Skip to main content

(आली माझ्या घरी ही गटारी )

लेखक अमोल केळकर यांनी शनिवार, 23/07/2011 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी सकाळी सौंदर्यं यांची ही गाथा वाचली आणि आम्हाला ही आता तयारी करावी लागणार याची जाणीव झाली. आली माझ्या घरी ही गटारी सर्व पेयांची झाली तयारी मस्त रात्रही,धूंद वास हा,मी तर पेग भरावे दर वर्षी रे,वेग वेगळी घेऊन मी पहावे कीक जोरात बसे,काडी ओठी घुसे दोस्त लोकांची मैफल न्यारी आली माझ्या घरी ही गटारी !!! विदेशी मारता नको असता,भानही हरपून गेले तंगडी बुर्जी पापड आणून, जेवण भरपूर केले हर्ष दाटे उरी, मित्र आले घरी आज बनली चिकन तंदुरी आली माझ्या घरी ही गटारी !!! अमोल केळकर --------------------------------------
काव्यरस

संस्कार १: येतोच... आलोच....

लेखक नीधप यांनी शनिवार, 23/07/2011 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
अतिशय लगबगीने मी घर आवरत होते. आलेल्या माणसाला उगाच नस्ता पसारा दिसायला नको. सगळ्या घरात व्यक्ती फिरणार तर उगाच कुठली बाहेर पडलेली वस्तू दिसायला नको. पटपटा आवरून मग माझं आवरून तयार रहायचं होतं. सगळीकडचं जागच्याजागी करून अगदीच दिसत होती तिथली सगळी धूळ पुसून मी हुश्श केलं. घाईने अंघोळीला पळाले. सांगितल्या वेळेच्या १५ मिनिटं अगोदर माझ्यासकट माझं घर तीटपावडर लावून तयार होतं. आता सुरू झाली प्रतिक्षा. हॉलमधे बाकी भारतीय बैठक आहे आणि एखादीच खुर्ची. भारतीय बैठकीवर बसले असते तर परत चादर उस्कडली असती. मी खुर्चीवरच बसून रहायचं ठरवलं. सांगितल्या वेळेला अगदी आतूरतेने मी बेल वाजण्याची वाट बघत होते.

जालस्थ

लेखक विकास यांनी शनिवार, 23/07/2011 03:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! येनार येनार येनार! असे अनेक दिवस ऐकत असलेले "गुगल प्लस" जालावर अवतरले. काय मस्त आहे म्हणून सांगू त्या फेसबुकापेक्षा! कारण काय म्हणता? अहो, असे बघा, त्याफेसबुकावर फक्त मित्र करू शकतो आणि मग त्या मित्रांच्या (आणि आपल्या) भिंती रंगवत बसू शकतो. पण प्रॉब्लेम असा आहे की त्यात एकच गोष्ट सगळ्याच कनेक्शन्सना समजू शकते. मात्र, आमच्या गुगल प्लसचे तसे नाही बरंका! त्यात तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे वेगवेगळी वर्तुळे अथवा मराठी जालीय भाषेत कट्टे करू शकता. मग अ, ब, क, ला पार्टीस बोलावलेले ड, इ, फ, ला समजत नाही! वगैरे वगैरे. आता मी असे माझ्या नवीन कोर्‍या गुगल प्लसच्या वर्तुळात आनंदाने लिहीले.

मी चित्रकार कसा बनलो... काही आठवणी...

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 23/07/2011 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक चित्रकार... .... अमुक एका ठिकाणी पोचायचे म्हणून नव्हे, तर निव्वळ आवड म्हणून माळरानावर, राना-वनात भटकंती करणारा, जे आवडेल, ते चित्रात, शब्दात मांडणारा एक प्रवासी.... माझं जीवन हे सुध्धा अशीच एक निरुद्देश भ्रमंती... यात जे जे काही बघता-करता आलं, ज्यात मी काही काळ का होईना, रमून गेलो, त्याचा मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न ... चांदोबा, मेणबत्ती आणि निसर्ग .... इंदूर मध्ये ३० सप्टेंबर १९५१ रोजी जन्मलो. जन्मापासून सव्वीसाव्या वर्षापर्यंत माळव्यात, इंदुरात वाढलो, पण मध्यंतरी सातवी ते नववी महाराष्ट्रात सांगली जवळच्या माधवनगरात होतो.

स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 22/07/2011 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ "येत्या २४ तासात विदर्भ, मराठवाडा आणि प. महाराष्ट्रासह कुठेकुठे मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून त्यापुढील ३६ तासात हवामानामध्ये फ़ारसा बदल संभवत नाही" अशी उद्‍घोषणा आकाशवाणी किंवा दूरदर्शनवर झाली तरी पावसाचे दर्शन होईलच याची खात्री देता येत नाही. कधीकधी २४ अथवा ३६ तासच काय ४८ अथवा ७२ तास उलटून जातात पण आकाशात कापसाच्या बोंडाएवढाही तुकडा दुर्बिनीने शोधूनही नजरेस पडत नाही.

देशस्थ परदेशस्थ

लेखक अलख निरंजन यांनी शुक्रवार, 22/07/2011 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजुताईंच्या आपण सारे षंढ ह्या कवितेत एक उपचर्चा अशी सुरू आहे की परदेशी वास्तव्यास असणार्‍या भारतीयांना, भारतावर भारतीयांवर टिका करण्याचा नैतिक अधिकार कितपत आहे? भारताबाहेर सेटल होणार्‍यांनी (पोएटीक लायसन्स वापरुनही) 'सारे भारतीय षंढ आहेत' किंवा 'भारतीय लोकशाही भाडखाऊ आहे' अशी टोकाची प्रतिकिया द्यावी का? माझ्यामते परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना असा नैतिक अधिकार नसावा.

कोथिंबीर वड्या---

लेखक निवेदिता-ताई यांनी शुक्रवार, 22/07/2011 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी सकाळीच मंडईत गेले होते...कोवळी लुसलुशित कोथिंबीर पाहुन लगेचच घेतली. पाच-सहा पेंड्या- आता एवढ्या घेतल्या खर्या पण काय करावे..मनात विचार आल्या.. कोथिंबीर वड्या करुयात... मग झाली लगेच सुरुवात इतर साहित्य जमवायला.. कामवाल्या बाईकडून कोथिंबीर निवडून घेतली, लसूण सोलून घेतला... मग उठलेच- लसूण भरपुर जिरे घालून मिक्सरमधुन फ़िरवुन घेतला, तोपर्यंत कोथिंबीर निवडून झालीच होती, ती चिरुन , धुवुन घेतली, त्यात थोडे बेसन पिठ, लसूण-जिरे पेस्ट, मिरची पावडर- जरा बेतानेच, मीठ चवीनुसार, थोडीशी साखर, हे सर्व एकत्र करुन घेतले, व त्याच्या लांबट वळ्य़ा केल्या, व एका चाळणीला तेल लावुन त्यात ठेवल्या, व गॅसवर पा

गटारीगाथा

लेखक सौन्दर्य यांनी शुक्रवार, 22/07/2011 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
गटारीगाथा तसे आपले खास असे महाराष्ट्रीयन सण पुष्कळ आहेत, पण ज्या सणाची महाराष्ट्रीयन पुरुष आतुरतेने वाट पाहतो तो सण म्हणजे 'गटारी अमावस्या'. ज्या प्रमाणे गणेश चतुर्थी, दिवाळी वगैरे सणांची तयारी काही दिवस अगोदर पासूनच सुरु केली जाते, त्याच प्रमाणे ह्या दिवसाची तयारी देखील पुष्कळ दिवस आधीपासून सुरु होते. आधी पुरुषवर्ग मनातल्या मनात मांडे खाऊ लागतो. गटारी जवळ आल्यावर हळू हळू गटारीचे सुतोवाच बायकोसमोर केले जाते.

बहरीन - मध्यपुर्वेच्या वाळवंटातील मृगजळ

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 22/07/2011 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
व्यावसाइक कामानिमीत्त मध्यपुर्वेत, सौदी अरेबीया, रियाधला जाण्याचा योग आला.  मध्यपुर्वेत जाण्याची ही पहिलीच खेप. थोडीफार उत्सुकता होती या प्रवासाची. पण येण्यापुर्वी गुगलींग केल्यावर फारच निराशा झाली. सौदी अरेबीया, ज्या देशात मुस्लीम बांधवांची मक्का आणि मदीना ही पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत, हा देश पुर्णपणॆ कुराण्यातल्या 'शरिया' तत्वांवर चालतो. शरियाच्या पुर्ण कलमांचे (कायदे) काटेकोर पालन केले जाते. गैर मुस्लीमांसाठी जाचक असे खालील मुद्दे 1. सर्व स्त्रियांनी बुरखा (अबाया) घालणे अनिर्वार्य. (हा कायदा धर्मातीत आहे) 2. सार्वजनीक ठिकाणी स्त्री आणि पुरुष  एकत्र येणे निषिद्ध 3.