Skip to main content

उपवासाचा ढोकळा -

लेखक निवेदिता-ताई यांनी सोमवार, 11/07/2011 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
खास आषाढी एकादशीनिमित्त-- उपवासाचा ढोकळा - साहित्य: एक कप वर्याचे तांदूळ पिठ. दोन चमचे शाबूदाणा पिठ एक कप पातळ ताक दोन लहान चमचे साखर अर्धा चमचा मिरची पेस्ट अर्धा चमचा आले पेस्ट दोन लहान चमचे इनो एक चमचा लिंबाचा रस एक चमचा तेल रिफ़ाइंड चवीपुरते मिठ फोडणीसाठी: दोन चमचा तेल, जिरे, दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून, एक चमचा लिंबाचा रस एक लहान चमचा साखर दोन चमचे पाणी कृती: वर्याचे तांदूळ पिठ , शाबूदाणा पिठ साखर, चमचा मिरची पेस्ट, चमचा आले पेस्ट, लिंबाचा रस, चमचा तेल, चवीपुरते मिठ हे सर्व साहित्य एकत्र करावे. त्यात एक ते सव्वा कप ताक घालावे.

नातीगोती

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 11/07/2011 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
नाती गोती मानवी संबंधांचे जाळे समजणे किती क्लिष्ट असते नाही! चहुकडे विणलेल्या संबधांच्या बरोबर मध्यभागी माणूस स्वत: मी-पण सुरक्षीत ठेवायला पहातो. ह्या ’मी’ भोवती अनेक वर्तुळे तो बनवतो. आई वडील, पत्नी, मुले ह्यांची वर्तुळे. इतर कुटुंबीय, नातेवाईक, शेजारपाजार, मोहल्ला, व्यापार-नोकरी निमित्य जोडलेले, समभाषिक, समविचारी...... हजारो वर्तुळांचे जाळे ह्या ’मी’ला घेरून टाकते. एका वर्तुळामधल्या स्पंदनांचा कधी दुसऱ्या वर्तुळांवर चांगला---वाईट परिणाम देखील होत असतो. मग त्यातून मोह, मत्सर, स्पर्धा अशा अनेक समस्या निर्माण होतात.

ध्यास विठ्ठलाचा -

लेखक विदेश यांनी सोमवार, 11/07/2011 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
ध्यास मनी घेता दिसली पंढरीची वाट विठ्ठलाचे नाम घेता सरला पहा घाट | तुळशीमाळ हाती घेऊ मुखी ठेऊ नाम जीवनात राहू देऊ सदोदित राम | संसारात नित्य कष्ट आपुल्या जिवाला नाम घेणे ठरते इष्ट घोर ना जिवाला | करू यातना अर्पण चंद्रभागेपोटी नाम नेईल तारून सुखाच्याच भेटी | दु:ख हानी दूर पळते येऊनिया वीट शांती समाधान मिळते मंदिरी अवीट | डोळ्यामध्ये घेऊ आता रूप साठवून विठ्ठलाला शरण माथा चरणी टेकवून | जीवनाला अर्थ गाता ग्यानबाची ओवी राम राम घेऊ जाता तुकोबाच्या गावी |
काव्यरस

तो आणि ती

लेखक सोत्रि यांनी रविवार, 10/07/2011 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
तो काहीसा अबोल विषेशतः हळव्या विषयांवर ती बडबड करणारी विषेशतः हळव्या विषयांवर तो 'दील और दिमाग़ से' आयुष्याबद्दल व्यवहारी आणि प्रॅक्टिकल असणारा ती फक्त 'दील से' आयुष्याकडे बघत जगण्यात दंग असणारी तो कलासक्त, आस्वादी, बंधने झुगारुन काहीसा बेधुंद, आसक्तीने आयुष्य जगणारा ती नातेवाइक, मुले, समाज...

बळी कान पिळी

लेखक हर्षद आनंदी यांनी रविवार, 10/07/2011 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई .. मायानगरी मुंबई.. हिची काय महती.. एक रात्र्रीत रंकाला राव आणि रावाला रंक बनविणारी ही जादू नगरी... ह्या नगरीत राहणारे लोकही असेच, हरहुन्नरी!! याच नगरीच्या कुठल्याश्या कोपर्यात घडलेली हि कथा.. कहाणी एक प्रेमाची! “काय आज कामावर नाही जायचं का?”, आईचा वरच्या पट्टीतला सूर ऐकून विशाल आळस झटकून एकदाचा उठला. उठला कि पहिला भटक्या, SMS कुणाकुणाचे .. ८:०४ च्या लोकल आधी स्टेशनवर भेट .. नाव: ती .. हो तीच, ती आठवली आणि झटकन एक हास्याची लकेर त्याच्या चेहऱ्यावर झळकून गेली. मात्र पाणी भरणाऱ्या आईच्या नजरेतून नाही सुटली. पुन्हा तिचा टेप चालू होताच, विशाल पळाला.. तसेही त्याला लोकल गाठायची होती..

साधना ताई आमटे यांचे निधन ..

लेखक चिंतामणी यांनी शनिवार, 09/07/2011 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
स्व. बाबा आमट्यांची सावली. त्यांच्या प्रत्येक कामात साथ देणारी अर्घांगिनी, नतमस्तक व्हाव्हे अशी वात्सल्यमूर्ती कालवश.. त्यांना भावपूर्ण आदरांजली

मीही स्पर्शून जातो ईश्वराला माझ्या गाण्यातून (रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेचा स्वैर अनुवाद)

लेखक स्वप्ना_तुषार यांनी शनिवार, 09/07/2011 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
I touch God in my song as the hill touches the far-away sea with its waterfall. The butterfly counts not months but moments, and has time enough. Let my love, like sunlight, surround you and yet give you illumined freedom. Love remains a secret even when spoken, for only a lover truly knows that he is loved. Emancipation from the bondage of the soil is no freedom for thee. In love I pay my endless debt to thee for what thou art. दूरवर असलेल्या सागराला टेकडी तिच्या धबधब्यातून स्पर्श करते जशी अगदी तसाच मीही स्पर्शून जातो ईश्वराला माझ्या गाण्यातून फ़ुलपाखरे क्षण मोजतात महिने नाही म्
काव्यरस

मागे ती लुगडी

लेखक शरद यांनी शनिवार, 09/07/2011 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
मागे ती लुगडी एके काळी मराठी काव्य म्हणजे भक्ती काव्य व सोबतीला पंचपक्वांनांनी भरलेल्या ताटात थोडीशी झणझणित चटणी असावी तसे शाहीरांचे शृंगार काव्य. साहित्यात विनोद शोधावयास लागावयाचा. "विनोद आवडे टवाळा " ही समर्थांची उक्ती प्रातिनिधिक म्हणावयास हरकत नाही. तर अशा काळात अमृतराय या कवीची एक आल्हादकारक रचना मिळाली तेव्हा सगळ्या मित्रांना एक मेजवानीच मिळाली म्हणावयास पाहिजे. आणि हो, हा अमृतराय म्हणजे " अजी मी ब्रह्म पाहिले" या सुप्रसिद्ध रचनेचा कर्ता. अमृतराय (१६९८-१७५३) हा कटावाकरिता प्रसिद्ध. मराठीत त्यानेच तो सुरू केला म्हाणावयास हरकत नाही.