बकलावा (तुर्कीची स्वीट डिश)
साहित्यः
फिलो शीट्स - बाजारात तयार मिळतात. २ पॅकेट
ऑलिव्ह ऑइल - १ वाटी
काजु - १ वाटी
आक्रोड - १ वाटी
बदाम - १ वाटी
पिस्ता - १ वाटी
दालचिनी पावडर - १ चमचा
वेलची पावडर - १ चमचा
साखर - २ वाटी
मध - १/२ वाटी
स्टार फुल - ३
लवंग - १०-१२
केक करायचे एक भांडे
कृती:
१. काजु, आक्रोड, बदाम व पिस्ता हे सगळे एकत्र करावे. त्यात ४ चमचे साखर, दालचिनी पावडर व वेलची पावडर टाकुन मिक्सर मधे एकदा फिरवुन घ्यावे. त्याची खुप बारीक पावडर करु नये.
२. केक करायच्या भांड्यामधे खाली ऑलिव्ह ऑइल लावावे.
३. त्यात १ शीट टाकावी. भांड्याच्या आकाराप्रमाणे बाकीची शीट कापुन घ्यावी.
मिसळपाव