Skip to main content

कट्टा - मुंबई २८ ते पुणे १३.

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 24/11/2011 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर भेटणा-या आयडिंच्या मागचे चेहरे कसे असतात, ती बोटं कशी असतात जी आपल्या डोक्याला शॉट लावणारे प्रतिसाद लिहितात अन नंतर ह.घ्या असं लिहुन खरड टाकतात. आपल्या सगळ्यांना बरंच आकर्षण असेल, कोण असतात ती माणसं जी आपलं सुंदर अप्रतिम असं कौतुक करतात, प्रत्यक्ष भेटल्यावर सुद्धा ती आपल्याला त्याच अन तशाच शिव्या देतील का त्यांच्या चेह-यावर फक्त प्रकाटाआ लिहिलेलं दिसेल.

पुण्यातील टेकड्यांवर घाला!

लेखक ए.चंद्रशेखर यांनी गुरुवार, 24/11/2011 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही वर्षात सत्ता व संपत्ती यांच्या अमर्याद प्राप्तीमुळे आपला वैयक्तिक लाभ हा एकमेव हेतू असलेला एक नवीन वर्ग महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे. या वर्गाला अमूक राजकीय पक्षाचा, तमूक राजकीय पक्षाचा या प्रकाराने केलेली वर्गवारी मुळी लागूच पडत नाही. ही मंडळी कोणत्याही राजकीय पक्षाची असोत नाहीतर कोणत्याही क्षेत्रात असोत. मग ते शिक्षण क्षेत्र असेल किंवा समाज सेवेचे क्षेत्र असेल. या मंडळींचे लक्ष फक्त कोणत्याही गोष्टीतून आपला वैयक्तिक लाभ कसा करून घेता येईल याकडे फक्त असते.

गावची गोष्ट !

लेखक चाफा यांनी गुरुवार, 24/11/2011 07:32 या दिवशी प्रकाशित केले.
सुमो चौथ्यांदा बंद पडल्यावर कल्पेशने स्टियरींगवर बुक्की मारुन कानातुन आरपार जाईल अशी शिवी हासडली. आणि मागे वळत बाकी कंपुला आवाज दिला " चला बे, बाहेर निघा परत गाडी बंद पडली. साSSला, पनवतीच लागलीय मागे." . " कल्प्या, तरी सांगत होतो हा डब्बा नको म्हणुन! " तक्रारीच्या सुरात माणिक म्हणाला. माणिक म्हणजे कंपुचा तोफ़खाना फ़रक फ़क्त इतकाच की हा कंपुवरच भडीमार करायचा. " माणक्या, क्वालिस घेत होतो तर महाग पडेल म्हणालास. तेंव्हा तुला जोर आला होता नाही का?" अनिकेतने आपल्या तर्‍हेने राग काढला. " नायतर काय?

आठवण आणि सलाम

लेखक विकास यांनी गुरुवार, 24/11/2011 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
तीन वर्षांपूर्वीचा हाच बुधवार. चार दिवस सलग थँक्सगिव्हींगची सुट्टी म्हणत घरी येण्यासाठी लवकर निघालो होतो. गाडीत रेडीओ लावला तेंव्हा ओझरती बातमी आली होती की मुंबईत कोण्या एका बंदूकधार्‍याने गोळीबार केला म्हणून. सुरवातीस काहीतरी स्थानिक असेल असे वाटले. पण घरी जाईस्तोवर लक्षात आले की हा काहीसा अतिरेकी हल्ला आहे.... आणि नंतरच्या तासाभरातच त्याचे गांभिर्य हे जास्तच समजले कारण तो पर्यंत करकरे, साळसकर, कामटे यांच्या हत्येची बातमी देखील समजली होती. पुढचे अनेक दिवस हे सर्वच भारतीयांना आणि जागतीक माध्यमांमुळे कुठल्याही संवेदनाशील मनाला अस्वस्थ करणारे ठरले होते.

कला बघा कलाकारांची

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 24/11/2011 01:22 या दिवशी प्रकाशित केले.
कला बघा कलाकारांची
Dombari (c) Pashanbhed डोंबारी - छायाचित्रः पाषाणभेद
मायबाप हो तुम्ही कला बघा कलाकारांची अंगमेहनतची कला दाखवूनी खळगी भरतो आम्ही पोटाची ||धॄ|| गावोगाव फिरावं उन्हातान्हात राबावं मिळलं ते खावं अन जमंल तसं रहावं नाही हक्काचं ठिकान आम्हां दोन हात करतो जिंदगीशी अंगमेहनतची कला दाखवूनी खळगी भरतो आम्ही पोटाची ||१|| दोरीवरून चालणं नशीबी आलं ढोलकी वाजवत बालपण चाललं कालचा दिस गेला आजचा चालला कठीण परीक्षा काळाची अंगम
काव्यरस

एका सागराची कथा

लेखक अश्फाक यांनी बुधवार, 23/11/2011 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण ३-४ वर्शा पुर्वी ही छान कविता वाचली होती , आज सहजच चाळ्ता चाळता सापड्ली , आपन बहुतेक वाचली असेल , कवी माहीत नाही. एका सागराची कथा एकदा काय झालं, एक सरिता रागवली आपल्या boyfriend ला म्हणाली 'हे रे काय सागर ! मीच का म्हणून ?

बँक ठेवीना फायदेशीर पर्याय - एफएमपी

लेखक सदानंद ठाकूर यांनी बुधवार, 23/11/2011 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
फिक्सड् मँच्युरिटी प्लान - एफएमपी
फिक्सड् मँच्युरिटी प्लान्स हे निश्र्चित कालावधी डेब्ट योजना (Close Ended Income Schemes) या प्रकारच्या योजनेत गणल्या जातात यांच्या मुदतपुर्तीचा कालावधी अगोदरच जाहिर केला जातो, सर्वसाधारणपणे या योजना स्टॉक मार्केटवर नोंदवल्या जातात.

हरिपूर जत्रेचे टिपलेले क्षण

लेखक अन्या दातार यांनी बुधवार, 23/11/2011 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
मागे हरिपूरला जाऊन आल्यावर हा लेख लिहिला होता. लेखाचा सूर थोडासा नाराजीचा असल्याने फोटो टाकायचे टाळले होते. आज सहज कॅमेरा मेमरी कार्ड स्कॅन करता करता तिथले फोटो सापडले.