कविता ढापणे यालाच म्हणतात का?
मिसळपाववर प्रसिद्ध झालेल्या खालिल कविता मला मराठी सृष्टी या संस्थ्ळावर प्रकाशित झालेले आहेत. (माझी याला हरकत नाही)
पण या सर्व कविता "सर्वेश पवार" या नावाखाली प्रसिद्ध झाले आहेत. (याला मात्र माझी हरकत आहे.)
आपण कोणी 'सर्वेश पवार' यांना तशी परवानगी दिली आहे का? मी दिलेली नाही.
मग या कृत्याला चोरी म्हणु शकतो का?
या दुव्यावर सर्वेश पवार यांनी आपल्या नावाखाली प्रसिद्ध केलेले सारे लेखन आहे. कृपया आपापले लेखन तपासुन पाहावे.
गणपती विसर्जन आणि प्रदूषण
गणपती विसर्जन आणि प्रदूषण
आज गणपती विसर्जनाला दरवर्षीप्रमाणे नदीवर गेलो तर तिथे पोलिस आणि नगरपालिकेचे कर्मचारी उभे होते. त्यानी मूर्ती विसर्जनास प्रतिबंध केला. त्याऐवजी जवळच्या एका हिरवेगार घाण पाणी असलेल्या खंदकाचा पर्याय दिला किंवा नदीजवळ एक छोटी काहिल होती त्यात गणपती सोडायला सांगितला. निर्माल्य टाकायला वेगळी ट्रॉली होती.
हरताळका विसर्जनाच्या वेळी नदीकाठी भात, निर्माल्य, फुले आणि मूर्ती यांचा राडा-चिखल झालेला होता, म्हणून असे केले असे साम्गण्यात आले.
१. घरगुती गणपती आणि निर्माल्य विसर्जनाने फार मोठे प्रदूष्ण खरेच होते का?
२.
अस्तित्व दान केले
अस्तित्व दान केले
असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने अस्तित्व दान केले
मस्तीत टाकलेल्या, एकाच पावलाने
पावित्र्य आज माझे, दोलायमान केले
हळवा नकोस होऊ, अश्रू मला म्हणाले
संतप्त हुंदक्यांनी, माझे निदान केले
चंचूप्रवेश ज्यांचा हळुवार पावलांनी
त्या शुभ्र कावळ्यांनी उद्ध्वस्त रान केले
वाचाळ वल्गनांना वैतागलो पुरेसा
कानास वेधणारे, रस्ते किमान केले
इवल्या जगात माझ्या, मी रांगतो अजूनी
असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने अस्तित्व दान केले
मस्तीत टाकलेल्या, एकाच पावलाने
पावित्र्य आज माझे, दोलायमान केले
हळवा नकोस होऊ, अश्रू मला म्हणाले
संतप्त हुंदक्यांनी, माझे निदान केले
चंचूप्रवेश ज्यांचा हळुवार पावलांनी
त्या शुभ्र कावळ्यांनी उद्ध्वस्त रान केले
वाचाळ वल्गनांना वैतागलो पुरेसा
कानास वेधणारे, रस्ते किमान केले
इवल्या जगात माझ्या, मी रांगतो अजूनी
कवितेचे रसग्रहण - ३ (नावं)
"नावं" ही सोनल कर्णीक वायकुळ यांची कविता माझ्या आवडत्या कवितांपैकी एक आहे. ही कविता जितकी भावूक खोल, आणि गहीरी आहे तितकीच तर्कदृष्ट्या भक्कम देखील. त्यामुळे ती वाचकाचा आनंद द्विगुणीत करते. तर्कदृष्ट्या भक्कम म्हणते आहे कारण कवितेची धाटणी थोडी गणिती सिद्धांताप्रमाणे आहे. प्रथम भूमिका मग स्पष्टीकरण मग समर्पक उदाहरणे.
कवितेचा विषय आहे नावं दिलेली अथवा न दिलेली नाती.
कवयित्री सुरुवातीलाच काही ओळीत तिचे म्हणणे मांडते - की नात्यांना नावं शोधायची नसतात, नात्यांना नावं ठेवायची नसतात.
मुसळधार पावसात-लोहगडावर
शनिवारचा पराठेवाला कट्टा यथासांग पार पडल्यानंतर दुसर्या दिवसाचा रविवार तसा आळसातच घालवायच्या तयारीत होतो. तितक्यात सकाळी ९.३० ला मित्राचा फोन आला "१०.३० पर्यंत तयार हो, बाहेर जायचेय भटकायला". कुठे जायचेय, कसे जायचेय काहीही ठरले नव्हते. ठरल्याप्रमाणे तो वेळेवर आला, गाडीत बसलो आणि कुठे जायचे याची चर्चा सुरु झाली. मुळशी, पवना वगैरे ठिकाणांचा विचार मागे मागे पडत गेला. पाऊस तर मुसळधार पडत होता आणि विचार फक्त भिजण्याचाच होता. मुंबई पुणे जुन्या महामार्गानेच प्रवास चालू होता. डोंगर अगदी हिरवेकंच झाले होते. ठिकठिकाणी धबधबे कोसळताना दिसत होते.
कविता रसग्रहन २ - 'आलेख' (कवयत्री : अपर्णा)
मुळे कविता : 'आलेख'
नोट : राजेश जीं नी कविता रसग्रहन केलेले आवडले..म्हणुन येथे त्यापुढेच २ क्रमांक लिहुन पुढे चालु केले.
माझे मिपावर बहुतेक हे पहिलेच रसग्रहन आहे..आवडले तर ते कवितेचे यश समजावे..आनि पहिलेच रसग्रहन असल्याने सोप्पी परंतु छान कविता मी निवडली आहे, आणि एक वाचक म्हनुन येथे लिहित आहे.
------------------------------------------------------
जीवन -आयुष्य कसे गमतीदार असते नाही... ? या जीवनामध्ये आपण कीती चढउतार पाहिलेले असतात, नाही ?...
गरिब मंत्री
हे तुम्हाला पटतं का ?
पंतप्रधानांच्या सुचनेनुसार केंद्रीय व राज्यमंत्र्यांनी आपल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा सादर केला आहे .
यातील अत्यंत गरिब मंत्री एम विरप्पा मोहली १३ लाख मालमत्ता , ए.के.अंटनी यांच्याकडे केवळ १ लाख ८२ हजार रुपये आहेत त्यांच्या पत्नीची परिस्थिती बरी आहे तिच्याकडे ३७ लाख १८ हजार रु.ची मालमत्ता आहे.सुदीप बंदोपाद्याय यांच्याकडे ५६ लाखाची मालमत्ता आहे.आपले शरद पवार १२ कोटी मालमत्तेचे धनी आहेत .पंतप्रधानांकडे ५ कोटीची मालमत्ता आणि हसु नका मारुती ८०० गाडी आहे.सर्वाधिक मालमत्ता कमलनाथ २५० कोटी आणि प्रफुल पटेल १०३ कोटी .
टू जी स्पेकट्रम मध्ये आपला हात साफ केलेले
मिसळपाव