Skip to main content

रंगीत तालीम

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 03/10/2011 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
सहावि सातवित असेन..बहुतेक उन्हाळयाच्या सुट्या चालु झाल्या होत्या.. आमचे १०-१२ मित्रांचे टोळके बाळ पुंडलीक मित्राच्या वाड्यात दंगा करायला जमले होते... वाडा चौसोपि व.मोठा. .. आत एक विठ्ठल मंदिर हि होते..सभामंडपात सारे जमलो होतो.. गप्पा चालु होत्या.. "अन आपण नाटक करु यात का?".चंद्या घाटपांडे म्हणाला.. सा~यांनी कल्पना उचलुन धरली.. पण कोणचे? .कुणालाच सुचेना शेवटी "तुच एखादे नाटुकले लिहि..असा मला आग्रह झाला.. मित्रांच्या विश्वासाचा अन अज्ञानाचा फायदा घेत मी पण हो म्हटले.. रात्री विचार करीत अश्वथाम्याच्या कथेवर एक छोटे नाटुकले लिहिले... अश्वथामा दुध मागतो ..घरची गरीबी..

साहेब बीवी और गँगस्टर

लेखक समीरसूर यांनी सोमवार, 03/10/2011 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसांपासून एखादा चांगला चित्रपट बघावा असे वाटत होते. मागील काही दिवसात टॉकीजला जाऊन पाहिलेले बहुतेक सगळेच चित्रपट वाईट किंवा बरे या कॅटेगरीतले होते. 'दिल्ली बेली' किंवा 'सिंघम' बरे होते पण एखादा चांगला चित्रपट बघण्याचा जो खरा आनंद असतो तो या चित्रपटांनी दिला नव्हता हे खरे. मनोरंजन म्हणून हे चित्रपट बरे होते. 'दिल्ली बेली' तसा थोडा (त्यातील आक्षेपार्ह बीभत्सता वगळता) उजवा वाटला होता. पटकथा आणि दिग्दर्शन या दोन्ही आघाड्यांवर 'दिल्ली बेली' बरा होता. 'सिंघम' चणे-फुटाणे चघळत बघण्यासारखा चित्रपट होता. शनिवार-रविवारच्या सुटीत एखादा चांगला चित्रपट बघावा असे ठरले.

लगाम फक्त त्याचे हात होते ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 03/10/2011 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
[ -घोडा म्हणजे मनातील विकार . दूरदेशी गेल्यावर त्यावर नियत्रण ठेवणे अवघड जाते .आपले मन म्हणजे संस्कार .संस्कार म्हणजे लगाम. आपला आपल्याला लगाम लावणे अवघड जाते त्रास होतो आणि ही तारेवरची कसरत असते].
काव्यरस

मेक्सिकन चिकन चिमीचांगा आणी ग्वाकामोली डीप

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 03/10/2011 06:21 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य चिकन चिमीचांगा: ५०० ग्राम साफ करुन तुकडे केलेले बोनलेस चिकन फ्लॉर / कॉर्न तोरतीया (Tortilla) ३ टेस्पून तयार मेक्सिकन सीझनिंग (हे जर तुम्हाला नाही मिळाले तर तुम्ही पॅपरीका पावडर किंवा लाल मिरची पावडर, मीठ, गार्लिक पावडर, ऑरेगॅनो, लिंबाचा रस, जिरेपूड, धणेपूड, साखर हे सर्व एकत्र वापरु शकता.) १ हिरवी भोपळी मिरची बारीक चिरलेली १ लाल भोपळी मिरची बारीक चिरलेली १ मध्यम कांदा बारीक चिरलेला १ छोटा टोमॅटो चिरलेला १ टीस्पून लसूण बारीक चिरलेले १ टीस्पून काळीमिरीपूड २-३ हॅलेपिनो किंवा हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या १ वाटी मॉंन्टेरी जॅक ची

सर्वसामान्य आजाराबद्दल माहिती न देणे विमा रक्कम नाकारण्याचे कारण असू शकत नाही

लेखक यकु यांनी सोमवार, 03/10/2011 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
आयुर्विमा घेताना प्रस्तावकाला पूर्वीपासूनच असलेल्या सर्वसामान्य आजाराबद्दल विमा कंपनीला माहिती दिली नाही, हे कारण विमा रक्कम व विम्याचे इतर लाभ नाकारण्यास पुरेसे ठरू शकत नाही. विशेष म्हणजे "सर्वसामान्य आजारात" सर्वोच्च न्यायालयाने मधुमेह व उच्च रक्तदाब हे आजार ग्राह्य धरले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा आधार घेऊन एका ग्राहक मंचाने दिलेला निर्णय नुकताच माझ्या हातात पडला, करिता हा प्रपंच. विमा धारकाने एका खासगी विमा कंपनीचा विमा काढताना कंपनीच्या वैद्यकीय प्रश्नावलीत त्याला पूर्वीपासून असलेल्या आजाराबद्दलच्या प्रश्नात "नाही" असे उत्तर दिले होते.

हांडवो (बेक्ड्)

लेखक गणपा यांनी रविवार, 02/10/2011 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ वाटी तांदुळ. १/४ वाटी चणा डाळ. १/४ वाटी मुग डाळ. १/४ वाटी तुर डाळ. १/२ वाटी उडिद डाळ. १/२ वाटी दही. (आंबट असल्यास उत्तम.) दुधी किसलेला.

धर्म - अर्थ - काम - मोक्ष हे पुरुषार्थ, बद्ध - मुमुक्षु - साधक - सिद्ध, या अवस्था आणि अष्टांगयोग

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 02/10/2011 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
धर्म - अर्थ - काम - मोक्ष हे पुरुषार्थ, बद्ध - मुमुक्षु - साधक - सिद्ध, या अवस्था आणि अष्टांगयोग रोजनिश्यांमधील आठवणी वाचताना जाणवलं, की अरे, आपण किती उत्साही, धडपड्ये होतो, भविष्याची यत्किंचीतही कल्पना नसताना जेंव्हा जे जे समोर येत गेलं, सुचत गेलं, ते ते करत गेलो, यातून काहीतरी हिताचं असं घडतच गेलं, आणि आज बहुतांश कौटुंबिक जबाबदारया संपून आपण आता वाटेल ते करायला - आपल्या विशिष्ट मर्यादांमध्ये का होईना, स्वतंत्र आहोत... ...