणूस म्हणताच चिडून लाथा झाडाल का ? |१| मासेभाऊ मासेभाऊ - नापास झाला का हो ? रडून रडून सगळा टँक भरला की हो ! |२| पोपटराव पोपटराव - शीळ छान घालता राव ! मैनाताईला वाटतं का हो एकदा तरी वळून बघाव ? |३| कासवपंत कासवपंत - लढायला किती हळू जाता ? ढाल पाठीवरती घेता तलवार कुठे विसरता ? |४| भोलानाथ भोलानाथ - गुब्बू गुब्बू गुब्बू पैशाचं मी पेरलं झाड पैसे येतिल का रे ढब्बू ? |५|
काव्यरस

माझिया प्रियाला प्रीत कळेना

लेखक michmadhura यांनी शनिवार, 25/06/2011 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी नी माझी भेट ही क्षणोक्षणी का आठवे आधी कधी ना वाटले काहीतरी होते नवे सांगु कशा मी, तुल सख्या रे माझ्या ह्या भावना माझिया प्रियाला प्रीत कळेना! खरं सांगु तर हे गाणं तीने खास त्याच्यासाठीच म्हंटलं असणार. दोन अगदी वेगळ्या स्वभावाची माणसं लग्न होऊन एकत्र आली ना की हेच म्हणावं लागतं ना! आता हेच बघा ना! ती अगदी हळवी, इमोशनल आणि तो एकदम प्रॅक्टिकल आणि रो़खठोक. ती तिच्याच सुंदर स्वप्नवत जगात जगणारी आणि तो मात्र त्याचं प्रत्येक स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी धडपड करणारा. अगदी टिपीकल दाखवण्याचा कार्यक्रम होउन ठरलेले लग्न.पहिल्याच नजरेत तिला तो खूप आवडला. लग्न ठरलं तेव्हा तिचा आनंद गगनात मावत नव्हता.

तुका जातो वैकुंठाला

लेखक यकु यांनी शनिवार, 25/06/2011 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
न कळत्या वयात प्रभातचा संत तुकाराम पाहिला होता - खूप रडलोही होतो. अगदी काल-पर्वा युट्य़ूबवर संत तुकाराम चित्रपटातील दोन क्लिप्स पुन्हा एकदा पाहाण्यात आल्या. त्या उतरवूनदेखील घेतल्या. या चित्रपटातील तुकोबाची भूमिका विष्णुपंत पागनिसांची (पु.लं. च्या हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका मधली पेस्तनकांकाची "अरे साला काय ऎक्टिंग, तुला सांगतो साला ओरिजिनल तुकारामबी असा नसेल, ते विस्नुपंत आता वैकुंटमदी असेल, सिटिंग नेक्स्ट टू दी गॉड..." ही दाद आठवते का?). विष्णुपंत पागनीसांनी केलेल्या तुकारामाच्या या भूमिकेने त्या काळात अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले होते.