Skip to main content

सरकारी कचेरीचे जाहिर आभार.....

लेखक मन यांनी मंगळवार, 04/10/2011 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारी २०१० मध्ये मी माझी आधीची कंपनी सोडून सद्य कंपनीत आलो. येताना भविष्य निर्वाह निधीचे (प्रॉव्हिडंट फंडचे) पैसे माझ्या बँक अकाउंट मध्ये जमा करायचा अर्ज(application) आधीच्या कंपनीत निघायच्या दिवशी भरले. सुमारे पाचेक महिन्यांनी संपूर्ण रक्कम व्यवस्थित माझ्या खात्यात जमा झाली.(online e-banking transfer झालेले होते.) त्यासाठी मला कुठलाही follow up घ्यावा लागला नाही.खरे तर घेण्याइतका वेळही काही कारणाने नव्हता म्हणा. जमा झालेली रक्कम माझ्या सारख्या निम्न मध्यमवर्गीय माणसासाठी बर्‍यापैकी मोठी होती.रक्कम मिळाल्यावर हायसे वाटले.

गुरूञ्चे द्वैत

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 04/10/2011 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
आपले लाडके विचारवन्त मिपा'कर श्री. नितिन थत्ते उर्फ थत्ते'चिच्चा यांनी दिलेला हा प्रतिसाद वाचनात आला. थत्ते'चिच्चाञ्चे असे विचार वाचून माझ्या मनास यातना झाल्या. थत्तेचिच्चा हे भारतासारख्या महान देशात जन्माला आले, रहातात आणि तरीही त्याञ्चे असे एकेश्वरवादी, अब्राहमिक (होय अब्राहमिकच, अब्रह्मण्यम नव्हे!) विचार वाचून भारतासारख्या महान देशात अजूनही किती अज्ञान आहे आणि त्यासाठी अवतारी गुरूञ्ची किती गरज आहे हे माझ्या लक्षात आले. अशा वेळेस मिसळ'पावसारख्या सर्व विश्व व्याप्त करणार्‍या माध्यमाची गरजही माझ्या लक्षात आली.

गाथा ..... हा लेख का लिहला ?

लेखक शरद यांनी सोमवार, 03/10/2011 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. नितिन थत्ते यांनी विचारले की हा लेख लिह्ण्याचा उद्देश काय ? तसेच अभंगाच्या खरेखोटेपणाबद्दलही शंका व्यक्त करण्यात आली. खरे म्हणजे या दोन्हींचीही माहिती लेखांत दिली आहे. शरदबोवा थापा मारतात हे (सप्रमाण) पहिल्यांदीच सांगितले आहे. तसेच माझा उद्देश काय हेही शेवटी सांगितले आहे. इथे परत एकदा सांगतो. बहुजनांच्या समजुतीत, त्यांच्या श्रद्द्धाविषयांत, त्यांच्या लोककथांमध्ये,सत्याचा लहानसा अंश असण्याची शक्यता असते.

मी केलेल्या दुपट्यांचे नमुने

लेखक प्रिया ब यांनी सोमवार, 03/10/2011 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, कलादालन ह्या सदरामध्ये मी पहिल्यांदाच लिहित आहे. माझ्या भाची साठी केलेल्या दोन दुपट्यांचे नमुने :

क्यू एन एच, डिसिजन पॉईंट्स वगैरे..

लेखक गवि यांनी सोमवार, 03/10/2011 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
कुर्सी की पेटी इस तरह बांधी जाती है..वगैरे सुरु असतं तेव्हा विमान टॅक्सीवेवरुन रनवेच्या दिशेने झपाझप सरकत असतं. "तुम्ही रनवेवर पोहोचा, रनवेच्या सुरुवातीला नाक वळवून उडण्याच्या तयारीत उभे रहा आणि आम्हाला सांगा", असा क्लिअरन्स आधी टॉवरकडून मिळतो. आपण तसं रनवेवर जाऊन टोकाला उभं रहायचं आणि नाक रनवे मध्यरेषेशी जुळवून मग रेडिओत तोंड घालून सांगायचं की "मुंबई, व्हिक्टर किलो अल्फा, रेडी फॉर टेकऑफ.." मग ते म्हणतात "व्हिक्टर किलो अल्फा, क्लिअर्ड फॉर टेक ऑफ.

नॉस्टॅल्जिया

लेखक क्राईममास्तर गोगो यांनी सोमवार, 03/10/2011 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख लोकसत्तात आलेला... अगदी मनोरंजक वाटला म्हणून मिपाकरांसमोर मांडतोय ...
गेल्या आठवडय़ात पाऊस सुरू झाला तेव्हा मी प्रवासात होतो. संध्याकाळची वेळ. ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या लखलखाटात पावसाची पहिली सर बरसू लागली. एक परिचित गंध आसमंतात दरवळला. मृद्गंध! वेडावून टाकणारा मातीचा हा वास शहरातल्या सिमेंट काँक्रीटच्या जंगलात राहताना मी पार विसरून गेलो होतो. क्षणार्धात माझं मन पन्नास वर्षे मागं गेलं. लहान असताना केलेलं पहिल्या पावसाचं स्वागत आठवलं.

जीर्णोद्धार

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 03/10/2011 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
सुन्या आयुष्यास उरला ... तुझ्या आठवांचा आधार पुन्हा करतो आहे मीच ... जुन्या जखमांचा जीर्णोद्धार मन-मंदिरात गंधाळलेल्या ... विझल्या सगळ्याच वाती तुजविण झालेल्या अंधारात ... उरल्या भकास एकल्या राती केलास हिशेब सहज अन ... चुकले गणित जगण्याचे उरले गाठीशी सखये आता ... नुसते आभास आसवांचे आता अंधाराचे नाही सखये ... वाटते मज उजेडाचे भय अन श्वासाश्वसास माझ्या ... आता लागली भैरवीची लय अखेरचे हे गाणे (गाऱ्हाणे) माझे ... सखे फ़क़्त तुझ्याच साठी घेऊन जातो दुख्खे भरून ... सुखी रहा तू माझ्या पाठी सुखी रहा तू माझ्या पाठी - विश्वेश
काव्यरस