Skip to main content

रगडा पॅटिस पाणीपुरीवर फरसाणही दिसले -

लेखक विदेश यांनी शनिवार, 20/08/2011 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल: ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले-) रगडा पॅटिस पाणीपुरीवर फरसाणही दिसले मनीं हे ' फस्त करू ' म्हटले .. |धृ| जाय उभी ही गाडी करुनी पुढ्यात, भैया पाहे वळुनी - हॉटेलवाले शांत बिचारे गल्ल्यावर सुकले .. |१| पाणी भयंकर सुटता तोंडी खमंग बनते शेव पापडी रिक्षामधले प्रणयपाखरू खुषीत का हसले .. |२| तुमची ' माया ' - माझी किमया कृतार्थ झालो , म्हणतो भैया , भेळकचोरीसाठी गिऱ्हाईक खोळंबुन बसले .. |३|

आडवे धागे उभे धागे

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 20/08/2011 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
मी तुम्हा सार्‍यांचेच लेखन वाचतो आहे पण राहून राहून प्रश्न पडला की हे असे का होते ? आम्ही आडवे होउन वाचतो की सगळी लेखक मंडळी उभ्या उभ्या लिहितात (याला बुफे लेखन म्हणूया का, पण वाचणार्‍यांची फे फे होते त्याचे काय) कारण ते लेखन उभे दिसते. It's vertical कधी कधी मला विंग्लिश चा आधार घ्यावा लागतो. आधार कार्ड नव्हे हं ! पण हे कसे जमते ?

एका भारतीय पुरुषाची डायरी

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 20/08/2011 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांकः २० ऑगस्ट ४०११ कंटाळा आलाय! का काय विचारता? ऑफीसमधल्या राजकारणाने कंटाळा आला होता. माझी बॉस म्हणाली शनिवारी यावं लागेल. अस्सं डोकं फिरलं आणि लवकर निघालो. तसं डोकंही दुखत होतं. म्हटलं बाबांकडे चार घटका जावं, बाबांच्या हातच्या चहाने डोकंदुखीच काय पण जगातले सारे रोग दुर होऊ शकतात. पुन्हा एकदा आपल्या घरी गेलं की रोजचं जेवण करणं, पोरांचा अभ्यास, सासर्‍यांची काहि कामं वगैरे रोजची कामं आहेतच. तर बाबांकडे गेलो होतो. नेमकं मला राजनने बघितलं. आता हा सासर्‍यांना नक्की सांगणार. याला काय नोकर्‍या करायच्या नाहीत. बायको मोठ्या हुद्द्यावर आहे. घरी सिरीयल बघितल्या, मुलांना झोपवलं की झालं.

जन लोकपाल विधेयकाला काँग्रेसचा विरोध व राहुल गांधी चे भवितव्य.

लेखक तर्री यांनी शनिवार, 20/08/2011 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
जनलोकपाल विधेयका मध्ये "प्रधानमंत्री " समाविष्ट करण्यास अटल विहारींनी (स्व) संमती दाखवून , लोकसभे मध्ये हे विधेयक मांडले होते. राज्यसभे मध्ये एन.दि.ए. ला बहुमत नसल्याने ते संमत होवू शकले नाही. काँग्रेस ह्याला कदापी मान्यता देणे शक्य नाही . ऊध्या राहूल प्रधानमंत्री झाल्यावर , लोकपाल ने त्यांच्या व त्यांच्या पूर्वजांच्या (तथाकथीत) भ्रष्टाचारावर ताशेरे ओढले व पद सोड्ण्याची नामुष्की आली तर ? ह्या भय गंडातून तर हा विरोध नाही ना ? काय वाटते आपणास ?

सोन्याचे भाव

लेखक संजीव नाईक यांनी शनिवार, 20/08/2011 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
मा. मि.पा. हा खरोखरच विचार करण्या सारखी गोष्ट आहे ती म्हणजे कॉमोडीटी मार्केट मुळ मध्यम वर्गातील लोंक थोड्या पैशात एक किली सोने कागदावर खरेदि कारण्याचा विचार करत आहे. पण खरच सोने २४ ते २५ हजार रुपये तोळे होऊशकते काय? ह्याचा गंभीर पणे विचार करण्यास हवा? तु घेतले म्हणुन मी सुद्धा घेतले म्हाणून आज सोन्याला हा उंचाक मिळाला आहे. पण परिस्थिती नुसार कॉमोडीटी मार्केट मधुन खरे गुंतवणुकदार केव्हाच निघुन गेले आहेत फक्त उरला आहे तो मध्यम वर्ग.

अनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम - लेखांक - २

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 20/08/2011 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
अनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम - लेखांक - २                               भ्रष्टाचाराचा मुद्दा आता व्यापक प्रमाणावर ऐरणीवर आला असला तरी माणसाची भ्रष्टाचारी वृत्ती आता इतक्यातच किंवा गेल्या काही वर्षातच जन्माला आलेली नाही. पूर्वीच्या काळी भ्रष्टाचार अस्तित्वातच नव्हता असेही समजण्याचे कारण नाही.