लग्नाचा वाढदिवस होऊन तीन दिवस झाले होते.
तरीही अजूनही फोन वरचे मेसेजेस आणि फेसबुक वरच्या कॉम्प्लीमेंटस आणि त्याची उत्तरे ह्यातून पूर्णपणे सुटका अजूनही व्हायची होती.
तेच, तेच मेसेजेस अन तीच, तीच उत्तरं! एकच साच्यातून काढल्यासारखी.
कधी कधी कंटाळा येतो ह्या सगळ्याचा. असो कितीही कन्टाळवाणं आणि औपचारिक असलं तरीही आपण ही करतोच की अगदी असंच, वाईट दिसू नये म्हणून हेच मेसेजेस कट, कॉपी, पेस्ट करून पाठवतोच की असल्या ओकेजन्सला
लोकं ही तेच करतात.
औपचारिकच सगळं ह्यात कोण किती मनापासून करतं हे मात्रं शोधत बसायचं नाही.
अन हे फोनबुक आणि फेसबुक किती भरलंय? नाव आणि नंबर्स ची गर्दी नुसती!