Skip to main content

श्री प्रशांत भुषण

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 12/10/2011 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
टीम अण्णांचे एक सदस्य श्री प्रशांत भुषण यांना केबिन मधे घुसुन मारहाण केल्याचे वृत्त पहाण्यात आले....अश्या भेकड हाणामारीचा निषेध कश्मीर विषयी त्यांनी जे विधान केले होते त्याचा राग येवुन हे कृत्य हल्ले खोरांनी केल्याचे समजते. काश्मिरी नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी सार्वमत घ्यावे..... सैन्य काढुन घ्यावे ..अशी मते व्यक्त केली होति श्री प्रशांत भुषण यांनी.. हल्लेखोर हे श्री भगत सिंग सेनेचे कार्य कर्ते असुन त्यांना श्री प्रशांत भुषण यांची कश्मीर विषयी ची भुमीका मंजुर नव्हती.

अंधेर नगरी चौपट राजा

लेखक जयनीत यांनी बुधवार, 12/10/2011 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
अंधेर नगरीत एका महान योगीराजांचे आगमन झाले . चौपट राजाने त्यांचे अगत्याने स्वागत केले . योगीराजांना भूत , वर्तमान , भविष्य त्रिकालात सर्वकाही बघू शकण्याची सिद्धी प्राप्त होती . राजाने त्यांना सन्मानपूर्वक दरबारात विराजित करून आपले भविष्य विचारले . योगीराज क्षणात समाधिस्थ झाले . जागृत होऊन त्यांनी राजाच्या कानात सांगितले " हे राजा लवकरच तुझा सर्वनाश अटळ आहे , प्रजा तुझ्या कुशासनाला कंटाळली आहे .

स्ट्रॉबेरी- राजबेरी चिजकेक

लेखक Mrunalini यांनी बुधवार, 12/10/2011 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः Mascarpone cheese - ५०० ग्रॅम ग्रीक दही - १०० ग्रॅम (हे दही न मिळाल्यास चक्का किंवा पाणी काढलेले दही वापरु शकता) स्पॉन्ज केक - १ (त्याचे २ लेयर करुन घ्यावेत) जिलेटीन - १ मोठा चमचा गरम पाणी - १/४ कप अंडी - २ (पांढरा भाग) साखर - २५० ग्रॅम व्हॅनिला इसेन्स - १/२ छोटा चमचा लिंबुचा रस - १-२ चमचे लिंबु - १ स्ट्रॉबेरी - १ किलो राजबेरी - १ टिन (राजबेरी नसल्यास चेरी वापरु शकता) केक करायचे भांडे - असे भांडे ज्याचा बेस वेगळा करता येतो. कृती: १. १/४ कप गरम पाण्यामधे जिलेटीन टाकुन, त्यात विरघळुन घ्यावे. २.

पारंपारिक आकाशकंदिल

लेखक प्रिया ब यांनी मंगळवार, 11/10/2011 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, दसरा झाला, आता वेध लागले आहेत ते दिवाळीचे.... चकली, चिवडा, लाडू, फटाके, दिवे,पणत्या इति. आज मी एक सोप्या पद्धतीचा आकाशकंदिल दाखवणार आहे. साहित्य: - चार्ट पेपर (१) - काइट पेपर (२/३) - सोनेरी कागद (१) - फेविकोल - कात्री - पेन्सिल - पट्टी - दोरी/रिबिन क्रुती: १.

'नीम का पेड' आणि त्याचं शीर्षक गीत - मूँह की बात सुने हर कोई

लेखक प्रास यांनी मंगळवार, 11/10/2011 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
९०च्या दशकाच्या मध्यात, बहुतेक ९४-९५ च्या सुमारास दूरदर्शनवर रात्री ९ वाजता एक सुंदर मालिका लागायची. तिचं नाव होतं 'नीम का पेड'. तेव्हाही ती मालिका बघत असताना सारखं वाटायचं की आपण काही क्लासिकल किंवा अभिजात बघतोय. कथा एका बुधाई राम नावाच्या गरीब माणसाची होती. हा बुधाई राम खरं तर एक हरकाम्या असतो, गावच्या मुसलमान जमीनदाराकडे. जमीनदाराचं काहीही काम असलं की त्याला याचीच आठवण होत असे.

"दर्शन"

लेखक धन्या यांनी मंगळवार, 11/10/2011 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, या टुकार धाग्यासाठी क्षमस्व. मी जालावर मंगेश पाडगांवकरांची "दर्शन" ही कविता शोधतोय परंतू सापडत नाही. कवितेची सुरुवात "मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन" अशी आहे. काही ओळी मला पुसटशा आठवत आहेत. तू नाहीस? या वसंतातून कोण फुले मग तू नाहीस? दवबिंदूत का मग झगमग झगमग होत्या लाटा उधळीत आपुल्या फेनिल त्या कविता (?) फुलाफुलातून अखंड उमलत होती ती नवता (??) तुला पाहिले ऋतू-ऋतूतुन, स्थितीगतीतून... इत्यादी. कुणाकडे ही कविता पुर्ण उपलब्ध असल्यास इथे टंकू शकाल काय? धन्यवाद.