श्री गणेशासाठी कमलाकृती आसन
श्री गणेश चतुर्थी आता आठ-दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. उत्सवाचे वारे कित्येक दिवस आधिच वाहू लागले आहेत. आषाढच्या सरींत आणि श्रावणाच्या शिडकाव्यात चिंब होऊन हिरवीगच्च झालेली सर्व सृष्टी श्री गणेशाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहते आहे. तिथेच पिवळ्या, पांढ-या रानफुलांनी जणू फेर धरला आहे. विविध रंगी तेरडा माती मातीच्या कणातून तरारून आला आहे.
सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा पिढ्यानपिढ्या जोपासण्यात आलेल्या कोकणातील प्रत्येक देवघरची रंगरंगोटी आता संपली आहे. गणपतीच्या आसनाच्या मागच्या भिंतीवर निसर्गचित्रे, देवांची चित्रे रंगवून झाली आहेत.
मिसळपाव